logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महापौर रवी लांडगे यांचा “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” या गौरवचिन्हाने सन्मान फार्मासिस्ट सहकारी महापौर झाल्याने पिंपरी चिंचवडमधील केमिस्ट बंधू-भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पिंपरी १७ फेब्रुवारी २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून केमिस्ट व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी,नियमावली सुलभ करण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न राहील. शहराच्या सर्वांगीण विकासात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देत,प्रशासन आणि व्यावसायिक यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येईल.पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनतर्फे ‘माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान’ या गौरवचिन्हाने केलेला सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे. मी स्वतः फार्मासिस्ट असल्यामुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील जबाबदाऱ्या आणि आव्हाने जवळून अनुभवलेली आहेत. समाजाच्या आरोग्य सुरक्षेत केमिस्ट बंधू-भगिनींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हा सन्मान माझा नसून संपूर्ण केमिस्ट समुदायाचा आहे. आपण दाखवलेला विश्वास आणि प्रेम हेच माझ्या कार्याची खरी प्रेरणा आहे.अशी भावना महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत महापौरपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांचा पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनतर्फे सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महानगरपालिकेतील प्रशासकीय भवनातील महापौर कक्षात केमिस्ट असोसिएशनतर्फे महापौर रवि लांडगे यांचा “माझा फार्मासिस्ट,माझा अभिमान” या गौरवचिन्हाने सन्मान करण्यात आला.यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना महापौर रवि लांडगे बोलत होते. या प्रसंगी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विवेक तापकीर, पीआरओ सचिन धोका,पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवी पवार,सचिव चेतन शिंगवी,खजिनदार नंदू पानसरे, भोसरी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष वसुदेव चव्हाण,संघटक राजेश टोपे,किरण थोरवे,अंकुश परांडे,उमेश देसाई,टाव्हरे,महिला संघटक मोहिनी कोळी,पवन टिंगरे,विशाल टेकाळे,विनोद टोपे तसेच मोठ्या संख्येने केमिस्ट बंधू-भगिनी उपस्थित होते. फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या महापौर लांडगे यांच्या निवडीमुळे पिंपरी चिंचवडमधील औषध विक्रेते व केमिस्ट बंधू-भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण असून, हा क्षण केमिस्ट क्षेत्रासाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

6 hrs ago
user_City Mirror News
City Mirror News
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
6 hrs ago
4c9d0886-8103-4199-8e0f-b8fd50eeac5e

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
    1
    अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली
    1
    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Photographer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Deepak Sagar
    1
    Post by Deepak Sagar
    user_Deepak Sagar
    Deepak Sagar
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पत्रकार पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून  डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र  तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे  डोळेझाक करत असून  पर्यावरण प्रेमींनी  कारवाईची मागणी केली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by AMINIYA COURIER
    1
    Post by AMINIYA COURIER
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.