logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत 'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर' जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनायक गौडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनू पीएम, शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनायक गौडा यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरला नशामुक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. युवकांमध्ये जनजागृती करून व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि दुसरीकडे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर पोलीस व नार्कोटिक्स विभागामार्फत कठोर कारवाई करणे, या दोन्ही बाबींवर प्रशासन भर देत आहे. या अभियानात १५ शाळांतील सुमारे १,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सीईओ मिनू पीएम यांनी सांगितले की, १३ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत जिल्हाभर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. हा उपक्रम केवळ शहरापुरता मर्यादित नसून जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपातळीपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. चित्रकला स्पर्धा, जनजागृती रॅली, प्रबोधन कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. ग्रामीण भागातही दारू व अमली पदार्थांची उपलब्धता वाढत असल्याने शेवटच्या गावापर्यंत जनजागृती पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषद शाळांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीद्वारे देखरेख सुरू असून, शाळांभोवती पोलीस गस्त वाढविण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रशासन, पोलीस, शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

2 hrs ago
user_Marathi News Point
Marathi News Point
Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत 'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर' जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनायक गौडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनू पीएम, शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनायक गौडा यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरला नशामुक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. युवकांमध्ये जनजागृती करून व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि दुसरीकडे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर पोलीस व नार्कोटिक्स विभागामार्फत कठोर कारवाई करणे, या दोन्ही बाबींवर प्रशासन भर देत आहे. या अभियानात १५ शाळांतील सुमारे १,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सीईओ मिनू पीएम यांनी सांगितले की, १३ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत जिल्हाभर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. हा उपक्रम केवळ शहरापुरता मर्यादित नसून जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपातळीपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. चित्रकला स्पर्धा, जनजागृती रॅली, प्रबोधन कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. ग्रामीण भागातही दारू व अमली पदार्थांची उपलब्धता वाढत असल्याने शेवटच्या गावापर्यंत जनजागृती पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषद शाळांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीद्वारे देखरेख सुरू असून, शाळांभोवती पोलीस गस्त वाढविण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रशासन, पोलीस, शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वाद मिटविण्यासाठी बोलावल्यानंतर एका तरुणची चाकू मारून हत्या करण्यात आली. या घटनेत माजी नगरसेवकाच्या मुलांसह एकूण साता जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हत्याचा प्रयत्न करण्याचे आरोप या गुन्ह्यांत समाविष्ट आहेत. घटना स्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून मृत्यू पावलेल्या तरुणांचे पंचनामाचे काम पूर्ण केले. तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
    1
    महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वाद मिटविण्यासाठी बोलावल्यानंतर एका तरुणची चाकू मारून हत्या करण्यात आली. या घटनेत माजी नगरसेवकाच्या मुलांसह एकूण साता जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हत्याचा प्रयत्न करण्याचे आरोप या गुन्ह्यांत समाविष्ट आहेत. घटना स्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून मृत्यू पावलेल्या तरुणांचे पंचनामाचे काम पूर्ण केले. तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील मंचर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात एक गंभीर घटना घडली. भाषण सुरू असताना, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका शासकीय अधिकाऱ्याला मोबाईलमध्ये व्यस्त असल्याबद्दल सार्वजनिकपणे खडसावले. या घटनेमुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्याच्या गैरव्यवहारावर कडक टीका केली. या घटनेमुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या वर्तनाविषयी प्रश्न उठले आहेत.
    1
    महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील मंचर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात एक गंभीर घटना घडली. भाषण सुरू असताना, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका शासकीय अधिकाऱ्याला मोबाईलमध्ये व्यस्त असल्याबद्दल सार्वजनिकपणे खडसावले.

या घटनेमुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्याच्या गैरव्यवहारावर कडक टीका केली. या घटनेमुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या वर्तनाविषयी प्रश्न उठले आहेत.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पिशोर तालुका झालाच पाहिजे, असा ठाम इशारा देत हर्षवर्धन दादा जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पिशोरला तालुक्याचा दर्जा न मिळाल्यास पुढील पाऊल उचलणार असल्याचे सांगत हर्षवर्धन जाधव यांनी कडक इशारा दिला आहे.
    1
    पिशोर तालुका झालाच पाहिजे, असा ठाम इशारा देत हर्षवर्धन दादा जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पिशोरला तालुक्याचा दर्जा न मिळाल्यास पुढील पाऊल उचलणार असल्याचे सांगत हर्षवर्धन जाधव यांनी कडक इशारा दिला आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • अंबड पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश 08 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस; 09 मोटारसायकली, नॅनो कार व स्पेअर पार्ट्ससह 5.15 लाखांचा मुद्देमाल जप्त, 05 आरोपी ताब्यात अंबड पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश 08 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस; 09 मोटारसायकली, नॅनो कार व स्पेअर पार्ट्ससह 5.15 लाखांचा मुद्देमाल जप्त, 05 आरोपी ताब्यात आज दिनांक 27 सोमवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत अंबड पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 08 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत 09 मोटारसायकली, एक नॅनो कार तसेच मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात सुटे पार्ट्स असा एकूण 5 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 05 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
    1
    अंबड पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश

08 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस; 09 मोटारसायकली, नॅनो कार व स्पेअर पार्ट्ससह 5.15 लाखांचा मुद्देमाल जप्त, 05 आरोपी ताब्यात


अंबड पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश
08 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस; 09 मोटारसायकली, नॅनो कार व स्पेअर पार्ट्ससह 5.15 लाखांचा मुद्देमाल जप्त, 05 आरोपी ताब्यात
आज दिनांक 27 सोमवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
अंबड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत अंबड पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 08 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत 09 मोटारसायकली, एक नॅनो कार तसेच मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात सुटे पार्ट्स असा एकूण 5 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 05 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 min ago
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. बैठकी दरम्यान नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळेस, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना होणाऱ्या समस्यांवर सविस्तर माहिती दिली. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील या बैठकीत सहभागी होऊन समस्यांवर चर्चा केली. बैठकीचा उद्देश जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचे मूल्यांकन करणे आणि नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे होता.
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. बैठकी दरम्यान नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळेस, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना होणाऱ्या समस्यांवर सविस्तर माहिती दिली. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील या बैठकीत सहभागी होऊन समस्यांवर चर्चा केली. बैठकीचा उद्देश जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचे मूल्यांकन करणे आणि नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे होता.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी अनुसूचित जात (SC) च्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्याची आणि सध्याचे आरक्षण सुरक्षित ठेवण्याची प्रमुख मागणी पूर्ण करण्यासाठी एक विशाल आणि प्रचंड आंदोलन केले. राज्य कार्याध्यक्ष बाबुराव दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पार्टीच्या मुख्य शिष्टमंडळाने जिल्हाधिकारीशी भेट घेऊन त्यांना ज्ञापन सादर केले आणि सरकारला चेतावणी दिली की जर या निर्णयाला त्वरित परत घेतले गेले नाही तर राज्यभरात उग्र जनआंदोलन उभारण्यात येईल. या आंदोलनामध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. त्यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि त्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला त्वरित पाऊल उचलण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे सरकारला निश्चितपणे विचार करण्यास भाग पाडले आहे. आता पाहायचे की सरकार या गंभीर मागणीवर कोणते पाऊल उचलते.
    1
    आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी अनुसूचित जात (SC) च्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्याची आणि सध्याचे आरक्षण सुरक्षित ठेवण्याची प्रमुख मागणी पूर्ण करण्यासाठी एक विशाल आणि प्रचंड आंदोलन केले. राज्य कार्याध्यक्ष बाबुराव दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पार्टीच्या मुख्य शिष्टमंडळाने जिल्हाधिकारीशी भेट घेऊन त्यांना ज्ञापन सादर केले आणि सरकारला चेतावणी दिली की जर या निर्णयाला त्वरित परत घेतले गेले नाही तर राज्यभरात उग्र जनआंदोलन उभारण्यात येईल.

या आंदोलनामध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. त्यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि त्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला त्वरित पाऊल उचलण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे सरकारला निश्चितपणे विचार करण्यास भाग पाडले आहे. आता पाहायचे की सरकार या गंभीर मागणीवर कोणते पाऊल उचलते.
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    5 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत 'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर' जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनायक गौडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनू पीएम, शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनायक गौडा यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरला नशामुक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. युवकांमध्ये जनजागृती करून व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि दुसरीकडे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर पोलीस व नार्कोटिक्स विभागामार्फत कठोर कारवाई करणे, या दोन्ही बाबींवर प्रशासन भर देत आहे. या अभियानात १५ शाळांतील सुमारे १,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सीईओ मिनू पीएम यांनी सांगितले की, १३ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत जिल्हाभर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. हा उपक्रम केवळ शहरापुरता मर्यादित नसून जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपातळीपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. चित्रकला स्पर्धा, जनजागृती रॅली, प्रबोधन कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. ग्रामीण भागातही दारू व अमली पदार्थांची उपलब्धता वाढत असल्याने शेवटच्या गावापर्यंत जनजागृती पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषद शाळांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीद्वारे देखरेख सुरू असून, शाळांभोवती पोलीस गस्त वाढविण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रशासन, पोलीस, शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
    1
    छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत 'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर' जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनायक गौडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनू पीएम, शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनायक गौडा यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरला नशामुक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. युवकांमध्ये जनजागृती करून व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि दुसरीकडे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर पोलीस व नार्कोटिक्स विभागामार्फत कठोर कारवाई करणे, या दोन्ही बाबींवर प्रशासन भर देत आहे. या अभियानात १५ शाळांतील सुमारे १,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सीईओ मिनू पीएम यांनी सांगितले की, १३ जुलैपासून ३१ जुलैपर्यंत जिल्हाभर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. हा उपक्रम केवळ शहरापुरता मर्यादित नसून जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपातळीपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. चित्रकला स्पर्धा, जनजागृती रॅली, प्रबोधन कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे.

ग्रामीण भागातही दारू व अमली पदार्थांची उपलब्धता वाढत असल्याने शेवटच्या गावापर्यंत जनजागृती पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषद शाळांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीद्वारे देखरेख सुरू असून, शाळांभोवती पोलीस गस्त वाढविण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रशासन, पोलीस, शिक्षण विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जालना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांच्या वतीने रायगड येथे आयोजित करण्यात आलेले 12 दिवसांचे निवासी 'आपदा मित्र' प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून परतलेल्या 68 पोलीस पाटील व कोतवालांचा आज गौरव करण्यात आला. आज दिनांक 27 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'आपदा मित्र' किट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या पोलीस पाटील आणि कोतवालांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी विशेष व्यायाम, बचाव कार्य, आणि समन्वयक कार्य यासारख्या विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणाचा उद्देश आपत्तीकालीन परिस्थितीत प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांची तयारी वाढवणे होता.
    1
    जालना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांच्या वतीने रायगड येथे आयोजित करण्यात आलेले 12 दिवसांचे निवासी 'आपदा मित्र' प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून परतलेल्या 68 पोलीस पाटील व कोतवालांचा आज गौरव करण्यात आला. आज दिनांक 27 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'आपदा मित्र' किट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या पोलीस पाटील आणि कोतवालांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी विशेष व्यायाम, बचाव कार्य, आणि समन्वयक कार्य यासारख्या विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणाचा उद्देश आपत्तीकालीन परिस्थितीत प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांची तयारी वाढवणे होता.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 min ago
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित असलेल्या माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना सिल्लोड पंचायत समिती जिल्हा परिषद कामाची माहिती दिली. मजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती पुरवताना सांगितले की, पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली ज्यामध्ये विविध विकासात्मक योजनांची आढावा घेण्यात आली. त्यांनी स्पष्ट केले की, बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि भविष्यातील योजनांवर चर्चा केली.
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित असलेल्या माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना सिल्लोड पंचायत समिती जिल्हा परिषद कामाची माहिती दिली.

मजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती पुरवताना सांगितले की, पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली ज्यामध्ये विविध विकासात्मक योजनांची आढावा घेण्यात आली. त्यांनी स्पष्ट केले की, बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि भविष्यातील योजनांवर चर्चा केली.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.