गॅस टंचाईच्या अफवांना पूर्णविराम! राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू गॅस टंचाईच्या अफवांना पूर्णविराम! राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू मुंबई, दि.१२ : इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईच्या चर्चांना जोर आला असताना महाराष्ट्र शासनाने घरगुती व व्यावसायिक एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत असून जिल्हास्तरीय विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसून गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध असल्याची माहिती शासनाने दिली आहे. रुग्णालये, शासकीय वसतिगृहे, शाळा-महाविद्यालय मेस, मध्यान्ह भोजन योजना व आश्रमशाळांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने केला जाणार आहे. गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत नागरिकांनी समाजमाध्यमांवरील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गॅस बुकिंग अॅपमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासह तक्रार निवारणासाठी व्हॉट्सअॅप सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. दरम्यान, राज्यातील एलपीजी उत्पादन ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आल्याने पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घबराट न बाळगण्याचे आवाहन शासनाने केले आहे. 👇🏻व्यंग चित्र

- संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!1
- खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध मंडळांनी सादर केलेली लेझीम पथके आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, मध्यरात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली. शोभायात्रेची सुरुवात करण्यापूर्वी सर्व मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय भीम'च्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. या शोभायात्रेत शहर पोलीस स्टेशन आणि शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण ८ प्रमुख मंडळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सम्राट अशोक क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), मिमशक्ती क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), पंचशील क्रीडा मंडळ (बकरी बाजार, बाळापूर फैल), सम्राट क्रीडा मंडळ (हरी फैल), समता क्रीडा मंडळ (शंकर नगर), तथागत बहुउद्देशीय नवयुवक मंडळ (हिरा नगर) व अशोक क्रीडा मंडळ (दालफैल), सिद्धार्थ क्रीडा मंडळ (नवा फैल) सहभागी झाले होते.मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी लेझीमचा चित्तथरारक खेळ सादर केला. तसेच, अनेक मंडळांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे जिवंत देखावे सादर केले होते. रस्ते भीमभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक कोणत्याही गालबोटाविना शांततेत पार पडली. प्रशासनाने आणि शहरवासीयांनी या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक केले आहे.1
- मका विक्रीसाठी आणला, पण बाजाराबाहेरच थांबला शेतकऱ्यांचा संताप उसळला1
- Post by Amol Gawai3
- छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईसाहेब यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा उत्सव आज करवंड येथे संपन्न झाले.1
- महावितरणचा 'शॉक'! बुलढाण्यात विद्युत तारेच्या घर्षणामुळे साडेचार एकर मका जळून खाक1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- खामगाव : शहराच्या मुख्य भागातील बर्डे कॉम्प्लेक्ससमोरील नाली चोकअप झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या भागातील नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. परिणामी, सांडपाण्याचा निचरा होण्याऐवजी ते पाणी मुख्य रस्त्यावर साचत आहे. रस्त्यावर साचलेल्या या घाण पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.विशेषतः पादचाऱ्यांना या घाण पाण्यातून पाय तुडवत मार्ग काढावा लागत असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.येथील व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी तक्रार केली आहे की, ही समस्या वारंवार उद्भवत असूनही नगरपालिका प्रशासनाकडून याकडे कायमस्वरूपी लक्ष दिले जात नाही.चोकअप झालेली नाली तात्काळ मोकळी करून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी आता जोर धरत आहे.नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन या समस्येतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.1