संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण.. संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!
संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण.. संत नगरी शेगाव तापले! ४१°C च्या उकाड्याने नागरिक हैराण शेगाव (प्रतिनिधी): संत नगरी शेगावमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून आज तापमानाने तब्बल ४० ते ४१ अंश सेल्सियस गाठल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रखर उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडलेले दिसत असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळले आहे. दुपारच्या वेळेत सूर्याची कडक किरणे अंगावर झोंबत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. बाजार मार्केट,चौक-चौकात, तसेच शेगांव -खामगांव रोड नेहमीची वर्दळ कमी झाली असून,हॉटेल,कापडं मार्केट,चौपाटी स्टॊल,व्यावसायिक यांना उकाड्याचा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संत नगरीत उन्हाचा कहर सुरूच; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता!
- महावितरणचा 'शॉक'! बुलढाण्यात विद्युत तारेच्या घर्षणामुळे साडेचार एकर मका जळून खाक1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- 🔥 परतवाड्यात धडाकेबाज कारवाई! आरोपी आयान अहमदच्या घरावर बुलडोझर फिरला 🔥 अमरावतीच्या परतवाडा येथील गाजत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल करून खळबळ उडवणारा आरोपी आयान अहमद रिजवान अहमद याच्या घरावर प्रशासनाने थेट बुलडोझर चालवला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा प्रशासनाचा स्पष्ट संदेश दिला जात आहे. 🚨1
- वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.2
- मंगरूळपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी1
- Post by Amravati News Update1
- *किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* प्रतिनिधी - संतोष बाहेकर..( बुलडाणा) बुलडाणा - येथुन जवळच असलेल्या किन्होळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज किन्होळा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजकीय, शासकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने हजर होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदर मिरवणूक बस स्टँड वरील पुतळ्यापासून सुरुवात झाली.1
- अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- न्याय मिळाला नाही, शेवटी एसडीओ कार्यालयात विष प्राशन! ५ आदिवासी शेतकऱ्यांचा हृदयद्रावक आत्महत्येचा प्रयत्न राजुरा (चंद्रपूर), एप्रिल २०२६ : १५ वर्षांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या पाच आदिवासी शेतकऱ्यांनी आज दुपारी राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवून गेली आहे. कुसुंबी (कोरपना तालुका) गावातील कोलाम आदिवासी समाजातील पाच शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक)च्या चुनखडी खाणीसाठी दिलेल्या आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या १५ वर्षांपासून वारंवार निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा करूनही प्रशासन आणि कंपनीकडून कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. घटना कशी घडली? दुपारी सुमारे १.३० वाजता हे पाचही शेतकरी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्या कार्यालयात आपल्या मागण्या घेऊन गेले होते. न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी थेट कार्यालयातच विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. राजुरा पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शेतकरी कोण आहेत? हे सर्व कोलाम आदिवासी कुटुंबातील शेतकरी आहेत. त्यांच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने खाणीच्या उद्देशाने घेतल्या होत्या. कंपनीने प्रारंभी काही मोबदला दिला, मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो अपुरा आणि अपुरा होता. उर्वरित मोबदला किंवा जमीन परत मिळण्याची मागणी ते १५ वर्षे करत आहेत. प्रशासनाची भूमिका घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी शेतकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली असून, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीकडूनही याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. ही घटना आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन हक्क, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि मोबदल्याच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधते. “न्याय मिळाला नाही तर शेवटी विष प्यावे लागते,” अशी भावना व्यक्त करणारी ही घटना महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रलंबित प्रश्नांची दुखरी आठवण करून देते. अधिक अपडेटसाठी : शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर होत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्रशासन लवकरात लवकर न्याय देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. (ही बातमी विविध वृत्तस्रोतांवरून संकलित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रकृती आणि प्रशासकीय कारवाईबाबत अधिक माहिती येत राहील.)1