येलदरी येथील केबल स्टेड पुल व भूसंपादन प्रक्रियेचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा हिंगोली : हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी येथे पूर्णा नदीवर जर्मन तंत्रज्ञानावर आधारित उभारण्यात आलेल्या केबल स्टेड पुलाची तसेच संबंधित भूसंपादन प्रक्रियेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच स्थानिक शेतकरी खातेदारांशी चर्चा केली. पुलाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. तसेच पुलाला जोडणारा रस्ता विकसित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबतही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सविस्तर चर्चा केली. पुलासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहे, अशा सर्व प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले. तसेच आतापर्यंत भूसंपादन व रस्ते विकासाबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती घेऊन पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येलदरी येथील जलविद्युत प्रकल्पालाही भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते. ******

- मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.1
- मंठा (जि. जालना) — मंठा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक) हे प्रत्यक्षात मुख्यालयी वास्तव्यास आहेत की नाही, तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या भाडे भत्त्याबाबत (HRA) मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड, मंठा यांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती मंठा यांना सविस्तर निवेदन सादर करून आठ दिवसांत संपूर्ण माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे. यामागील उद्देश म्हणजे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे, नागरिकांना त्वरित सेवा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज प्रभावीपणे चालवणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी असून, तरीही ते शासनाकडून भाडे भत्ता घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, संबंधित अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास असल्याचे दर्शविण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव करून त्याची सत्यप्रत (प्रोसिडिंग) पंचायत समितीकडे सादर करणे ही कायदेशीर जबाबदारी आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा संशय व्यक्त करत, या सर्व कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाकडे मंठा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, मुख्यालयी वास्तव्यासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी अहवाल देणे, संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या भाडे भत्त्याची कालावधीसह सविस्तर माहिती जाहीर करणे, तसेच जे अधिकारी प्रत्यक्षात मुख्यालयी राहत नसूनही भाडे भत्ता घेत आहेत अशा प्रकरणांची चौकशी करून त्यावर केलेली किंवा होणारी कारवाई स्पष्ट करणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. ही माहिती नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित असून प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने आठ दिवसांच्या आत संपूर्ण व अचूक माहिती उपलब्ध करून न दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.1
- Post by Amol Gawai3
- छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईसाहेब यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा उत्सव आज करवंड येथे संपन्न झाले.1
- येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात **अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे** आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामुळे संपूर्ण डासाळा परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे. साप्ताहिकाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी विष्णूसहस्त्रनाम, दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होत असून, या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. ### **उत्सवाची वैशिष्ट्ये:** * **शिस्तबद्ध नियोजन:** गावातील तरुण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे चोख नियोजन करण्यात आले आहे. * **सामुदायिक भोजन:** दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेत आहे. * **हरिपाठ सोहळा:** सायंकाळी होणाऱ्या हरिपाठात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या तन्मयतेने सहभागी होत आहेत. या सप्ताहाची सांगता भव्य **काल्याच्या कीर्तनाने** आणि महाप्रसादाने होणार आहे. 'विठ्ठल विठ्ठल' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात डासाळा गाव भक्तिमय झाले असून, या धार्मिक कार्यामुळे गावातील सामाजिक एकता अधिक वृद्धिंगत होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली1