logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025 चा पिकविमा द्या : आमदार राजेश विटेकर यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

2 hrs ago
user_Jafar tarodekar
Jafar tarodekar
परभणी, परभणी, महाराष्ट्र•
2 hrs ago

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025 चा पिकविमा द्या : आमदार राजेश विटेकर यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    1
    परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    1
    जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • Post by Turab Sayyad
    1
    Post by Turab Sayyad
    user_Turab Sayyad
    Turab Sayyad
    Photographer सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात **अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे** आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामुळे संपूर्ण डासाळा परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे. साप्ताहिकाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी विष्णूसहस्त्रनाम, दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होत असून, या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. ### **उत्सवाची वैशिष्ट्ये:** * **शिस्तबद्ध नियोजन:** गावातील तरुण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे चोख नियोजन करण्यात आले आहे. * **सामुदायिक भोजन:** दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेत आहे. * **हरिपाठ सोहळा:** सायंकाळी होणाऱ्या हरिपाठात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या तन्मयतेने सहभागी होत आहेत. या सप्ताहाची सांगता भव्य **काल्याच्या कीर्तनाने** आणि महाप्रसादाने होणार आहे. 'विठ्ठल विठ्ठल' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात डासाळा गाव भक्तिमय झाले असून, या धार्मिक कार्यामुळे गावातील सामाजिक एकता अधिक वृद्धिंगत होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात **अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे** आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामुळे संपूर्ण डासाळा परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे.
साप्ताहिकाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी विष्णूसहस्त्रनाम, दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होत असून, या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
### **उत्सवाची वैशिष्ट्ये:**
* **शिस्तबद्ध नियोजन:** गावातील तरुण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे चोख नियोजन करण्यात आले आहे.
* **सामुदायिक भोजन:** दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेत आहे.
* **हरिपाठ सोहळा:** सायंकाळी होणाऱ्या हरिपाठात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या तन्मयतेने सहभागी होत आहेत.
या सप्ताहाची सांगता भव्य **काल्याच्या कीर्तनाने** आणि महाप्रसादाने होणार आहे. 'विठ्ठल विठ्ठल' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात डासाळा गाव भक्तिमय झाले असून, या धार्मिक कार्यामुळे गावातील सामाजिक एकता अधिक वृद्धिंगत होताना दिसत आहे.
ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Nishikant rodge
    Nishikant rodge
    Farmer Selu, Parbhani•
    15 hrs ago
  • मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.
    1
    मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नवसाला पावणारा व इच्छा पूर्ण करणारा हारे का सहारा बाबा श्याम हमारा असा हा देवस्थान आपल्या नांदेड शहरात असून. मुख्य देवस्थान राजस्थान येथील खाटू नगर या ठिकाणी असून त्याचेच प्रतिबिंब स्वरूप म्हणून 2005 वर्षी या नांदेड शहरांमध्ये श्री खाटू श्याम बाबा यांचे मंदिर बांधण्यात आलं परंतु अनेकांना ह्या खाटू श्याम बाबा बद्दल काहीच माहित नव्हतं परंतु जसजसं प्रसार वाढत जाईल तसं तसं या खाटू श्याम बाबाचा पूजन घराघरांमध्ये होणार असं श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना वरदान दिलेलं आहे याच अनुषंगाने या वरदान व्यतिरिक्त आणखी दोन वरदान दिले जे की कोणताही भक्त या कलियुगामध्ये तुझी उपासना करेल तुझी पूजा करेल तुझ्या चौकटीवर येऊन तुला काही मागील तर तू त्यांना देणार खाली हात वापस पाठवू देणार नाही असा तो हारे का सहारा बनशील त्यांनी दुसरा वरदान म्हणजे ज्या व्यक्तीच्या नशिबी दुःख दारिद्र्य संघटन कष्ट ही माझ्या लिखित स्वरूपात दिलेले ते कधीच बदलणार नाही परंतु तुला ते अधिकार सुद्धा मी देतो असे देखील श्रीकृष्णांनी या श्याम बाबांना वरदान दिले याच अनुषंगाने भारतामध्ये अनेक ठिकाणी श्याम बाबा देवस्थान यांची स्थापना करण्यात आली मुख्य बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रा मध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये शहरांमध्ये खाटू श्याम बाबा यांचा देवस्थान मोठ्या प्रमाणात उभारणी होत आहे जसं जसं भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत तशा तशाप्रकारे मोठ्या प्रमाणात खाटू श्याम बाबा या ठिकाणी भक्तांची गर्दी बघण्यास मिळत आहे. नांदेड शहरांमध्ये देखील दर एकादशी निमित्त नांदेड येथील प्रसिद्ध श्री खाटू श्याम बाबा मंदिर सांगवी हिंगोली रोड या ठिकाणी मोठ्या संख्येने दिवसभर भाविकांनी दर्शन घेत श्याम बाबा यांच्या समोर साकडे घातले. ज्याच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्याने त्या सगळ्यांना या ठिकाणी श्याम बाबा मंदिर येथे येऊन आपले नवस सोडले. बाबांचा आशीर्वादाचा चमत्कार आज अनेक भक्त घेत आहेत आणि अनुभवत आहेत. आपणही यावे आणि या श्याम बाबा मंदिर येथे श्याम बाबा यांची दर्शन घ्यावे.
    3
    नवसाला पावणारा व इच्छा पूर्ण करणारा हारे का सहारा बाबा श्याम हमारा असा हा देवस्थान आपल्या नांदेड शहरात असून. मुख्य देवस्थान राजस्थान येथील खाटू नगर या ठिकाणी असून त्याचेच प्रतिबिंब स्वरूप म्हणून 2005 वर्षी या नांदेड शहरांमध्ये श्री खाटू श्याम बाबा यांचे मंदिर बांधण्यात आलं परंतु अनेकांना ह्या खाटू श्याम बाबा बद्दल काहीच माहित नव्हतं परंतु जसजसं प्रसार वाढत जाईल तसं तसं या खाटू श्याम बाबाचा पूजन घराघरांमध्ये होणार असं श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना वरदान दिलेलं आहे याच अनुषंगाने या वरदान व्यतिरिक्त आणखी दोन वरदान दिले जे की कोणताही भक्त या कलियुगामध्ये तुझी उपासना करेल तुझी पूजा करेल तुझ्या चौकटीवर येऊन तुला काही मागील तर तू त्यांना देणार खाली हात वापस पाठवू देणार नाही असा तो हारे का सहारा बनशील त्यांनी दुसरा वरदान म्हणजे ज्या व्यक्तीच्या नशिबी दुःख दारिद्र्य संघटन कष्ट ही माझ्या लिखित स्वरूपात दिलेले ते कधीच बदलणार नाही परंतु तुला ते अधिकार सुद्धा मी देतो असे देखील श्रीकृष्णांनी या श्याम बाबांना वरदान दिले याच अनुषंगाने भारतामध्ये अनेक ठिकाणी श्याम बाबा देवस्थान यांची स्थापना करण्यात आली मुख्य बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रा मध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये शहरांमध्ये खाटू श्याम बाबा यांचा देवस्थान मोठ्या प्रमाणात उभारणी होत आहे जसं जसं भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत तशा तशाप्रकारे मोठ्या प्रमाणात खाटू श्याम बाबा या ठिकाणी भक्तांची गर्दी बघण्यास मिळत आहे. नांदेड शहरांमध्ये देखील
दर एकादशी निमित्त नांदेड येथील प्रसिद्ध श्री खाटू श्याम बाबा मंदिर सांगवी हिंगोली रोड या ठिकाणी मोठ्या संख्येने दिवसभर भाविकांनी दर्शन घेत श्याम बाबा यांच्या समोर साकडे घातले. ज्याच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्याने त्या सगळ्यांना या ठिकाणी  श्याम बाबा मंदिर येथे येऊन आपले नवस सोडले. बाबांचा आशीर्वादाचा चमत्कार आज अनेक भक्त घेत आहेत आणि अनुभवत आहेत. 
आपणही यावे आणि या श्याम बाबा मंदिर येथे श्याम बाबा यांची दर्शन घ्यावे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
  • नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली
    1
    नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.