तरवाडी फाट्यावर पडलेले झाड तोडून गावकऱ्यांनी मार्ग केला खुला. तरवाडी फाट्यावर पडलेले झाड तोडून गावकऱ्यांनी मार्ग केला खुला नांदुरा दि.३ : मागील दोन तीन दिवसांपासून वातावरणात झा-लेल्या बदलामुळे वादळी वारे व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नांदुरा - बुलढाणा राज्य महामार्ग २७२ वर वादळी वाऱ्यामुळे तरवाडी फाट्यावर रोडला लागूनच वायकरणा-चे झाड पडल्याने वाहतूकीस अडसर निर्माण झाला होता. अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे गृहीत धरून व सामाजिक बांधिलकी म्हणून तरवाडी येथील वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते भूषण वानखडे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने झाड तोडून मार्ग खुला केला. गजानन महाले, महादेव वानखडे, सिद्धार्थ वा-नखडे, बाळकृष्ण मुकुंद, अशोक वानखडे इत्यादी गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला.
तरवाडी फाट्यावर पडलेले झाड तोडून गावकऱ्यांनी मार्ग केला खुला. तरवाडी फाट्यावर पडलेले झाड तोडून गावकऱ्यांनी मार्ग केला खुला नांदुरा दि.३ : मागील दोन तीन दिवसांपासून वातावरणात झा-लेल्या बदलामुळे वादळी वारे व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नांदुरा - बुलढाणा राज्य महामार्ग २७२ वर वादळी वाऱ्यामुळे तरवाडी फाट्यावर रोडला लागूनच वायकरणा-चे झाड पडल्याने वाहतूकीस अडसर निर्माण झाला होता. अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे गृहीत धरून व सामाजिक बांधिलकी म्हणून तरवाडी येथील वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते भूषण वानखडे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने झाड तोडून मार्ग खुला केला. गजानन महाले, महादेव वानखडे, सिद्धार्थ वा-नखडे, बाळकृष्ण मुकुंद, अशोक वानखडे इत्यादी गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला.
- Post by Santosh Bahekar PRESS1
- अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Shaha News Marathi1
- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- काटेपूर्णा जलाशयात अत्यल्प जलसाठा; पाणीटंचाईची भीती वाढली वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गावानजीक असलेल्या काटेपूर्णा जलाशय प्रकल्पामध्ये सध्या अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून केवळ सुमारे ७ टक्के मूर्त साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जलाशयातून मालेगाव शहरासह जऊळका रेल्वे, जामखेड, वडी वरदरी बुद्रुक या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत जलाशयातून अतिरिक्त पाणी उपसा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी व जनावरांच्या गरजांसाठी राखून ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य नियोजन करावे, अन्यथा येत्या काही महिन्यांत गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.1
- निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.1
- *चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या आणि भाजपसोबतच्या चर्चांवर अत्यंत परखड शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते, त्या सर्व चर्चांचा बोंद्रे यांनी आज समाचार घेतला. राहुल बोंद्रे म्हणाले की, भाजपची देशभरात एकच 'पॉलिसी' आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल सतत वावड्या उठवायच्या, चर्चा चालू ठेवायची आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करून त्यांना पक्षात ओढायचे. ही एक 'सोची समझी साजिश' (ठरवून केलेला कट) असल्याचे त्यांनी म्हटले आहे. *संजय गायकवाड यांच्या भेटीचे सत्य:* संजय गायकवाड यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, त्या दिवशी देवीची यात्रा होती आणि ते केवळ पाहुणे म्हणून घरी आले होते. यात्रेत हवशे-नवशे आणि नवस फेडणारे सर्वच येतात. या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही. चिखलीची ही परंपरा आहे की आम्ही राजकारण केवळ निवडणुकीपुरते करतो, एरवी एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागतोनगरपालिका निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत बोंद्रे म्हणाले की, भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी काँग्रेसने १३ जागा जिंकून त्यांना तोडीस तोड टक्कर दिली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही काँग्रेस तिथे पाय रोवून उभी आहे, हे भाजपला सहन होत नाहीये. म्हणूनच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना चिखलीत बोलावले जात असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीशेवटी, जर कोणी भाजपला कमजोर करण्यासाठी प्रस्ताव देत असेल तर त्याचे स्वागत आहे, परंतु आम्ही काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठीच काम करत राहू, असा विश्वास राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट जिजाऊ एक्स्प्रेस1