साकोलीत शिवजयंतीची तयारी जय्यत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव निमित्ताने "साकोली सेंदूरवाफा" नगरी सज्ज • 🟠 प्रगती कॉलनी चौकात उद्या १९ फेब्रुवारी सायंकाळी ४ ला"सक्षम फाऊंडेशन" तर्फे होणार जन्मोत्सव सोहळा साजरा • शिवकिर्तनकार शाहीर गोविंद पोलाद यांचे शिवचरित्रावर दर्जेदार व गौरवास्पद व्याख्यान • आणि विशेष आकर्षण म्हणजे छत्तीसगड दुर्ग शहरातील "स्वर माला" वाद्ययंत्रांचे सुमधूर डीजे आवाजातील शिवगीतांवर उत्तम प्रस्तुती ही चर्चेचा विषय ठरणार आहे. 🟠 जूने पंचायत समिती, गणेश वार्ड येथे "छत्रपती ग्रुप" कडून उद्या स. १० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण. आणि येथे महाप्रसादाचे आयोजन सुद्धा "छत्रपती समुह" ने केले आहे. तर शहरात अनेक जागी व शाळांमध्ये बाल छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत चिमुकले तयार होऊन विविध मंचावरून शिवजन्मोत्सव गीतांवर आपली कला सादर करतील. तर या साकोली सेंदूरवाफा शहरातील या सोहळ्याचे प्रसारण व प्रसार "व्ही एस एफ" मिडिया - व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन साकोली हे करीत आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी युवक युवती मंडळी आणि नवतरूण विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या सुद्धा भगव्या वेशभूषेत उद्या दिसणार आहेत. मराठी संस्कृतीचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी हा सण सर्व शिवभक्त जनता, युवक वर्ग आणि विविध संघटना आनंदमय व जल्लोषात साजरा करणार आहेत. व हा सण शांततापूर्ण व सुव्यवस्थेत साजरा व्हावा यासाठी साकोलीचे पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी शहरात चौकाचौकात व विविध स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- ९ बाईकसह चार चोरटे जेरबंद साकोली पोलीसांची तीक्ष्ण नजरेत दुसरी दमदार कामगिरी ; विविध जिल्ह्यांतील दुचाकी सापडल्या साकोली : काही युवक तरूण विविध नशेच्या आहारी जाऊन भुरकट चोरी, चालत्या गाडीतून दागिने पळविणे यासाठी चोरींच्या दूचाकीचा वापर करतात. असाच एक छडा साकोली पोलीसांच्या तीक्ष्ण नजरेत तब्बल नऊ दुचाकींसह चार युवा चोरट्यांना मुद्देमालांसह अटक केली आहे. ही कारवाई काल ( बुध. १८ फेब्रु.) ला साकोली पोलीसांनी केली. ही साकोलीत दुसरी दमदार कामगिरी होती हे विशेष. गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विविध दुचाकी चोरणे, त्याने गुन्हेगारी घटना करणे व त्या दुचाकी नंतर विकणे असा काही विधीसंघर्षग्रस्त युवकातर्फे ह्या घटना सुरू होत्या. सानगडी येथून गुप्त सुचनेच्या आधारे साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी काही दुचाकी चोरीच्या नमूद तक्रारींची तातडीने दखल घेतली. व सानगडीच्या दिशेने आपली चमू पाठवून चौफेर तीक्ष्ण नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. एकास ती चोरीची दुचाकी विकतांना या युवा चोरट्यांना साकोली पोलीस चमूने रंगेहाथ पकडले आणि आपला "बाजीराव सिंघम" दांडका दाखविताच सर्व ९ चोरलेल्या दुचाकींसह आरोपींना साकोली पोलीस ठाणे येथे आणले. यात आरोपी भिमसेन रामटेके २४, कुंदन भैसारे २२, सचिन तरोणे २०, धम्मदिप रामटेके ४० सर्व रा. दाभना, बाकटी तह. अर्जूनी/मोर. जिल्हा गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकी ह्या विविध जिल्ह्यांतील असून नविन आहेत. यापूर्वीही सन २०२३ मध्ये पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी असाच एक तीक्ष्ण नजरेत छडा लावून एका रात्रीतूनच ७ बाईक्ससह चार चोरट्यांना अटक करून लाखनी तालुक्यातील या बाईकचोर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये साकोलीच्या एका शासनमान्य पत्रकाराची दुचाकी सुद्धा घरासमोरून रात्री हॅंडल लॉक तोडून याच चोरट्यांनी पळविली होती. आणि असाच छडा साकोलीत दुसऱ्यांदा लागला व पुन्हा ९ बाईक पोलीस ठाणे येथे जमा झाल्या. येथे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात, साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस नायक अनिफ राऊत, महेश नैताम, गौतम थुलकर, नरेंद्र झलके, धनविजय गणविर, राहुल गायधने यांसह पो. हवा. चंद्रकांत थेर, शुभम घाटबांधे, काशिनाथ झंझाळ, मडावी, राऊत यांनी ही दमदार कामगिरी केली. "आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. संपूर्ण सखोल तपास होणार असून चोरी केलेल्या सर्व वाहनांची विविध पोलीस ठाणे येथून माहिती घेतली जात आहे. संपूर्ण शासकीय कायदेशीर कारवाई झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे वाहन आहेत त्यांना ते पोलीस ठाणे किंवा न्यायालयातून सुपूर्द केले जातील. नव्या पिढीच्या तरूणांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका व स्वतः वर गुन्हा दाखल करून आपले शिक्षण आयुष्याचा नाश नका करू" -- एम. पी. आचरेकर "पोलीस निरीक्षक" पोलीस ठाणे, कार्यालय साकोली •4
- कुही तालुक्यात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे उद्घाटन सेंद्रिय शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचालीचे आवाहन ता. प्रतिनिधी कुही :- कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दीपस्तंभ ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, उमरेड-भिवापूर-कुही यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे (बीआरसी लॅब) उद्घाटन आज सकाळी ११ वाजता किन्ही (ता. कुही) येथील संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांच्या शेतावर उत्साहात पार पडले. बीआरसी लॅबचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेंद्रिय शेतीकडून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वनिर्मित निविष्ठा संसाधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करावे, असे त्यांनी सुचविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव राऊत, उपाध्यक्ष मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, बेला होते. त्यांनी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो, असे सांगत जैविक संसाधन केंद्राच्या माध्यमातून कमी दरात निविष्ठा उपलब्ध होण्याचा फायदा अधोरेखित केला. विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये बदल करून फळबाग लागवडीकडे वळावे, त्यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केले. कृषिविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी ‘१० ड्रम थेअरी’ संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ. अर्चना कडू यांनी बीआरसी लॅबचे महत्त्व स्पष्ट करत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी व संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांचा सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भाऊराव तलमले व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारोंडे यांनी केले. कार्यक्रमाला उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by The Indian Matrimony1
- Post by Samachar king digital1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज वृत्तसेवा नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद1
- कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur1
- कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव कुही (शरद शहारे) कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव1