ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामांना गती द्या : सीईओ महेश पाटील ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर सीईओ महेश पाटील यांचा भर नांदेड, ३१ - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा गुरुवार दिनांक ३० जुलै रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी अभियानाची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. लखपती दीदी स्लिप-बॅक एन्ट्री तातडीने पूर्ण करणे, तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनी बीएलबीसी बैठकीस नियमित उपस्थित राहणे, बचत गटांचे कर्ज प्रस्ताव वेळेत बँकांकडे सादर करणे तसेच पीएमईजीपी व सीएमईजीपी योजनांचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत समूह बांधणीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे, प्रभाग संघांचे प्रस्ताव पुढील आठवड्यापर्यंत धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे सादर करून मंजुरी मिळविणे, समूह सदस्यांची ई-केवायसी आणि आधार पडताळणी निर्धारित मुदतीत पूर्ण करणे, तसेच RF, CIF, VRF, MKSP आणि OSF अंतर्गत निधी प्रस्ताव वेळेत जिल्हा कक्षाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार, जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, बालप्रसाद जंगिलवाड, माधव भिसे, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक तसेच प्रभाग समन्वयक उपस्थित होते.
ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामांना गती द्या : सीईओ महेश पाटील ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर सीईओ महेश पाटील यांचा भर नांदेड, ३१ - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा गुरुवार दिनांक ३० जुलै रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी अभियानाची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. लखपती दीदी स्लिप-बॅक एन्ट्री तातडीने पूर्ण करणे, तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनी बीएलबीसी बैठकीस नियमित उपस्थित राहणे, बचत गटांचे कर्ज प्रस्ताव
वेळेत बँकांकडे सादर करणे तसेच पीएमईजीपी व सीएमईजीपी योजनांचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत समूह बांधणीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे, प्रभाग संघांचे प्रस्ताव पुढील आठवड्यापर्यंत धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे सादर करून मंजुरी मिळविणे, समूह सदस्यांची ई-केवायसी आणि आधार पडताळणी निर्धारित मुदतीत पूर्ण करणे, तसेच RF, CIF, VRF, MKSP आणि OSF अंतर्गत निधी प्रस्ताव वेळेत जिल्हा कक्षाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार, जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, बालप्रसाद जंगिलवाड, माधव भिसे, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक तसेच प्रभाग समन्वयक उपस्थित होते.
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.1
- भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.1
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे समाधान शिबिर; दिवंगत नेते अजितदादा पवार यांना अभिवादन लोहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त लोहा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच स्थानिक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनीही आपल्या समस्या मांडून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.1