logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. ​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

8 hrs ago
user_महाराष्ट्र वृत्तवेध
महाराष्ट्र वृत्तवेध
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
8 hrs ago

नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. ​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले.  या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    2
    ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न



मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. 
या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. ​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    1
    नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल


नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले.
​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    1
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.
    1
    भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा
नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    17 hrs ago
  • डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! फसवणूक डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! 📞 जर कोणी स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला "डिजिटल अटक" झाल्याचे सांगत असेल, तर तो नक्कीच सायबर फसवणुकीचा प्रयत्न आहे. ⚠️ लक्षात ठेवा: ✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही. ✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कधीही शेअर करू नका. ✅ घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका. ✅ संशयास्पद कॉल त्वरित बंद करा. ✅ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा वर तक्रार नोंदवा. 🛡️ सतर्क नागरिकच सायबर गुन्हेगारांवर सर्वात मोठे शस्त्र आहेत. माहितीपूर्ण राहा, सुरक्षित राहा! #DigitalArrest #CyberFraud #CyberCrime #CyberSafety #NandedPolice #MaharashtraPolice #StopCyberFraud #OnlineSafety #CyberAwareness #Dial1930 #CyberCrimeHelpline #ThinkBeforeYouTrust #StayAlert #SafeDigitalIndia #ALMBharat #NNLMarathi
    1
    डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! फसवणूक 
डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! 
📞 जर कोणी स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला "डिजिटल अटक" झाल्याचे सांगत असेल, तर तो नक्कीच सायबर फसवणुकीचा प्रयत्न आहे.
⚠️ लक्षात ठेवा: ✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही. ✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कधीही शेअर करू नका. ✅ घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका. ✅ संशयास्पद कॉल त्वरित बंद करा. ✅ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा  वर तक्रार नोंदवा.
🛡️ सतर्क नागरिकच सायबर गुन्हेगारांवर सर्वात मोठे शस्त्र आहेत. माहितीपूर्ण राहा, सुरक्षित राहा!
#DigitalArrest #CyberFraud #CyberCrime #CyberSafety #NandedPolice #MaharashtraPolice #StopCyberFraud #OnlineSafety #CyberAwareness #Dial1930 #CyberCrimeHelpline #ThinkBeforeYouTrust #StayAlert #SafeDigitalIndia #ALMBharat #NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    2
    भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • माहूर गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी प्रवास टाळावा; पैनगंगा नदीला पूर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे आवाहन नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पैनगंगा धनोडा नदीवर सध्या पाण्याची पातळी वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी सध्याचा प्रवास शक्यतो टाळावा, असे नम्र आवाहन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले आहे. ​परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नगर पंचायत माहूर, तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे आणि गरज भासल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
    1
    माहूर गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी प्रवास टाळावा; पैनगंगा नदीला पूर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे आवाहन


नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पैनगंगा धनोडा नदीवर सध्या पाण्याची पातळी वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी सध्याचा प्रवास शक्यतो टाळावा, असे नम्र आवाहन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले आहे.
​परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नगर पंचायत माहूर, तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे आणि गरज भासल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • किनवट तालुक्यात मागील तीन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले व ओढ्याला पूर आला असून अनेक गावामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. याच अनुषंगाने पिंपळगाव सी येथील श्रीमती कमलाबाई गुलाब गुरनुले (विधवा) मु पो पिंपळगाव सि (फाटा) ता किनवट जि नांदेड यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना रडू कोसळले, शासनाने तात्काळ मदत करावी ही अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    1
    किनवट तालुक्यात मागील तीन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले व ओढ्याला पूर आला असून अनेक गावामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. याच अनुषंगाने पिंपळगाव सी येथील श्रीमती कमलाबाई गुलाब गुरनुले (विधवा) मु पो पिंपळगाव सि (फाटा) ता किनवट जि नांदेड यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना रडू कोसळले, शासनाने तात्काळ मदत करावी ही अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.