logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर जिल्ह्यातील औसा येथे पवनचक्की प्रकल्पातून जर्मन वायर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २३ जुलै रोजी पीव्हीआर चौक ते औसा बायपास रोडवर सापळा रचला होता. तेथे उभ्या असलेल्या MH-24-AU-2237 क्रमांकाच्या टाटा एस मालवाहू वाहनाची पाहणी केली असता, त्यात १५० किलो वजनाचे चोरीचे जर्मन वायरचे चार बंडल आढळले. औसा तालुक्यातील करजगाव पाटी परिसरातील पवनचक्की प्रकल्पातून हे वायर चोरी करून स्क्रॅप म्हणून विक्रीसाठी लातूर येथे आणल्याची कबुली संशयितांनी दिली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ५५,००० रुपयांचे वायर आणि २,५०,००० रुपयांचे मालवाहू वाहन असा एकूण ३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये युनुस दस्तगीर शेख (वय ३८, रा. यहिया कॉलनी, लातूर), चमरुलाल नन्हुसिंग वरकडे (वय ३८, रा. कुटरायी, ता. शहापूर, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) आणि हरिचंद्र फगणू मरावी (वय ३०, रा. भानपूर, ता. सहपरा, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे आणि रामदास बाचीफळे यांच्या पथकाने केली.

3 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

लातूर जिल्ह्यातील औसा येथे पवनचक्की प्रकल्पातून जर्मन वायर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २३ जुलै रोजी पीव्हीआर चौक ते औसा बायपास रोडवर सापळा रचला होता. तेथे उभ्या असलेल्या MH-24-AU-2237 क्रमांकाच्या टाटा एस मालवाहू वाहनाची पाहणी केली असता, त्यात १५० किलो वजनाचे चोरीचे जर्मन वायरचे चार बंडल आढळले. औसा तालुक्यातील करजगाव पाटी परिसरातील पवनचक्की प्रकल्पातून हे वायर चोरी करून स्क्रॅप म्हणून विक्रीसाठी लातूर येथे आणल्याची कबुली संशयितांनी दिली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१४/२०२६, कलम

55ace2fa-ffcd-4b2a-ab8a-5c0d49bd7060

३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ५५,००० रुपयांचे वायर आणि २,५०,००० रुपयांचे मालवाहू वाहन असा एकूण ३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये युनुस दस्तगीर शेख (वय ३८, रा. यहिया कॉलनी, लातूर), चमरुलाल नन्हुसिंग वरकडे (वय ३८, रा. कुटरायी, ता. शहापूर, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) आणि हरिचंद्र फगणू मरावी (वय ३०, रा. भानपूर, ता. सहपरा, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे आणि रामदास बाचीफळे यांच्या पथकाने केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवून धडाकेबाज कामगिरी केली आहे. या कारवाईत दोन सराईत वाहनचोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ८ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील एकूण आठ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पहिल्या पथकाने बरकत नगर, लातूर येथे सापळा रचून तोहित ऊर्फ तोह्या अकबर पठाण (वय २५ वर्षे, रा. हणमंतवाडी, कव्हा नाका, लातूर, सध्या बरकत नगर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने लातूर शहरातून तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १,१५,००० रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून गांधी चौक पोलीस ठाणे, उदगीर शहर पोलीस ठाणे आणि पुणे शहरातील प्रत्येकी एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच दिवशी दुसऱ्या पथकाने मळवटी रोड, लातूर येथे छापा टाकून अमोल तेजराव नागरवाड (वय २६ वर्षे, रा. थोरलेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला ताब्यात घेतले. त्याने लातूर, निलंगा, गांधी चौक, विवेकानंद चौक आणि पुणे जिल्ह्यातील चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १,२०,००० रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या वाहनांमध्ये होंडा शाईन, हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो पॅशन प्लस, हिरो पॅशन प्रो, बजाज पल्सर आणि होंडा अक्टिव्हा या वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, सहायक फौजदार सर्जेराव जगताप आणि अंमलदारांच्या पथकाने केली आहे.
    2
    लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवून धडाकेबाज कामगिरी केली आहे. या कारवाईत दोन सराईत वाहनचोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ८ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील एकूण आठ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पहिल्या पथकाने बरकत नगर, लातूर येथे सापळा रचून तोहित ऊर्फ तोह्या अकबर पठाण (वय २५ वर्षे, रा. हणमंतवाडी, कव्हा नाका, लातूर, सध्या बरकत नगर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने लातूर शहरातून तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १,१५,००० रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून गांधी चौक पोलीस ठाणे, उदगीर शहर पोलीस ठाणे आणि पुणे शहरातील प्रत्येकी एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

त्याच दिवशी दुसऱ्या पथकाने मळवटी रोड, लातूर येथे छापा टाकून अमोल तेजराव नागरवाड (वय २६ वर्षे, रा. थोरलेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला ताब्यात घेतले. त्याने लातूर, निलंगा, गांधी चौक, विवेकानंद चौक आणि पुणे जिल्ह्यातील चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १,२०,००० रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या वाहनांमध्ये होंडा शाईन, हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो पॅशन प्लस, हिरो पॅशन प्रो, बजाज पल्सर आणि होंडा अक्टिव्हा या वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, सहायक फौजदार सर्जेराव जगताप आणि अंमलदारांच्या पथकाने केली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • धाराशिव (उस्मानाबाद) शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
    1
    धाराशिव (उस्मानाबाद) शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
    user_Appasaheb Sirasathe
    Appasaheb Sirasathe
    उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाथरीमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. या घटनेच्या विरोधात पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
    1
    दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाथरीमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. या घटनेच्या विरोधात पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि लोकशाहीवर झालेल्या लाठीच्या प्रहाराच्या निषेधार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रमक झाली आहे.
    1
    दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि लोकशाहीवर झालेल्या लाठीच्या प्रहाराच्या निषेधार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रमक झाली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 hrs ago
  • परभणी जिल्ह्यात बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर संपूर्ण परभणी जिल्हा आज पूर्णपणे बंद राहिला.
    1
    परभणी जिल्ह्यात बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर संपूर्ण परभणी जिल्हा आज पूर्णपणे बंद राहिला.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील औसा येथे पवनचक्की प्रकल्पातून जर्मन वायर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २३ जुलै रोजी पीव्हीआर चौक ते औसा बायपास रोडवर सापळा रचला होता. तेथे उभ्या असलेल्या MH-24-AU-2237 क्रमांकाच्या टाटा एस मालवाहू वाहनाची पाहणी केली असता, त्यात १५० किलो वजनाचे चोरीचे जर्मन वायरचे चार बंडल आढळले. औसा तालुक्यातील करजगाव पाटी परिसरातील पवनचक्की प्रकल्पातून हे वायर चोरी करून स्क्रॅप म्हणून विक्रीसाठी लातूर येथे आणल्याची कबुली संशयितांनी दिली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ५५,००० रुपयांचे वायर आणि २,५०,००० रुपयांचे मालवाहू वाहन असा एकूण ३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये युनुस दस्तगीर शेख (वय ३८, रा. यहिया कॉलनी, लातूर), चमरुलाल नन्हुसिंग वरकडे (वय ३८, रा. कुटरायी, ता. शहापूर, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) आणि हरिचंद्र फगणू मरावी (वय ३०, रा. भानपूर, ता. सहपरा, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे आणि रामदास बाचीफळे यांच्या पथकाने केली.
    2
    लातूर जिल्ह्यातील औसा येथे पवनचक्की प्रकल्पातून जर्मन वायर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २३ जुलै रोजी पीव्हीआर चौक ते औसा बायपास रोडवर सापळा रचला होता. तेथे उभ्या असलेल्या MH-24-AU-2237 क्रमांकाच्या टाटा एस मालवाहू वाहनाची पाहणी केली असता, त्यात १५० किलो वजनाचे चोरीचे जर्मन वायरचे चार बंडल आढळले. औसा तालुक्यातील करजगाव पाटी परिसरातील पवनचक्की प्रकल्पातून हे वायर चोरी करून स्क्रॅप म्हणून विक्रीसाठी लातूर येथे आणल्याची कबुली संशयितांनी दिली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ५५,००० रुपयांचे वायर आणि २,५०,००० रुपयांचे मालवाहू वाहन असा एकूण ३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये युनुस दस्तगीर शेख (वय ३८, रा. यहिया कॉलनी, लातूर), चमरुलाल नन्हुसिंग वरकडे (वय ३८, रा. कुटरायी, ता. शहापूर, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) आणि हरिचंद्र फगणू मरावी (वय ३०, रा. भानपूर, ता. सहपरा, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे आणि रामदास बाचीफळे यांच्या पथकाने केली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कळंब तालुक्यातील माळकरंजा ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकाच्या संदर्भात झालेल्या चोरीप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी थेट सरपंच आणि ग्रामसेवकांनाच जाब विचारला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी माळकरंजा ग्रामपंचायतीला 'तुम्ही किती रुपयांची आणि कशा पद्धतीने चोरी केली?' असा प्रश्न विचारला आहे. चोरालाच त्याने किती चोरी केली हे विचारण्यासारखा हा प्रकार माळकरंजा ग्रामपंचायतीत घडला आहे. संगणक परिचालकाबाबत झालेल्या या चोरीच्या संदर्भात सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी चोरीच्या रकमेची आणि पद्धतीची विचारणा केली आहे.
    2
    कळंब तालुक्यातील माळकरंजा ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकाच्या संदर्भात झालेल्या चोरीप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी थेट सरपंच आणि ग्रामसेवकांनाच जाब विचारला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी माळकरंजा ग्रामपंचायतीला 'तुम्ही किती रुपयांची आणि कशा पद्धतीने चोरी केली?' असा प्रश्न विचारला आहे.

चोरालाच त्याने किती चोरी केली हे विचारण्यासारखा हा प्रकार माळकरंजा ग्रामपंचायतीत घडला आहे. संगणक परिचालकाबाबत झालेल्या या चोरीच्या संदर्भात सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी चोरीच्या रकमेची आणि पद्धतीची विचारणा केली आहे.
    user_Rajkumar pralhad tupspund
    Rajkumar pralhad tupspund
    Construction Contractor कळंब, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.