Shuru
Apke Nagar Ki App…
भोकरदनकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात डॉ. निर्मळ यांच्या "पार्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि दातांचा दवाखाना" या रुग्णालयाचा भव्य शुभारंभ होणार आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी पार पडणार आहे.
विश्वास धसाळ Press
भोकरदनकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात डॉ. निर्मळ यांच्या "पार्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि दातांचा दवाखाना" या रुग्णालयाचा भव्य शुभारंभ होणार आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी पार पडणार आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालना शहरातील झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड (प्रमाणपत्र) मिळवून देण्याचे दिलेले आश्वासन अखेर पूर्ण झाले आहे. मुक्तेश्वर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' अभियानात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना पीआर कार्डांचे वितरण करण्यात आले. हे पीआर कार्ड वाटप शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पार पडले. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे. रविवारी दिनांक २६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, या समाधान शिबिरादरम्यान उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.1
- केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे हित जपणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी करणे आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण मंत्रालयाची धुरा स्वीकारताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा सन्मान करत शिक्षण अधिक आधुनिक, सर्वसमावेशक आणि रोजगाराभिमुख करण्यासाठी काम केले जाईल अशी ग्वाही दिली. याशिवाय देशातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावणे, डिजिटल शिक्षणाचा विस्तार करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे ही सरकारची प्रमुख उद्दिष्टे असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.1
- बुलढाणा येथे सामाजिक भान जपत ठाकरे सेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर, रुग्णालयात फळवाटप आणि विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.1
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे विधान केले आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि देशभरातील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात छत्रपती संभाजीनगरात रविवारी, 26 जुलै रोजी भव्य तिरंगा मार्च काढण्यात आला. भारत मातेच्या पाल्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी क्रांती चौक ते पैठण गेट दरम्यान काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये शहरवासीय, तरुण, महिला, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. या आंदोलनात सहभागी नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता हातात केवळ राष्ट्रध्वज तिरंगा, महापुरुषांचे फ्लेक्स आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करणारे फलक घेतले होते. विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी सर्व जण काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. या वेळी 'केंद्र सरकार हाय हाय...', 'मोदी सरकार हाय हाय...' आणि 'विद्यार्थ्यांवर आणि माता-भगिनींवर हात उचलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो...' अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित झाले पाहिजे, पेपरफुटीच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, अशी ठाम भूमिका या वेळी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मांडली. या तिरंगा मार्चमध्ये शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी मंत्री अनिस पटेल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, सीपीआय नेते कॉम्रेड अभय टाकसाळ, माजी आमदार नामदेवराव पवार, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, राशीद मामू, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अक्रम, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, जगन्नाथ काळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, रेखा वाहटूळे, विद्या गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.2
- अकोला राष्ट्रीय महामार्गावरील राजूर चौफुली येथील उड्डाण पुलालगतच्या सर्विस रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अपघातांची मालिका सुरू होण्याची भीती निर्माण झाल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. या पार्श्वभूमीवर, रविवार २६ तारखेला सकाळी ११ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. आमदार खोतकर स्वतः जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी निष्काळजी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून फैलावर घेतले. "नागरिकांच्या जीवाशी खेळ चालणार नाही!" असा कडक इशारा देत त्यांनी प्रशासनाला तात्काळ रस्त दुरुस्तीच्या कामाला लावले.1
- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरच थांबणे पसंत केले. वाघ परिसरातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत हे कर्मचारी सुमारे एक तास विद्युत खांबावरच अडकून राहिले. वन विभाग आणि स्थानिकांकडून परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.1
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा संपूर्ण देशातील तरुणाईचा विजय असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते अतुल सिरसाट यांनी केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना अतुल सिरसाट यांनी हा देशातील युवा वर्गाचा मोठा विजय असल्याचे स्पष्ट केले आहे.1
- छत्रपती संभाजीनगरमधील सातारा गावाजवळील वल्मी तलावात रविवारी सायंकाळी एका अंदाजे २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पदमपुरा अग्निशमन पथकाच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबवून संबंधित तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह सातारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले पुढील तपास करत आहेत. ही बचाव मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने यशस्वीरीत्या पार पाडली.2