logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे विधान केले आहे.

16 hrs ago
user_विष्णु आखरे पाटील
विष्णु आखरे पाटील
पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
16 hrs ago

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे विधान केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा संपूर्ण देशातील तरुणाईचा विजय असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते अतुल सिरसाट यांनी केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना अतुल सिरसाट यांनी हा देशातील युवा वर्गाचा मोठा विजय असल्याचे स्पष्ट केले आहे.
    1
    केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा संपूर्ण देशातील तरुणाईचा विजय असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते अतुल सिरसाट यांनी केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना अतुल सिरसाट यांनी हा देशातील युवा वर्गाचा मोठा विजय असल्याचे स्पष्ट केले आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे हित जपणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी करणे आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण मंत्रालयाची धुरा स्वीकारताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा सन्मान करत शिक्षण अधिक आधुनिक, सर्वसमावेशक आणि रोजगाराभिमुख करण्यासाठी काम केले जाईल अशी ग्वाही दिली. याशिवाय देशातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावणे, डिजिटल शिक्षणाचा विस्तार करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे ही सरकारची प्रमुख उद्दिष्टे असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
    1
    केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे हित जपणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी करणे आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण मंत्रालयाची धुरा स्वीकारताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा सन्मान करत शिक्षण अधिक आधुनिक, सर्वसमावेशक आणि रोजगाराभिमुख करण्यासाठी काम केले जाईल अशी ग्वाही दिली. याशिवाय देशातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावणे, डिजिटल शिक्षणाचा विस्तार करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे ही सरकारची प्रमुख उद्दिष्टे असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सिल्लोड येथे विविध कार्यक्रम पार पडले असून ते उत्साहात संपन्न झाले आहेत. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सिल्लोड येथे विविध कार्यक्रम पार पडले असून ते उत्साहात संपन्न झाले आहेत. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मातोश्री नथिबाई प्रायमरी व प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदुंगाचा गजर, भगवे झेंडे आणि 'विठ्ठल-विठ्ठल' नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवदास सोळंके यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अनिल भगत यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत आणि देव-देवतांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भगवान श्रीविठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आदी संत महात्म्यांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-मृदुंग आणि भगवे झेंडे घेऊन निघालेली शिस्तबद्ध दिंडी विद्यालयाच्या आवारातील मार्गावरून मार्गस्थ झाली. चिमुकल्यांच्या निरागस अभिव्यक्तीने आणि भक्तीभावाने उपस्थितांची मने जिंकून घेतली असून प्रांगणात जमलेल्या पालक व नागरिकांचे विशेष लक्ष वेधले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षिका ज्योती खवले, गीता तेटू, रुचिता कुरवाडे, वर्षा वंडाळे, अर्चना मिसाळ, अश्विनी दामधर, उज्ज्वला धुर्डे, निकीता धुळे, दिपाली नानग्दे, साक्षी ताडे आणि श्रृती वसुले यांनी मोलाचे नियोजन केले. तसेच विशाल वसुलकार, रामेश्वर कुनगाडे, अभिषेक वंडाळे आणि आशा वसुलकार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या भव्य सोहळ्यामुळे सुनगाव नगरी काही वेळ पूर्णपणे विठ्ठलमय झाली होती.
    1
    जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मातोश्री नथिबाई प्रायमरी व प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदुंगाचा गजर, भगवे झेंडे आणि 'विठ्ठल-विठ्ठल' नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवदास सोळंके यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अनिल भगत यांची विशेष उपस्थिती होती.

या सोहळ्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत आणि देव-देवतांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भगवान श्रीविठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आदी संत महात्म्यांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-मृदुंग आणि भगवे झेंडे घेऊन निघालेली शिस्तबद्ध दिंडी विद्यालयाच्या आवारातील मार्गावरून मार्गस्थ झाली. चिमुकल्यांच्या निरागस अभिव्यक्तीने आणि भक्तीभावाने उपस्थितांची मने जिंकून घेतली असून प्रांगणात जमलेल्या पालक व नागरिकांचे विशेष लक्ष वेधले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षिका ज्योती खवले, गीता तेटू, रुचिता कुरवाडे, वर्षा वंडाळे, अर्चना मिसाळ, अश्विनी दामधर, उज्ज्वला धुर्डे, निकीता धुळे, दिपाली नानग्दे, साक्षी ताडे आणि श्रृती वसुले यांनी मोलाचे नियोजन केले. तसेच विशाल वसुलकार, रामेश्वर कुनगाडे, अभिषेक वंडाळे आणि आशा वसुलकार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या भव्य सोहळ्यामुळे सुनगाव नगरी काही वेळ पूर्णपणे विठ्ठलमय झाली होती.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शेगाव येथील श्री मस्कुजी बिरुजी बुरुंगले विद्यालयात अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय रामकृष्ण हरी" या अखंड नामघोषाने संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा वेश परिधान करून टाळ, मृदुंग, वीणा, भगवे पताके आणि तुळशी वृंदावनासह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेची पालखी खांद्यावर घेत विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली असून अभंग, भारूड आणि हरिनामाच्या गजराने परिसरात भक्तीचा अनोखा रंग भरला. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती, भक्तीभाव, सामाजिक ऐक्य, शिस्त आणि नैतिक मूल्ये रुजविणे हा या दिंडी सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. या सोहळ्यादरम्यान शिक्षकांनी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, तसेच संतांच्या विचारांचे आचरण स्वतःच्या जीवनात करण्याचे आवाहनही केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा दिंडी सोहळा अत्यंत यशस्वी ठरला. भक्ती, संस्कार आणि एकतेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    1
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शेगाव येथील श्री मस्कुजी बिरुजी बुरुंगले विद्यालयात अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय रामकृष्ण हरी" या अखंड नामघोषाने संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा वेश परिधान करून टाळ, मृदुंग, वीणा, भगवे पताके आणि तुळशी वृंदावनासह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेची पालखी खांद्यावर घेत विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली असून अभंग, भारूड आणि हरिनामाच्या गजराने परिसरात भक्तीचा अनोखा रंग भरला.

विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती, भक्तीभाव, सामाजिक ऐक्य, शिस्त आणि नैतिक मूल्ये रुजविणे हा या दिंडी सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. या सोहळ्यादरम्यान शिक्षकांनी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, तसेच संतांच्या विचारांचे आचरण स्वतःच्या जीवनात करण्याचे आवाहनही केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा दिंडी सोहळा अत्यंत यशस्वी ठरला. भक्ती, संस्कार आणि एकतेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    14 hrs ago
  • केंद्रस्तरीय नीट परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराने भारत सरकार अपमानित झाले आहे, असे विधान माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे.
    1
    केंद्रस्तरीय नीट परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराने भारत सरकार अपमानित झाले आहे, असे विधान माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरच थांबणे पसंत केले. वाघ परिसरातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत हे कर्मचारी सुमारे एक तास विद्युत खांबावरच अडकून राहिले. वन विभाग आणि स्थानिकांकडून परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरच थांबणे पसंत केले. वाघ परिसरातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत हे कर्मचारी सुमारे एक तास विद्युत खांबावरच अडकून राहिले.

वन विभाग आणि स्थानिकांकडून परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • श्री क्षेत्र वैष्णव गडावर भक्तीचा महासागर पाहायला मिळाला आहे. या भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांनी उपस्थित राहून पांडुरंगाचे दर्शन घेतले.
    1
    श्री क्षेत्र वैष्णव गडावर भक्तीचा महासागर पाहायला मिळाला आहे. या भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांनी उपस्थित राहून पांडुरंगाचे दर्शन घेतले.
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फरार पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी बाळापूर येथील अकोला नाका परिसरात मृतदेह रस्त्यावर ठेवून जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन वडगावे याच्या अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलीचा १३ दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना, आक्रमक झालेल्या पीडित कुटुंबीयांनी आणि हजारो गावकऱ्यांनी अकोला नाक्यावर मृतदेहासह रास्ता रोको सुरू केला. आरोपी पोलिसाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी आंदोलकांनी केली असून, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
    1
    अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फरार पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी बाळापूर येथील अकोला नाका परिसरात मृतदेह रस्त्यावर ठेवून जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन वडगावे याच्या अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलीचा १३ दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना, आक्रमक झालेल्या पीडित कुटुंबीयांनी आणि हजारो गावकऱ्यांनी अकोला नाक्यावर मृतदेहासह रास्ता रोको सुरू केला. आरोपी पोलिसाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी आंदोलकांनी केली असून, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer बाळापूर, अकोला, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.