अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फरार पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी बाळापूर येथील अकोला नाका परिसरात मृतदेह रस्त्यावर ठेवून जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन वडगावे याच्या अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलीचा १३ दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना, आक्रमक झालेल्या पीडित कुटुंबीयांनी आणि हजारो गावकऱ्यांनी अकोला नाक्यावर मृतदेहासह रास्ता रोको सुरू केला. आरोपी पोलिसाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी आंदोलकांनी केली असून, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फरार पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी बाळापूर येथील अकोला नाका परिसरात मृतदेह रस्त्यावर ठेवून जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन वडगावे याच्या अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलीचा १३ दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना, आक्रमक झालेल्या पीडित कुटुंबीयांनी आणि हजारो गावकऱ्यांनी अकोला नाक्यावर मृतदेहासह रास्ता रोको सुरू केला. आरोपी पोलिसाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी आंदोलकांनी केली असून, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शेगाव येथील श्री मस्कुजी बिरुजी बुरुंगले विद्यालयात अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय रामकृष्ण हरी" या अखंड नामघोषाने संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा वेश परिधान करून टाळ, मृदुंग, वीणा, भगवे पताके आणि तुळशी वृंदावनासह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेची पालखी खांद्यावर घेत विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली असून अभंग, भारूड आणि हरिनामाच्या गजराने परिसरात भक्तीचा अनोखा रंग भरला. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती, भक्तीभाव, सामाजिक ऐक्य, शिस्त आणि नैतिक मूल्ये रुजविणे हा या दिंडी सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. या सोहळ्यादरम्यान शिक्षकांनी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, तसेच संतांच्या विचारांचे आचरण स्वतःच्या जीवनात करण्याचे आवाहनही केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा दिंडी सोहळा अत्यंत यशस्वी ठरला. भक्ती, संस्कार आणि एकतेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.1
- केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खामगाव येथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी नगर परिषद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार जल्लोष करण्यात आला. या राजीनाम्यामुळे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचा विजय झाल्याची तीव्र भावना विद्यार्थी कृती समितीने व्यक्त केली आहे. या उत्साहाच्या वेळी विद्यार्थ्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला आनंद साजरा केला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा विजय उत्सव साजरा केला.4
- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मातोश्री नथिबाई प्रायमरी व प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य रिंगण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदुंगाचा गजर, भगवे झेंडे आणि 'विठ्ठल-विठ्ठल' नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवदास सोळंके यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अनिल भगत यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत आणि देव-देवतांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भगवान श्रीविठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आदी संत महात्म्यांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ-मृदुंग आणि भगवे झेंडे घेऊन निघालेली शिस्तबद्ध दिंडी विद्यालयाच्या आवारातील मार्गावरून मार्गस्थ झाली. चिमुकल्यांच्या निरागस अभिव्यक्तीने आणि भक्तीभावाने उपस्थितांची मने जिंकून घेतली असून प्रांगणात जमलेल्या पालक व नागरिकांचे विशेष लक्ष वेधले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षिका ज्योती खवले, गीता तेटू, रुचिता कुरवाडे, वर्षा वंडाळे, अर्चना मिसाळ, अश्विनी दामधर, उज्ज्वला धुर्डे, निकीता धुळे, दिपाली नानग्दे, साक्षी ताडे आणि श्रृती वसुले यांनी मोलाचे नियोजन केले. तसेच विशाल वसुलकार, रामेश्वर कुनगाडे, अभिषेक वंडाळे आणि आशा वसुलकार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या भव्य सोहळ्यामुळे सुनगाव नगरी काही वेळ पूर्णपणे विठ्ठलमय झाली होती.1
- अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील शासकीय धान्य गोदामाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. सततच्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कचरा आणि झुडपांमुळे लाखो रुपयांचे शासकीय अन्नधान्य धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. गोदाम परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून तेथे काम करणाऱ्या हमाल आणि कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छ शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. पुरवठा विभागाच्या या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे लिटिल चॅम्प्स कॉन्व्हेंट आणि नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा अनोखा सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडला. या वेळी लहान विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात पारंपरिक दिंडी काढली. या सोहळ्यामुळे संपूर्ण मुंडगाव परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून मुंडगावात जणू पंढरपूरच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. या दिंडीत विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका आणि पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी "विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल..." असा अखंड नामघोष करत पंढरपूरच्या वारीचा अनुभव साकारला. बालकांच्या या निरागस भक्तीभावाने आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच भक्ती, समता, सेवाभाव आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजावीत, या उद्देशाने शाळेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता पिंपळे, संचालिका योगिताताई पिंपळे यांच्यासह चंचल देवगिरे, गायत्री येवतकर, तृप्ती सांगोळे, स्वाती सुरपाटणे, निकिता दहीभात, निकिता वानखडे, वंदना म्हैसने, इतर शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारकरी परंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या शाळेच्या या उपक्रमाचे नागरिक व पालकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.1
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थमंत्र्यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेताना 'हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत' असा थेट हल्लाबोल जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.1
- बुलढाणा येथे सामाजिक भान जपत ठाकरे सेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर, रुग्णालयात फळवाटप आणि विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.1
- अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फरार पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी बाळापूर येथील अकोला नाका परिसरात मृतदेह रस्त्यावर ठेवून जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन वडगावे याच्या अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या या अल्पवयीन मुलीचा १३ दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना, आक्रमक झालेल्या पीडित कुटुंबीयांनी आणि हजारो गावकऱ्यांनी अकोला नाक्यावर मृतदेहासह रास्ता रोको सुरू केला. आरोपी पोलिसाला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी आंदोलकांनी केली असून, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण बाळापूर शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.1