logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे लिटिल चॅम्प्स कॉन्व्हेंट आणि नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा अनोखा सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडला. या वेळी लहान विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात पारंपरिक दिंडी काढली. या सोहळ्यामुळे संपूर्ण मुंडगाव परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून मुंडगावात जणू पंढरपूरच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. या दिंडीत विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका आणि पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी "विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल..." असा अखंड नामघोष करत पंढरपूरच्या वारीचा अनुभव साकारला. बालकांच्या या निरागस भक्तीभावाने आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच भक्ती, समता, सेवाभाव आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजावीत, या उद्देशाने शाळेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता पिंपळे, संचालिका योगिताताई पिंपळे यांच्यासह चंचल देवगिरे, गायत्री येवतकर, तृप्ती सांगोळे, स्वाती सुरपाटणे, निकिता दहीभात, निकिता वानखडे, वंदना म्हैसने, इतर शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारकरी परंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या शाळेच्या या उपक्रमाचे नागरिक व पालकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

22 hrs ago
user_राजकुमार वानखडे राज
राजकुमार वानखडे राज
News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
22 hrs ago

आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे लिटिल चॅम्प्स कॉन्व्हेंट आणि नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा अनोखा सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडला. या वेळी लहान विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात पारंपरिक दिंडी काढली. या सोहळ्यामुळे संपूर्ण मुंडगाव परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून मुंडगावात जणू पंढरपूरच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. या दिंडीत विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका आणि पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी "विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल..." असा अखंड नामघोष करत पंढरपूरच्या वारीचा अनुभव साकारला. बालकांच्या या निरागस भक्तीभावाने आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच भक्ती, समता, सेवाभाव आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजावीत, या उद्देशाने शाळेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता पिंपळे, संचालिका योगिताताई पिंपळे यांच्यासह चंचल देवगिरे, गायत्री येवतकर, तृप्ती सांगोळे, स्वाती सुरपाटणे, निकिता दहीभात, निकिता वानखडे, वंदना म्हैसने, इतर शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारकरी परंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या शाळेच्या या उपक्रमाचे नागरिक व पालकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.

More news from Amravati and nearby areas
  • चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील 'गणेश इन' सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य 'महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि प्रशासकीय कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध महसुली कामांचा तात्काळ निपटारा करून शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्षा सौ. अर्चना अडसड (रोठे अक्का), उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि महसूल विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील 'गणेश इन' सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य 'महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि प्रशासकीय कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध महसुली कामांचा तात्काळ निपटारा करून शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्षा सौ. अर्चना अडसड (रोठे अक्का), उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि महसूल विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    8 hrs ago
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थमंत्र्यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेताना 'हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत' असा थेट हल्लाबोल जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.
    1
    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थमंत्र्यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेताना 'हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत' असा थेट हल्लाबोल जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • २४ जुलैच्या मध्यरात्री शेगाव-खामगाव मार्गावर गस्त घालत असताना खामगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (संरक्षण) पथकाला अवैध लाकूड वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे माउली अभियांत्रिकी कॉलेजजवळ एम.पी. ०९ एचजी ०२७५ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात ११ घनमीटर जळाऊ लाकूड आढळून आले. लाकूड वाहतुकीचा कोणताही वैध परवाना न आढळल्याने सिंधीपुरा, बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील ३२ वर्षीय ट्रक चालक मोहम्मद मोसीन मोहम्मद यासीन याच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वनविभागाने १३ हजार ९३७ रुपयांचे जळाऊ लाकूड आणि ५ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा एकूण ५ लाख ६३ हजार ९३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी (दक्षता) कमलेश पाटील आणि सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने केली. वनविभागाने अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    1
    २४ जुलैच्या मध्यरात्री शेगाव-खामगाव मार्गावर गस्त घालत असताना खामगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (संरक्षण) पथकाला अवैध लाकूड वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे माउली अभियांत्रिकी कॉलेजजवळ एम.पी. ०९ एचजी ०२७५ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात ११ घनमीटर जळाऊ लाकूड आढळून आले. लाकूड वाहतुकीचा कोणताही वैध परवाना न आढळल्याने सिंधीपुरा, बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील ३२ वर्षीय ट्रक चालक मोहम्मद मोसीन मोहम्मद यासीन याच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत वनविभागाने १३ हजार ९३७ रुपयांचे जळाऊ लाकूड आणि ५ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा एकूण ५ लाख ६३ हजार ९३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी (दक्षता) कमलेश पाटील आणि सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने केली. वनविभागाने अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    21 hrs ago
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे विधान केले आहे.
    1
    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे विधान केले आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • बुलढाणा येथे सामाजिक भान जपत ठाकरे सेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर, रुग्णालयात फळवाटप आणि विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    1
    बुलढाणा येथे सामाजिक भान जपत ठाकरे सेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर, रुग्णालयात फळवाटप आणि विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा संपूर्ण देशातील तरुणाईचा विजय असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते अतुल सिरसाट यांनी केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना अतुल सिरसाट यांनी हा देशातील युवा वर्गाचा मोठा विजय असल्याचे स्पष्ट केले आहे.
    1
    केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा संपूर्ण देशातील तरुणाईचा विजय असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते अतुल सिरसाट यांनी केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना अतुल सिरसाट यांनी हा देशातील युवा वर्गाचा मोठा विजय असल्याचे स्पष्ट केले आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील आर्वी बसस्थानकावर जागोजागी अत्यंत मोठे खड्डे पडले असून बसेसच्या येण्या-जाण्याच्या मुख्य मार्गावरच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकातून बसेस बाहेर जाताना आणि आत येताना बसची बॉडी खड्ड्यांमध्ये आदळत आहे. याच गाड्यांमधून दररोज प्रवासी आणि शालेय विद्यार्थी प्रवास करत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून अपघाताची दाट शक्यता बनली आहे. जुलै महिना सुरू झाला तरीही बसस्थानकावरील हे खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. या बसस्थानकाच्या नवीन सिमेंटिंकरण आणि मजबुतीकरणासाठी ₹3 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, तरीही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. कोणतेही कारण नसताना वर्षानुवर्षे कामे लांबवत ठेवण्याची प्रथाच आर्वीचे स्थानिक लोकप्रतिनिधी चालवत आहेत. स्थानिक विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, राज्यसभा खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गाढ झोपेत आहेत. तसेच राज्याचे परिवहन मंत्री आणि मुंबईतील महामंडळ प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून त्यांना स्थानिक नागरिकांची कोणतीही काळजी नसल्याची स्थिती आहे. या सर्व प्रकारावर आम आदमी पार्टी आर्वीचे संयोजक अक्षय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिवहन मंत्री आणि राज्य सरकारने या समस्येची तात्काळ दखल घेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
    4
    वर्धा जिल्ह्यातील आर्वी बसस्थानकावर जागोजागी अत्यंत मोठे खड्डे पडले असून बसेसच्या येण्या-जाण्याच्या मुख्य मार्गावरच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकातून बसेस बाहेर जाताना आणि आत येताना बसची बॉडी खड्ड्यांमध्ये आदळत आहे. याच गाड्यांमधून दररोज प्रवासी आणि शालेय विद्यार्थी प्रवास करत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून अपघाताची दाट शक्यता बनली आहे. जुलै महिना सुरू झाला तरीही बसस्थानकावरील हे खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत.

या बसस्थानकाच्या नवीन सिमेंटिंकरण आणि मजबुतीकरणासाठी ₹3 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, तरीही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. कोणतेही कारण नसताना वर्षानुवर्षे कामे लांबवत ठेवण्याची प्रथाच आर्वीचे स्थानिक लोकप्रतिनिधी चालवत आहेत. स्थानिक विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, राज्यसभा खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गाढ झोपेत आहेत. तसेच राज्याचे परिवहन मंत्री आणि मुंबईतील महामंडळ प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून त्यांना स्थानिक नागरिकांची कोणतीही काळजी नसल्याची स्थिती आहे.

या सर्व प्रकारावर आम आदमी पार्टी आर्वीचे संयोजक अक्षय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिवहन मंत्री आणि राज्य सरकारने या समस्येची तात्काळ दखल घेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
    user_अक्षय विलासराव राऊत
    अक्षय विलासराव राऊत
    आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीत स्नान करताना पाण्यात बुडणाऱ्या एका भाविकाला वाशिम जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी तत्परतेने सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत. चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना हा भाविक पाण्यात बुडत असल्याचे पथकाच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पथकाने प्रसंगावधान राखत बचावकार्य सुरू केले आणि एक मोठा अनर्थ टळला. आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी व नदीपात्रात दुर्घटना घडण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असतात. 'सेवा हीच खरी भक्ती' याचा प्रत्यय देत भाविकाला जीवनदान देणाऱ्या वाशिमच्या स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याचे उपस्थित भाविकांकडून मोठे कौतुक होत असून हे पथक बुडणाऱ्या भाविकासाठी देवदूत ठरले आहे.
    4
    पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीत स्नान करताना पाण्यात बुडणाऱ्या एका भाविकाला वाशिम जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी तत्परतेने सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत. चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना हा भाविक पाण्यात बुडत असल्याचे पथकाच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पथकाने प्रसंगावधान राखत बचावकार्य सुरू केले आणि एक मोठा अनर्थ टळला.

आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी व नदीपात्रात दुर्घटना घडण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असतात. 'सेवा हीच खरी भक्ती' याचा प्रत्यय देत भाविकाला जीवनदान देणाऱ्या वाशिमच्या स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याचे उपस्थित भाविकांकडून मोठे कौतुक होत असून हे पथक बुडणाऱ्या भाविकासाठी देवदूत ठरले आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.