logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

२४ जुलैच्या मध्यरात्री शेगाव-खामगाव मार्गावर गस्त घालत असताना खामगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (संरक्षण) पथकाला अवैध लाकूड वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे माउली अभियांत्रिकी कॉलेजजवळ एम.पी. ०९ एचजी ०२७५ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात ११ घनमीटर जळाऊ लाकूड आढळून आले. लाकूड वाहतुकीचा कोणताही वैध परवाना न आढळल्याने सिंधीपुरा, बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील ३२ वर्षीय ट्रक चालक मोहम्मद मोसीन मोहम्मद यासीन याच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वनविभागाने १३ हजार ९३७ रुपयांचे जळाऊ लाकूड आणि ५ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा एकूण ५ लाख ६३ हजार ९३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी (दक्षता) कमलेश पाटील आणि सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने केली. वनविभागाने अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

16 hrs ago
user_SHEGAONlive
SHEGAONlive
Local News Reporter Buldana, Buldhana•
16 hrs ago

२४ जुलैच्या मध्यरात्री शेगाव-खामगाव मार्गावर गस्त घालत असताना खामगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (संरक्षण) पथकाला अवैध लाकूड वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे माउली अभियांत्रिकी कॉलेजजवळ एम.पी. ०९ एचजी ०२७५ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात ११ घनमीटर जळाऊ लाकूड आढळून आले. लाकूड वाहतुकीचा कोणताही वैध परवाना न आढळल्याने सिंधीपुरा, बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील ३२ वर्षीय ट्रक चालक मोहम्मद मोसीन मोहम्मद यासीन याच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वनविभागाने १३ हजार ९३७ रुपयांचे जळाऊ लाकूड आणि ५ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा एकूण ५ लाख ६३ हजार ९३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी (दक्षता) कमलेश पाटील आणि सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने केली. वनविभागाने अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थमंत्र्यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेताना 'हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत' असा थेट हल्लाबोल जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.
    1
    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थमंत्र्यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेताना 'हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत' असा थेट हल्लाबोल जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • २४ जुलैच्या मध्यरात्री शेगाव-खामगाव मार्गावर गस्त घालत असताना खामगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (संरक्षण) पथकाला अवैध लाकूड वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे माउली अभियांत्रिकी कॉलेजजवळ एम.पी. ०९ एचजी ०२७५ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात ११ घनमीटर जळाऊ लाकूड आढळून आले. लाकूड वाहतुकीचा कोणताही वैध परवाना न आढळल्याने सिंधीपुरा, बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील ३२ वर्षीय ट्रक चालक मोहम्मद मोसीन मोहम्मद यासीन याच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वनविभागाने १३ हजार ९३७ रुपयांचे जळाऊ लाकूड आणि ५ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा एकूण ५ लाख ६३ हजार ९३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी (दक्षता) कमलेश पाटील आणि सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने केली. वनविभागाने अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    1
    २४ जुलैच्या मध्यरात्री शेगाव-खामगाव मार्गावर गस्त घालत असताना खामगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (संरक्षण) पथकाला अवैध लाकूड वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे माउली अभियांत्रिकी कॉलेजजवळ एम.पी. ०९ एचजी ०२७५ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात ११ घनमीटर जळाऊ लाकूड आढळून आले. लाकूड वाहतुकीचा कोणताही वैध परवाना न आढळल्याने सिंधीपुरा, बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील ३२ वर्षीय ट्रक चालक मोहम्मद मोसीन मोहम्मद यासीन याच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत वनविभागाने १३ हजार ९३७ रुपयांचे जळाऊ लाकूड आणि ५ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा एकूण ५ लाख ६३ हजार ९३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी (दक्षता) कमलेश पाटील आणि सहायक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने केली. वनविभागाने अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतुकीविरोधात कारवाईचा बडगा उगारल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    16 hrs ago
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे विधान केले आहे.
    1
    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याचे विधान केले आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खामगाव येथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी नगर परिषद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार जल्लोष करण्यात आला. या राजीनाम्यामुळे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचा विजय झाल्याची तीव्र भावना विद्यार्थी कृती समितीने व्यक्त केली आहे. या उत्साहाच्या वेळी विद्यार्थ्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला आनंद साजरा केला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा विजय उत्सव साजरा केला.
    4
    केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खामगाव येथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी नगर परिषद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार जल्लोष करण्यात आला. या राजीनाम्यामुळे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचा विजय झाल्याची तीव्र भावना विद्यार्थी कृती समितीने व्यक्त केली आहे.

या उत्साहाच्या वेळी विद्यार्थ्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला आनंद साजरा केला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा विजय उत्सव साजरा केला.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • भोकरदनकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात डॉ. निर्मळ यांच्या "पार्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि दातांचा दवाखाना" या रुग्णालयाचा भव्य शुभारंभ होणार आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी पार पडणार आहे.
    1
    भोकरदनकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात डॉ. निर्मळ यांच्या "पार्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि दातांचा दवाखाना" या रुग्णालयाचा भव्य शुभारंभ होणार आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी पार पडणार आहे.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर अजिंठा पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर अजिंठा पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बुलढाणा येथे सामाजिक भान जपत ठाकरे सेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर, रुग्णालयात फळवाटप आणि विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    1
    बुलढाणा येथे सामाजिक भान जपत ठाकरे सेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर, रुग्णालयात फळवाटप आणि विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे नैसर्गिक आपत्तीचे संकट निर्माण झाले आहे. तंगमार्ग परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून प्रभावित भागात बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
    1
    जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे नैसर्गिक आपत्तीचे संकट निर्माण झाले आहे. तंगमार्ग परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून प्रभावित भागात बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.