अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील एक अनोखा सोहळा समोर आला आहे. पाथर्डी एसटी आगारातील वाहक बाळासाहेब विठ्ठल शिंदे यांच्या पत्नी प्रणाली बाळासाहेब शिंदे या स्वतः ट्रॅक्टर चालवत वै.ह.भ.प. सोपान महाराज ढाकणे यांच्या दिंडीतील रथ थेट पंढरीच्या वारीला घेऊन निघाल्या आहेत. सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले असून सर्वच क्षेत्रात त्याचा फायदा महिला घेऊ लागल्या आहेत, याचेच एक उत्तम उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळत आहे. बाळासाहेब शिंदे यांनी शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केला होता, जो चालवायला त्यांची पत्नी प्रणाली शिंदे शिकल्या होत्या. वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. बाबसाहेब मतकर महाराज यांनी त्यांना सोपान महाराज ढाकणे यांच्या पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंडीत येण्याची विनंती केली. त्यावर प्रणाली यांनी स्वतःचा ट्रॅक्टर दिंडीत आणून विठूरायाचे दर्शन घडवण्याची परवानगी मागितली. महाराजांनी परवानगी देताच त्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरला रथ जोडून या रथाचे सारथ्य करण्याचे निश्चित केले. दिंडीच्या प्रस्थानावेळी जवखेडे खालसा-वाघोली गावाच्या सीमेवर असलेल्या वै.ह.भ.प. सोपान महाराज ढाकणे यांच्या समाधीची वेद शास्त्र संपन्न भटजी विष्णूपंत भालेराव यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. रामहरी विठ्ठल मतकर यांनी एकादशी निमित्त खिचडी फराळाची पंगत दिली. टाळ-मृदंग, शिवशंभो सनी चौघडा वाद्य पार्टीच्या वाद्यांचा दणदणाट आणि तोफांच्या सलामीत गावातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. गावचे सरपंच चारूदत वाघ पाटील यांनी सोपान महाराज ढाकणे यांचे चिरंजीव राजेंद्र ढाकणे, ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर, सर व्यवस्थापक रमेशराव दातीर आणि विणेकरी ज्ञानदेव महाराज ढाकणे यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला. या प्रवासादरम्यान जागोजागी विविध मंदिरांच्या परिसरात दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांच्या सोयीसाठी कासार वाडीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कासार यांनी खिचडीची पंगत दिली, तर फिनोलेक्स पाईप कंपनीचे संचालक व्यवहारे साहेब यांनी पिशव्यांचे वाटप केले. तिसगाव येथील साई हॉस्पिटलचे डॉक्टर अच्युतराव हनुमंत चितळे यांनी चहापाण्याची व्यवस्था केली. तसेच रामदास ससाणे यांच्या वस्तीवर मुक्काम करून अशोक ससाणे यांनी नाष्टा दिला. लक्ष्मणराव कर्डिले यांनी प्रीती भोजन दिले, तर अंकुश शिरसाठ यांनी सावरगाव फाटा येथे नाष्टा दिला. गंगादेवी येथे मुक्काम करून ही दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली असून २३ जुलै रोजी पंढरीला पोहोचेल असे संयोजकांनी सांगितले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील एक अनोखा सोहळा समोर आला आहे. पाथर्डी एसटी आगारातील वाहक बाळासाहेब विठ्ठल शिंदे यांच्या पत्नी प्रणाली बाळासाहेब शिंदे या स्वतः ट्रॅक्टर चालवत वै.ह.भ.प. सोपान महाराज ढाकणे यांच्या दिंडीतील रथ थेट पंढरीच्या वारीला घेऊन निघाल्या आहेत. सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले असून सर्वच क्षेत्रात त्याचा फायदा महिला घेऊ लागल्या आहेत, याचेच एक उत्तम उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळत आहे. बाळासाहेब शिंदे यांनी शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केला होता, जो चालवायला त्यांची पत्नी प्रणाली शिंदे शिकल्या होत्या. वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. बाबसाहेब मतकर महाराज यांनी त्यांना सोपान महाराज ढाकणे यांच्या पंढरपूर येथे जाणाऱ्या दिंडीत येण्याची विनंती केली. त्यावर प्रणाली यांनी स्वतःचा ट्रॅक्टर दिंडीत आणून विठूरायाचे दर्शन घडवण्याची परवानगी मागितली. महाराजांनी परवानगी देताच त्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरला रथ जोडून या रथाचे सारथ्य करण्याचे निश्चित केले. दिंडीच्या प्रस्थानावेळी जवखेडे खालसा-वाघोली गावाच्या सीमेवर असलेल्या वै.ह.भ.प. सोपान महाराज ढाकणे यांच्या समाधीची वेद शास्त्र संपन्न भटजी विष्णूपंत भालेराव यांच्या हस्ते विधीवत पूजा
करण्यात आली. रामहरी विठ्ठल मतकर यांनी एकादशी निमित्त खिचडी फराळाची पंगत दिली. टाळ-मृदंग, शिवशंभो सनी चौघडा वाद्य पार्टीच्या वाद्यांचा दणदणाट आणि तोफांच्या सलामीत गावातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. गावचे सरपंच चारूदत वाघ पाटील यांनी सोपान महाराज ढाकणे यांचे चिरंजीव राजेंद्र ढाकणे, ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर, सर व्यवस्थापक रमेशराव दातीर आणि विणेकरी ज्ञानदेव महाराज ढाकणे यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला. या प्रवासादरम्यान जागोजागी विविध मंदिरांच्या परिसरात दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांच्या सोयीसाठी कासार वाडीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कासार यांनी खिचडीची पंगत दिली, तर फिनोलेक्स पाईप कंपनीचे संचालक व्यवहारे साहेब यांनी पिशव्यांचे वाटप केले. तिसगाव येथील साई हॉस्पिटलचे डॉक्टर अच्युतराव हनुमंत चितळे यांनी चहापाण्याची व्यवस्था केली. तसेच रामदास ससाणे यांच्या वस्तीवर मुक्काम करून अशोक ससाणे यांनी नाष्टा दिला. लक्ष्मणराव कर्डिले यांनी प्रीती भोजन दिले, तर अंकुश शिरसाठ यांनी सावरगाव फाटा येथे नाष्टा दिला. गंगादेवी येथे मुक्काम करून ही दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली असून २३ जुलै रोजी पंढरीला पोहोचेल असे संयोजकांनी सांगितले आहे.
- औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पिशोर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मोठा दणका बसला आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळून जाणाऱ्या जळगाव महामार्गावर वर्षानुवर्षे उभे असलेले व शेकडो पक्ष्यांचा आसरा असलेले पिंपळाचे महाकाय झाड कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय किंवा वन विभागाच्या हस्तक्षेपाशिवाय मुळासकट तोडण्यात आले आहे. विकासकामांच्या नावाखाली किंवा हलगर्जीपणामुळे घडलेल्या या वृक्षतोडीमुळे निसर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, भरदिवसा सर्रासपणे चाललेल्या या कृत्याचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे. या पिंपळाच्या झाडानंतर आता जवळच असलेल्या एका वडाच्या झाडावरही कुऱ्हाड चालवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. निसर्गाचा मोठा ऱ्हास करणाऱ्या या कृत्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या वृक्षतोडीमुळे प्रशासनाच्या कारभारावर आणि हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्गाच्या कडेला असलेल्या या झाडांची तोडणी करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेतली होती का, आणि जर परवानगी होती तर पर्यायी झाडे कुठे लावली आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिल्लोड महसूल विभाग आणि वन विभागाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि पुढील वडाचे झाड वाचवावे, अशी मागणी भवनचे ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत.1
- औरंगाबादमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यपद्धती आणि विकासकामांबाबत विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसून, तो केवळ काही मोजक्याच व्यक्तींना मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विविध कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, विरोधकांकडून झालेल्या या आरोपांवर आमदार अब्दुल सत्तार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही।1
- बुलढाणा येथील आमदार मनोज कायंदे यांनी शिक्षकांवरील अतिरिक्त भार कमी करून यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांच्यावर पुन्हा दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतात पेरणी करूनही शेती संपूर्णपणे रिकामीच राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, त्यांना आता पुन्हा एकदा पेरणी करावी लागत आहे.1
- अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतात पेरणी करून तब्बल दहा दिवस उलटून गेले तरी कोंब न फुटल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. कर्ज काढून आणि घाम गाळून खरेदी केलेले बियाणे बोगस निघाल्याचा थेट आरोप करत शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि जाब विचारला. कृषी अधिकाऱ्यांसमोर संतप्त शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला. "आमच्या मुलाबाळांना कसं जगवायचं, त्यांचं शिक्षण कसं करायचं?" असा हृदयद्रावक सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली. बोगस बियाण्यांच्या या वाढत्या प्रकारामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.1
- महाराष्ट्रात शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले असून सरकारला त्यांच्यासमोर झुकावे लागले आहे. रोहितदादा पवार यांच्या पुढाकाराने हा लढा यशस्वी झाला आहे. शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी दाखवलेल्या या एकजुटीच्या लढ्याला यश आल्याचे प्रसन्नजित पाटील यांनी म्हटले आहे.1
- छत्रपती संभाजीनगरच्या प्रतापनगर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. व्यावसायिक संजय लाहोटी यांच्या बंगल्यावरील सशस्त्र दरोड्याला अवघे सहा दिवस उलटत नाही तोच, याच परिसरात पुन्हा एक मोठी चोरी झाली आहे. घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती देशमुख या कामानिमित्त बाहेरगावी गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घरावर डल्ला मारला. पहाटे सुमारे ३:४५ वाजता दोन शस्त्रधारी चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला आणि लोखंडी लॅच लॉक, लाकडी दरवाजाची चौकट व कपाट फोडून अवघ्या २० मिनिटांत चोरी करून पसार झाले. चोरट्यांनी घरातून सुमारे ९ तोळे सोने, दीड किलो चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या डॉ. देशमुख यांना पोलिस ठाण्यात वीजपुरवठा नसणे आणि अधिकारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत तब्बल १० तास हेलपाटे मारावे लागल्याचा आरोप आहे. तसेच, घटनेनंतर जवळपास १२ तासांनी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. लाहोटी यांच्या बंगल्यातील दरोड्याप्रमाणेच या चोरीतही दरवाजे फोडण्याची सारखीच पद्धत वापरण्यात आल्याने, दोन्ही गुन्ह्यांमागे एकाच टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लागोपाठच्या चोऱ्यांमुळे प्रतापनगर परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले असून रहिवाशांनी पोलिसांकडे रात्रगस्त वाढविण्याची मागणी केली आहे.2