तहसील व एसडीओ कार्यालयात कर्मचाऱ्यांचा संप — जनतेची उन्हात होरपळ, प्रशासन कुठे झोपले? उमरखेड तहसील कार्यालय व एसडीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सर्वसामान्य जनतेचे अक्षरशः हाल होत आहेत. सरकारी कामांसाठी दुर्गम व बंदी भागातून आलेले नागरिक दिवसभर उन्हात ताटकळत उभे राहून त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तहसील व एसडीओ कार्यालयातील अत्यावश्यक सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, जमीन नोंदी, विविध अर्ज प्रक्रिया या कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. विशेषतः शेतकरी, महिला व वृद्ध नागरिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. “आम्ही 20-30 किमी अंतरावरून पैसे खर्च करून आलो, पण इथे येऊन कळतं की कर्मचारी संपावर आहेत. ना कोणती सूचना, ना पर्यायी व्यवस्था. दिवसभर उन्हात उभं राहून परत जावं लागतं,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. उन्हाळ्याच्या कडक तापमानात पिण्याच्या पाण्याचीही योग्य सोय नसल्याने नागरिकांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. प्रशासनाने संपाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन यंत्रणा उभी केली नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरु असला तरी त्याचा थेट फटका गोरगरीब जनतेला बसत असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून किमान अत्यावश्यक सेवा सुरु कराव्यात, अन्यथा नागरिकांचा रोष उग्र रूप धारण करू शकतो, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

- Post by Sk Chand1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1
- Post by Karan1
- Post by Sharad Dayedar1
- राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटीआय कर्मचाऱ्यांचे बेमुद्दत कामबंद आंदोलन सुरू1
- Post by Sk Chand1