Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Amravati News Update1
- अकोला : समाजात फोफावत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट रूढी-परंपरा यावर प्रहार करत आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत, 'सावित्रीबाई फुले भिशी ग्रुप' (ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ) यांच्या वतीने नुकताच एक अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे १५० ते २०० महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीसोबतच प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला. सामाजिक दातृत्वाचे दर्शन कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ग्रुपने आपल्या दातृत्वाची परंपरा कायम ठेवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत शिबिरासाठी ३,५०० रुपये किमतीचा एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा गोपाळराव धनोकार यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पब्लिक स्कूल पातुरच्या प्राचार्य विद्या निलेश गाडगे यांनी 'आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे' या विषयावर महिलांशी संवाद साधला. यावेळी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रुपमधील ज्येष्ठ महिलांनी तसेच इतर सदस्यांनी सादर केलेल्या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत भरली. नाटिकेतून बुवाबाजीवर ओढले ताशेरे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सादर केलेली नाटिका. समाजात देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजांचे वास्तव या नाटिके द्वारे मांडण्यात आले. यामध्ये मैत्री प्रवीण लोखंडे यांनी भोंदू महाराजची भूमिका साकारली. या विषयावर राज्य अन्न व पुरवठा आयोगाच्या सौ. मायाताई इरतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यांची लाभली उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ भिशी ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री तडस, ग्रुप लीडर्स माधुरी दाते, भारती शेंडे, कल्पना तायडे, स्मिता वरोकार, विद्या घाटोळ, सोनिया निमकर, हेमा वरोकार, माधुरी धनोकार, अलका ढोमणे व शारदा धनोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुंदाताई लोखंडे, पुष्पा वाढोकार, लता धनोकार, रत्ना हुसे, तेजस्विनी चिंचोलकर, सुनंदा हुसे, वर्षा जढाळ, कुसुम बेलसरे, पद्मा बहाड, स्मिता देशमुख, शितल हाडोळे, उषा देवघरे, वनमाला चिंचोलकार, सरिता चिंचोलकार, मंगला मसने, विशाखा काळे, शुभांगी काळे, माधुरी काळे, ज्योती असोलकार, ममता आसोलकार, नीता सांगोकार, उषा नाथे, गोदावरी कलोरे यांसह मोठ्या संख्येने महिला सदस्य सहभागी होत्या.1
- खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एन.डी.ए. सरकारने महिलांना राजकारणात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी 'नारी शक्ती वंदन विधेयक' मांडले.मात्र, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरणाऱ्या या विधेयकास काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीने विरोध दर्शवल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या विरोधी मानसिकतेचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. भारतामध्ये महिलांना आदराचे आणि मानाचे स्थान दिले जाते. त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण विधेयक आणले. या विधेयकामुळे महिलांना संसदेत आणि विधानसभांमध्ये आरक्षणाची दारे उघडणार आहेत. असे असतानाही, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी याला विरोध करून आपली महिलाविरोधी भूमिका स्पष्ट केली असल्याची टीका यावेळी करण्यात आली. सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना निषेध व्यक्त करताना पदाधिकारी म्हणाले की,"महिलांचे सक्षमीकरण हे देशाला प्रगतीकडे नेणारे आहे. मात्र,राजकीय स्वार्थापोटी काँग्रेस आणि इंडिया यूआघाडीने या प्रक्रियेत अडथळा आणला आहे. त्यांची ही मानसिकता महिला शक्तीचा अपमान करणारी आहे. या नेत्यांना भविष्यात योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी ईश्वर देवो, अशी प्रार्थना आम्ही करतो, यावेळी काँग्रेस व मित्रपक्षांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यात आला.1
- मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!1
- Post by Sk Chand1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Sharad Dayedar1
- बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भेंडवड घट मांडणीचे भाकीत जाहीर.... देशावर नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासाळेल1
- तेलंगाना के बोर्ड के अध्यक्ष परभणी जिले के केंद्र निरीक्षक अजमतउल्लाह हुसैनी के नेतृत्व में जिंतूर शहर संगठन सूजन अभियान5