Shuru
Apke Nagar Ki App…
मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा! मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!
SURYA MARATHI NEWS
मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा! मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!1
- खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत. यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.1
- अकोला : समाजात फोफावत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट रूढी-परंपरा यावर प्रहार करत आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत, 'सावित्रीबाई फुले भिशी ग्रुप' (ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ) यांच्या वतीने नुकताच एक अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे १५० ते २०० महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीसोबतच प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला. सामाजिक दातृत्वाचे दर्शन कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ग्रुपने आपल्या दातृत्वाची परंपरा कायम ठेवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत शिबिरासाठी ३,५०० रुपये किमतीचा एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा गोपाळराव धनोकार यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पब्लिक स्कूल पातुरच्या प्राचार्य विद्या निलेश गाडगे यांनी 'आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे' या विषयावर महिलांशी संवाद साधला. यावेळी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रुपमधील ज्येष्ठ महिलांनी तसेच इतर सदस्यांनी सादर केलेल्या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत भरली. नाटिकेतून बुवाबाजीवर ओढले ताशेरे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सादर केलेली नाटिका. समाजात देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजांचे वास्तव या नाटिके द्वारे मांडण्यात आले. यामध्ये मैत्री प्रवीण लोखंडे यांनी भोंदू महाराजची भूमिका साकारली. या विषयावर राज्य अन्न व पुरवठा आयोगाच्या सौ. मायाताई इरतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यांची लाभली उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ भिशी ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री तडस, ग्रुप लीडर्स माधुरी दाते, भारती शेंडे, कल्पना तायडे, स्मिता वरोकार, विद्या घाटोळ, सोनिया निमकर, हेमा वरोकार, माधुरी धनोकार, अलका ढोमणे व शारदा धनोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुंदाताई लोखंडे, पुष्पा वाढोकार, लता धनोकार, रत्ना हुसे, तेजस्विनी चिंचोलकर, सुनंदा हुसे, वर्षा जढाळ, कुसुम बेलसरे, पद्मा बहाड, स्मिता देशमुख, शितल हाडोळे, उषा देवघरे, वनमाला चिंचोलकार, सरिता चिंचोलकार, मंगला मसने, विशाखा काळे, शुभांगी काळे, माधुरी काळे, ज्योती असोलकार, ममता आसोलकार, नीता सांगोकार, उषा नाथे, गोदावरी कलोरे यांसह मोठ्या संख्येने महिला सदस्य सहभागी होत्या.1
- बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची ३७० वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेला चर्चेचा विषय ठरते. मात्र, यंदा ही चर्चा भाकितांपेक्षा एका 'आव्हाना'मुळे अधिक गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी भेंडवळच्या घटमांडणीला उघड आव्हान दिले आहे. ही प्रथा केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, यावरून आता राज्यभरात नवा वाद निर्माण झाला आहे.श्याम मानव यांनी भेंडवळच्या भाकितांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या खगोलशास्त्रीय किंवा सांख्यिकीय पुराव्याशिवाय वर्तवलेली ही भाकिते म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा खेळ आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, जर भेंडवळच्या घटमांडणीतील यंदाची भाकिते ९० टक्क्यांपेक्षा जास्त अचूक ठरली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ८० लाखांचे रोख पारितोषिक संबंधित महाराजांना दिले जाईल.श्याम मानव यांच्या या आव्हानामुळे भेंडवळच्या घटमांडणी करणाऱ्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंनिसचा दावा आहे की, केवळ अंदाज वर्तवून समाजात संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. विज्ञानाच्या कसोटीवर आणि अचूकतेच्या निकषावर ही भाकिते खरी ठरली पाहिजेत, अन्यथा हे अंधश्रद्धेचे प्रदर्शन असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.एकीकडे ३७० वर्षांची परंपरा जपणाऱ्या भाविकांची मोठी फळी आहे, ज्यांच्यासाठी हे भाकीत शेती नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर दुसरीकडे, पुरोगामी विचारवंत आणि अंनिस याला विज्ञानाच्या चौकटीत बसवून तपासण्याची मागणी करत आहेत. '८० लाखांचे बक्षीस' हे केवळ एक निमित्त असून, त्यामागे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.1
- Post by Ahem Raza1
- पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.1
- Post by नंदकिशोर साखरकर1
- बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भेंडवड घट मांडणीचे भाकीत जाहीर.... देशावर नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासाळेल1