logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रलंबित मागण्यांसाठी खामगावात सरकारी कर्मचारी संपावर; प्रशासकीय कामकाज ठप्प ​खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ​आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ​​कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत.​ ​यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." ​शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.

1 hr ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 hr ago

प्रलंबित मागण्यांसाठी खामगावात सरकारी कर्मचारी संपावर; प्रशासकीय कामकाज ठप्प ​खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ​आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ​​कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत.​ ​यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." ​शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ​आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ​​कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत.​ ​यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." ​शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.
    1
    ​खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ​आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ​​कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत.​ ​यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." ​शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अकोला बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.
    1
    अकोला 
बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे.
उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer Balapur, Akola•
    50 min ago
  • मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!
    1
    मालेगाव /अकोला 
इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची ३७० वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेला चर्चेचा विषय ठरते. मात्र, यंदा ही चर्चा भाकितांपेक्षा एका 'आव्हाना'मुळे अधिक गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी भेंडवळच्या घटमांडणीला उघड आव्हान दिले आहे. ही प्रथा केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, यावरून आता राज्यभरात नवा वाद निर्माण झाला आहे.श्याम मानव यांनी भेंडवळच्या भाकितांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या खगोलशास्त्रीय किंवा सांख्यिकीय पुराव्याशिवाय वर्तवलेली ही भाकिते म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा खेळ आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, जर भेंडवळच्या घटमांडणीतील यंदाची भाकिते ९० टक्क्यांपेक्षा जास्त अचूक ठरली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ८० लाखांचे रोख पारितोषिक संबंधित महाराजांना दिले जाईल.श्याम मानव यांच्या या आव्हानामुळे भेंडवळच्या घटमांडणी करणाऱ्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंनिसचा दावा आहे की, केवळ अंदाज वर्तवून समाजात संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. विज्ञानाच्या कसोटीवर आणि अचूकतेच्या निकषावर ही भाकिते खरी ठरली पाहिजेत, अन्यथा हे अंधश्रद्धेचे प्रदर्शन असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.एकीकडे ३७० वर्षांची परंपरा जपणाऱ्या भाविकांची मोठी फळी आहे, ज्यांच्यासाठी हे भाकीत शेती नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर दुसरीकडे, पुरोगामी विचारवंत आणि अंनिस याला विज्ञानाच्या चौकटीत बसवून तपासण्याची मागणी करत आहेत. '८० लाखांचे बक्षीस' हे केवळ एक निमित्त असून, त्यामागे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची ३७० वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेला चर्चेचा विषय ठरते. मात्र, यंदा ही चर्चा भाकितांपेक्षा एका 'आव्हाना'मुळे अधिक गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी भेंडवळच्या घटमांडणीला उघड आव्हान दिले आहे. ही प्रथा केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, यावरून आता राज्यभरात नवा वाद निर्माण झाला आहे.श्याम मानव यांनी भेंडवळच्या भाकितांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या खगोलशास्त्रीय किंवा सांख्यिकीय पुराव्याशिवाय वर्तवलेली ही भाकिते म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा खेळ आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, जर भेंडवळच्या घटमांडणीतील यंदाची भाकिते ९० टक्क्यांपेक्षा जास्त अचूक ठरली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ८० लाखांचे रोख पारितोषिक संबंधित महाराजांना दिले जाईल.श्याम मानव यांच्या या आव्हानामुळे भेंडवळच्या घटमांडणी करणाऱ्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंनिसचा दावा आहे की, केवळ अंदाज वर्तवून समाजात संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. विज्ञानाच्या कसोटीवर आणि अचूकतेच्या निकषावर ही भाकिते खरी ठरली पाहिजेत, अन्यथा हे अंधश्रद्धेचे प्रदर्शन असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.एकीकडे ३७० वर्षांची परंपरा जपणाऱ्या भाविकांची मोठी फळी आहे, ज्यांच्यासाठी हे भाकीत शेती नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर दुसरीकडे, पुरोगामी विचारवंत आणि अंनिस याला विज्ञानाच्या चौकटीत बसवून तपासण्याची मागणी करत आहेत. '८० लाखांचे बक्षीस' हे केवळ एक निमित्त असून, त्यामागे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.
    1
    पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by नंदकिशोर साखरकर
    1
    Post by नंदकिशोर  साखरकर
    user_नंदकिशोर  साखरकर
    नंदकिशोर साखरकर
    Chauffeur service मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Ahem Raza
    1
    Post by Ahem Raza
    user_Ahem Raza
    Ahem Raza
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एन.डी.ए. सरकारने महिलांना राजकारणात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी 'नारी शक्ती वंदन विधेयक' मांडले.मात्र, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरणाऱ्या या विधेयकास काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीने विरोध दर्शवल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या विरोधी मानसिकतेचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. ​भारतामध्ये महिलांना आदराचे आणि मानाचे स्थान दिले जाते. त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण विधेयक आणले. या विधेयकामुळे महिलांना संसदेत आणि विधानसभांमध्ये आरक्षणाची दारे उघडणार आहेत. असे असतानाही, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी याला विरोध करून आपली महिलाविरोधी भूमिका स्पष्ट केली असल्याची टीका यावेळी करण्यात आली. ​सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना ​निषेध व्यक्त करताना पदाधिकारी म्हणाले की,"महिलांचे सक्षमीकरण हे देशाला प्रगतीकडे नेणारे आहे. मात्र,राजकीय स्वार्थापोटी काँग्रेस आणि इंडिया यूआघाडीने या प्रक्रियेत अडथळा आणला आहे. त्यांची ही मानसिकता महिला शक्तीचा अपमान करणारी आहे. या नेत्यांना भविष्यात योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी ईश्वर देवो, अशी प्रार्थना आम्ही करतो, यावेळी काँग्रेस व मित्रपक्षांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यात आला.
    1
    खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एन.डी.ए. सरकारने महिलांना राजकारणात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी 'नारी शक्ती वंदन विधेयक' मांडले.मात्र, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरणाऱ्या या विधेयकास काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीने विरोध दर्शवल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या विरोधी मानसिकतेचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. ​भारतामध्ये महिलांना आदराचे आणि मानाचे स्थान दिले जाते. त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण विधेयक आणले. या विधेयकामुळे महिलांना संसदेत आणि विधानसभांमध्ये आरक्षणाची दारे उघडणार आहेत. असे असतानाही, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी याला विरोध करून आपली महिलाविरोधी भूमिका स्पष्ट केली असल्याची टीका यावेळी करण्यात आली. ​सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना ​निषेध व्यक्त करताना पदाधिकारी म्हणाले की,"महिलांचे सक्षमीकरण हे देशाला प्रगतीकडे नेणारे आहे. मात्र,राजकीय स्वार्थापोटी काँग्रेस आणि इंडिया यूआघाडीने या प्रक्रियेत अडथळा आणला आहे. त्यांची ही मानसिकता महिला शक्तीचा अपमान करणारी आहे. या नेत्यांना भविष्यात योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी ईश्वर देवो, अशी प्रार्थना आम्ही करतो, यावेळी काँग्रेस व मित्रपक्षांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यात आला.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.