logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

किनखेडा येथे फुले–आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न किनखेडा येथे फुले–आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न "मायबाप हो शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची खऱ्या अर्थाने कास धरण्याची गरज - राष्ट्रीय व्याख्याते अक्षय राऊत" *वाशिम प्रतिनिधी* : गणेश पाटील बोथे वाशिम जिल्ह्यातील किनखेडा, दि. १४ एप्रिल 2026 रोजी : महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त किनखेडा येथे आयोजित भव्य व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वेळी व्याख्याते अक्षय राऊत यांनी आपल्या विचारातून सांगितले कि शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची केवळ जयंती साजरी करून चालणार नाही, तर त्या विचारांना आचरणात आणणे ही आजची खरी गरज आहे.शिक्षण हेच परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे. प्रत्येक घरात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित झाली पाहिजे.संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये समजून घेतल्याशिवाय समाज प्रगत होऊ शकत नाही. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. “अंधश्रद्धा, जातीयता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हेच खऱ्या अर्थाने महापुरुषांना अभिवादन आहे. तरुणांनी सामाजिक भान ठेवून समाजजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. मायबाप हो, विचारांची कास धरा, कारण विचार बदलले तरच समाज बदलेल. या कार्यक्रमास यावेळी त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरित करत सामाजिक जाणीव दृढ केली. कार्यक्रमासाठी प्रमुख्य अतिथी युवा सामाजिक कार्यकर्ते जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदिप पट्टेबहादुर, प्रमुख्य पाहुणे,प्रा. नितीन पांढरे, प्रमुख्य उपस्थित गोदावरी महाविद्यालय वाशिम संचालक प्रा.राहुल राऊत, ग्राप सरपंच सुनील लांडकर पाटिल तसेच भगीरथजी भोडणे (अध्यक्ष – बिरसा वादी आदिवासी संघटना, महाराष्ट्र राज्य) यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी हा कार्यक्रम नवयुवक तथागत मंडळ, जय भवानी मित्र मंडळ किनखेडा व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य आयोजन सुनील गायकवाड, सुगत गायकवाड, प्रताप गायकवाड, दिनकर गायकवाड, अक्षय भगत, सनथ गायकवाड, अमर गायकवाड, बाळू भगत, दीपक गायकवाड, गुणवंत भगत, प्रदीप सावळे, सिद्धार्थ राऊत, सुदर्शन गायकवाड, विश्वजित भगत व धीरज भगत यांनी विशेष योगदान दिले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नितीन पांढरे यांनी केले. तर सर्वांचे आभार सुनील गायकवाड यांनी म्हणले. ग्रामस्थांचा मोठा सहभाग या कार्यक्रमाला लाभला होता.

8 hrs ago
user_Ganesh Bothe
Ganesh Bothe
मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
8 hrs ago
512275b1-618e-440c-af29-e9427b1830f3

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • ​खामगाव : शहराच्या मुख्य भागातील बर्डे कॉम्प्लेक्ससमोरील नाली चोकअप झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या भागातील नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. परिणामी, सांडपाण्याचा निचरा होण्याऐवजी ते पाणी मुख्य रस्त्यावर साचत आहे. रस्त्यावर साचलेल्या या घाण पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.विशेषतः पादचाऱ्यांना या घाण पाण्यातून पाय तुडवत मार्ग काढावा लागत असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.येथील व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी तक्रार केली आहे की, ही समस्या वारंवार उद्भवत असूनही नगरपालिका प्रशासनाकडून याकडे कायमस्वरूपी लक्ष दिले जात नाही.चोकअप झालेली नाली तात्काळ मोकळी करून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी आता जोर धरत आहे.नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन या समस्येतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.
    1
    ​खामगाव : शहराच्या मुख्य भागातील बर्डे कॉम्प्लेक्ससमोरील नाली चोकअप झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या भागातील नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. परिणामी, सांडपाण्याचा निचरा होण्याऐवजी ते पाणी मुख्य रस्त्यावर साचत आहे. रस्त्यावर साचलेल्या या घाण पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.विशेषतः पादचाऱ्यांना या घाण पाण्यातून पाय तुडवत मार्ग काढावा लागत असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.येथील व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी तक्रार केली आहे की, ही समस्या वारंवार उद्भवत असूनही नगरपालिका प्रशासनाकडून याकडे कायमस्वरूपी लक्ष दिले जात नाही.चोकअप झालेली नाली तात्काळ मोकळी करून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी आता जोर धरत आहे.नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन या समस्येतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन.. मातंग समाजाच्या वतीने निवेदन
    1
    जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन..
मातंग समाजाच्या वतीने निवेदन
    user_Gajanan Dhandare
    Gajanan Dhandare
    News Anchor खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मका विक्रीसाठी आणला, पण बाजाराबाहेरच थांबला शेतकऱ्यांचा संताप उसळला
    1
    मका विक्रीसाठी आणला, पण  बाजाराबाहेरच थांबला  शेतकऱ्यांचा संताप उसळला
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    13 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर ट्रक आणि चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकीमधील दोंघाचा हा घटनास्थळावरच मृत्यु झाला तर एक महिला ही गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी महिलेला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं. साखरा येथुन पांढरकवडा मार्गे आदीलाबाद येथे जात असलेली चारचाकी ट्रकवर आदळुन हा भीषण अपघात झाला.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर ट्रक आणि चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकीमधील दोंघाचा हा घटनास्थळावरच मृत्यु झाला तर एक महिला ही गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी महिलेला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं. साखरा येथुन पांढरकवडा मार्गे आदीलाबाद येथे जात असलेली चारचाकी ट्रकवर आदळुन हा भीषण अपघात झाला.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.