लातूर येथे २८ फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबीर, नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे लातूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता लातूर येथील रुक्मिणी मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भारुका व जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक झाली. या बैठकीला लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. पी. केस्तीकर, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन. पाटील, वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश जे. सी. ढेंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही. एन. गिरवलकर यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. या महाशिबिरातून सामान्य नागरिकांना मोफत विधी सहाय्य, कायद्याबाबत जागृती, विविध शासकीय योजनांची माहिती, लाभार्थी नोंदणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील गरजू, वंचित व सामान्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भारुका यांनी केले. या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यासोबतच शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध शासकीय योजनांची माहिती आणि कायदेविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळण्याची संधी विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे. यासोबतच आर्थिक फसवणूक, सायबर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा यासारख्या विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, बचतगट यासारख्या विविध घटकांसाठी उपयुक्त माहिती देणारे ५० पेक्षा अधिक स्टॉल या कार्यक्रमात लावण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, मार्गदर्शन याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

- राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.1
- दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..1
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे4
- खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.1