logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड .. लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली

11 hrs ago
user_फोटो क्राईम न्यूज
फोटो क्राईम न्यूज
पत्रकार Latur, Maharashtra•
11 hrs ago

आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड .. लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.
    1
    खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. 
लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी Gigaplex IT Park, ऐरोली वेस्ट येथील Mind Space कंपनीमध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक कर्मचारी आपल्या वाहनावर भगवा झेंडा लावून कामावर येत होता.* *सदर कर्मचाऱ्याला प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षक विलास शिंदे यांनी गाडीवरील भगवा झेंडा काढण्यास सांगितले. संबंधित कर्मचारी मुकेश जाधव यांनी “मी झेंडा काढणार नाही, गरज असल्यास गाडी बाहेरील पार्किंगमध्ये लावतो” असे सांगितले. मात्र सुरक्षा रक्षकाने बाहेरील पार्किंगमध्ये देखील वाहन लावण्यास नकार देत जबरदस्तीने गाडीवरील भगवा झेंडा काढून घेतला आणि त्यानंतरच प्रवेश दिला.* *ही घटना अत्यंत निषेधार्ह असून शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त लावलेला भगवा झेंडा काढण्याचा प्रकार हा असंवेदनशील आणि चुकीचा आहे.* *या घटनेची माहिती मिळताच Maharashtra Navnirman Sena तर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून संबंधित सुरक्षा रक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित व्यवस्थापकांकडून लेखी हमी घेण्यात आली आहे की भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही.* *शिवभक्तांच्या भावना दुखावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.*
    1
    *आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी Gigaplex IT Park, ऐरोली वेस्ट येथील Mind Space कंपनीमध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक कर्मचारी आपल्या वाहनावर भगवा झेंडा लावून कामावर येत होता.*
*सदर कर्मचाऱ्याला प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षक विलास शिंदे यांनी गाडीवरील भगवा झेंडा काढण्यास सांगितले. संबंधित कर्मचारी मुकेश जाधव यांनी “मी झेंडा काढणार नाही, गरज असल्यास गाडी बाहेरील पार्किंगमध्ये लावतो” असे सांगितले. मात्र सुरक्षा रक्षकाने बाहेरील पार्किंगमध्ये देखील वाहन लावण्यास नकार देत जबरदस्तीने गाडीवरील भगवा झेंडा काढून घेतला आणि त्यानंतरच प्रवेश दिला.*
*ही घटना अत्यंत निषेधार्ह असून शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त लावलेला भगवा झेंडा काढण्याचा प्रकार हा असंवेदनशील आणि चुकीचा आहे.*
*या घटनेची माहिती मिळताच Maharashtra Navnirman Sena तर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून संबंधित सुरक्षा रक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित व्यवस्थापकांकडून लेखी हमी घेण्यात आली आहे की भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही.*
*शिवभक्तांच्या भावना दुखावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.*
    user_Mahadev Shinde
    Mahadev Shinde
    Advertising Photographer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती रा.प. पाथरी आगार
    1
    सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती रा.प. पाथरी आगार
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *जन्म मृत्यू प्रमाणपत्रा साठी अडवणूक करू नका जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या कडक सूचना*
    2
    *जन्म मृत्यू प्रमाणपत्रा साठी अडवणूक करू नका जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या कडक सूचना*
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • (प्रतिनिधी ):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांचे निदान, हाडे, रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी आदी सेवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आल्या. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपतींच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रक्तदान हेच जीवनदान असून प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक संतोष जाधव यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व रक्तदाते, नागरिक, डॉक्टर व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वैद्यकीय पथक यांनी परिश्रम घेतले.
    1
    (प्रतिनिधी ):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांचे निदान, हाडे, रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी आदी सेवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आल्या. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपतींच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रक्तदान हेच जीवनदान असून प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक संतोष जाधव यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व रक्तदाते, नागरिक, डॉक्टर व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वैद्यकीय पथक यांनी परिश्रम घेतले.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आंदोलन करणाऱ्यावरच गुन्हा दाखल
    1
    आंदोलन करणाऱ्यावरच गुन्हा दाखल
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ऊस मजुराचा मुलगा मंगेश ढेपे झाला सी.ए. ​  लातूर  (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील केवळ शे दीडशे लोकवस्तीच्या छोट्याशा 'आनंदवाडी' या गावाने अभिमानाने मान उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, एका ऊस मजुराच्या मुलाने, मंगेश व्यंकटराव ढेपे याने सी.ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मंगेशच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होत असून गावात एखाद्या उत्सवा सारखा आनंद साजरा केला जात आहे. मजुरी करून वडिलांनी लेकाला शिकवलं मंगेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील व्यंकटराव ढेपे हे अल्पशिक्षित असून कोरडवाहू शेती आणि ऊसाच्या गुऱ्हाळावर मजुरी करून संसाराचा गाडा ओढतात. आई दुग्धव्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावते. मंगेशने त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्याला दररोज ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागली.लातूरच्या दयानंद कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर, २०१५ मध्ये त्याने पुणे गाठले. अडीच हजारांच्या नोकरीपासून सी.ए. पर्यंतचा प्रवास सी.ए. चा अभ्यासक्रम अत्यंत खर्चिक आणि कठीण असताना मंगेश डगमगला नाही. पुण्यात सुरुवातीला त्याने अवघ्या अडीच हजार रुपये पगारावर खासगी नोकरी करत स्वतःच्या खर्चाला जोड दिली. वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून मंगेशच्या शिक्षणाची ओढ कायम ठेवली. २०१६ पासून सुरू झालेला हा खडतर प्रवास अखेर यशात परावर्तित झाला. मंगेशच्या या यशाने पूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादा सण साजरा करावा त्या पद्धतीने गावकरी आनंद उत्सव साजरा करत आहेत. मंगेश ढेपे यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. मंगेश ढेपे यांचे आवाहन तरुणांनो जिद्द ठेवा, मी मदतीला तयार! "माझ्या यशाचे पूर्ण श्रेय माझ्या वडिलांच्या कष्टाला आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मनात जिद्द असेल तर यश नक्की मिळते. कोणत्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मार्गदर्शनाची गरज असल्यास मी मदतीसाठी सदैव तत्पर असेन." — मंगेश ढेपे,
    1
    ऊस मजुराचा मुलगा मंगेश ढेपे झाला सी.ए.
​ 
लातूर  (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील केवळ शे दीडशे लोकवस्तीच्या छोट्याशा 'आनंदवाडी' या गावाने अभिमानाने मान उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, एका ऊस मजुराच्या मुलाने, मंगेश व्यंकटराव ढेपे याने सी.ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मंगेशच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होत असून गावात एखाद्या उत्सवा सारखा आनंद साजरा केला जात आहे.
मजुरी करून वडिलांनी लेकाला शिकवलं मंगेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील व्यंकटराव ढेपे हे अल्पशिक्षित असून कोरडवाहू शेती आणि ऊसाच्या गुऱ्हाळावर मजुरी करून संसाराचा गाडा ओढतात. आई दुग्धव्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावते. मंगेशने त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्याला दररोज ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागली.लातूरच्या दयानंद कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर, २०१५ मध्ये त्याने पुणे गाठले.
अडीच हजारांच्या नोकरीपासून सी.ए. पर्यंतचा प्रवास सी.ए. चा अभ्यासक्रम अत्यंत खर्चिक आणि कठीण असताना मंगेश डगमगला नाही. पुण्यात सुरुवातीला त्याने अवघ्या अडीच हजार रुपये पगारावर खासगी नोकरी करत स्वतःच्या खर्चाला जोड दिली. वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून मंगेशच्या शिक्षणाची ओढ कायम ठेवली. २०१६ पासून सुरू झालेला हा खडतर प्रवास अखेर यशात परावर्तित झाला. मंगेशच्या या यशाने पूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादा सण साजरा करावा त्या पद्धतीने गावकरी आनंद उत्सव साजरा करत आहेत. मंगेश ढेपे यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे.
मंगेश ढेपे यांचे आवाहन तरुणांनो जिद्द ठेवा, मी मदतीला तयार!
"माझ्या यशाचे पूर्ण श्रेय माझ्या वडिलांच्या कष्टाला आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मनात जिद्द असेल तर यश नक्की मिळते. कोणत्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मार्गदर्शनाची गरज असल्यास मी मदतीसाठी सदैव तत्पर असेन."
— मंगेश ढेपे,
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्या वतीने शिवजयंती व रमजान निमित्त शांतता राखण्याचे आव्हान
    1
    पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्या वतीने शिवजयंती व रमजान निमित्त  शांतता राखण्याचे आव्हान
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • (प्रतिनिधी):- शासनाच्या घरकुल योजने अंतर्गत बेघरांना साधारण दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र बीड जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या डेमो घरकुलासाठी तब्बल दहा लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. या बाबत त्यांनी जिल्हाधिकारी बीड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. घरकुल योजनेत केंद्र शासनाकडून सुमारे १ लाख २० हजार रुपये, राज्य शासनाकडून अतिरिक्त ५० हजार रुपये, मनरेगा अंतर्गत २६ ते २८ हजार रुपये आणि स्वच्छतागृहासाठी १२ हजार रुपये असे मिळून एकूण सुमारे दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र जिल्हा परिषद आवारातील डेमो हाऊससाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी ४ लाख ९९ हजार २७८ रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली. त्या नंतर ५ जानेवारी २०२६ रोजी आणखी ४ लाख ९९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे एकाच कामासाठी दोन टप्प्यांत सुमारे १० लाखांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे. उभारण्यात आलेल्या डेमो हाऊस मध्ये एक लहान हॉल व दोन छोट्या खोल्या असून दोन लोखंडी दरवाजे, दोन मोठ्या खिडक्या व एक छोटी खिडकी बसविण्यात आली आहे. घर पत्र्याचे असून सुमारे २१७ चौरस फुट बांधकामासाठी सहा कॉलम उभारण्यात आले आहेत. पत्र्याच्या घरासाठी स्लॅबसाठी लागणारे कॉलम उभारण्याची गरज काय, असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे. “घरकुल मंजुरी पासून हप्ते खात्यावर पडण्यापर्यंत चिरीमिरी द्यावी लागते. शासनाकडून मंजूर ५ ब्रास वाळू प्रत्यक्षात मिळत नाही. हातात सव्वा लाख रुपये उरतात, त्यातून घर कसे बांधायचे?” असा सवाल ग्रामस्थ करत असताना डेमो हाऊस साठी १० लाखांचा खर्च म्हणजे घरकुल योजनेची क्रूर थट्टा असल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ------_------ :>-> शासन बेघरांना घरकुल योजनेसाठी २ लाख रुपये अनुदान देते.. त्यात घरकुल मंजुरी पासुन हफ्ते पडण्याची पैसे द्यावे लागतात.. हातात कसे बसे सव्वा लाख रुपये पडतात आणि बीड जिल्हा परिषद घरकुल योजनेचा डेमोसाठी १० लाख रुपये खर्च करते..हि क्रुर थट्टा आहे... संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना लेखी मागणी केली आहे. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -----_----- -:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -:- सामाजिक कार्यकर्ते
    1
    (प्रतिनिधी):- शासनाच्या घरकुल योजने अंतर्गत बेघरांना साधारण दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र बीड जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या डेमो घरकुलासाठी तब्बल दहा लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. या बाबत त्यांनी जिल्हाधिकारी बीड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. घरकुल योजनेत केंद्र शासनाकडून सुमारे १ लाख २० हजार रुपये, राज्य शासनाकडून अतिरिक्त ५० हजार रुपये, मनरेगा अंतर्गत २६ ते २८ हजार रुपये आणि स्वच्छतागृहासाठी १२ हजार रुपये असे मिळून एकूण सुमारे दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र जिल्हा परिषद आवारातील डेमो हाऊससाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी ४ लाख ९९ हजार २७८ रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली. त्या नंतर ५ जानेवारी २०२६ रोजी आणखी ४ लाख ९९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे एकाच कामासाठी दोन टप्प्यांत सुमारे १० लाखांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे. उभारण्यात आलेल्या डेमो हाऊस मध्ये एक लहान हॉल व दोन छोट्या खोल्या असून दोन लोखंडी दरवाजे, दोन मोठ्या खिडक्या व एक छोटी खिडकी बसविण्यात आली आहे. घर पत्र्याचे असून सुमारे २१७ चौरस फुट बांधकामासाठी सहा कॉलम उभारण्यात आले आहेत. पत्र्याच्या घरासाठी स्लॅबसाठी लागणारे कॉलम उभारण्याची गरज काय, असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे. “घरकुल मंजुरी पासून हप्ते खात्यावर पडण्यापर्यंत चिरीमिरी द्यावी लागते. शासनाकडून मंजूर ५ ब्रास वाळू प्रत्यक्षात मिळत नाही. हातात सव्वा लाख रुपये उरतात, त्यातून घर कसे बांधायचे?” असा सवाल ग्रामस्थ करत असताना डेमो हाऊस साठी १० लाखांचा खर्च म्हणजे घरकुल योजनेची क्रूर थट्टा असल्याची संतप्त प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
------_------
:>-> शासन बेघरांना घरकुल योजनेसाठी २ लाख रुपये अनुदान देते.. त्यात घरकुल मंजुरी पासुन हफ्ते पडण्याची पैसे द्यावे लागतात.. हातात कसे बसे सव्वा लाख रुपये पडतात आणि बीड जिल्हा परिषद घरकुल योजनेचा डेमोसाठी १० लाख रुपये खर्च करते..हि क्रुर थट्टा आहे... संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना लेखी मागणी केली आहे. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
-----_-----
-:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर -:-
सामाजिक कार्यकर्ते
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.