logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नेपाळमध्ये निसर्ग कोपला, ठाणे जिल्ह्यातील 31 प्रवासी 36 तासानंतरही संपर्काबाहेर, कुटुंब टेन्शनमध्ये! ठाणे : नेपाळच्या भोटेकोशी नदीला बुधवारी अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे कमीत कमी 362 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. तर 300 भारतीय नागरिकांसह 750 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. द काठमांडू पोस्टच्या रिपोर्टनुसार बेपत्ता लोकांमध्ये परदेशी नागरिक आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. सकाळच्या वेळी अचानक आलेल्या पुरामुळे तीन जिल्हे अक्षरश: उद्ध्वस्त झाले. लोकांची घरं, वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेली. मागच्या काही काळातील नेपाळमधील ही सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. ठाणे जिल्ह्यातील 31 पर्यटक नेपाळमध्ये अडकले नेपाळमधल्या या भीषण परिस्थितीमुळे तिथे असलेल्या नागरिकांसोबतचा संपर्क तुटला आहे. ठाणे जिल्ह्यातील जवळपास 31 पर्यटक हे नेपाळमध्ये अडकले आहेत, त्यामुळे त्यांचे कुटुंबिय टेन्शनमध्ये आहेत. ठाणे शहरातील नौपाडा, समता नगर, बाळकुम, कल्याण पश्चिम, डोंबिवली आणि नवी मुंबईमधील पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते, पण नेपाळमधल्या पुरामुळे त्यांच्यासोबत अजून संपर्क होऊ शकलेला नाही. 26 ऑगस्टच्या सकाळी यातल्या काही पर्यटकांचं त्यांच्या कुटुंबासोबत फोनवर बोलणं झालं होतं. बोलणं झालं तेव्हा त्यांनी आपण नेपाळ-चीन सीमेवर तिमुरे इमिग्रेशन सेंटरच्या इथे असल्याचं सांगितलं होतं. पण त्यानंतर सीमेवरची परिस्थिती बिघडली आणि त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती पर्यटकांच्या नातेवाईकांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातून नेपाळला गेलेले हे 31 प्रवासी बेपत्ता झाले आहेत किंवा अनपेक्षित ठिकाणी अडकले असू शकतात. स्थानिक ट्रॅव्हल एजन्सी आणि काठमांडूमधील भारतीय दुतावासाच्या मदतीने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती नेपाळ पर्यटन बोर्डाकडून देण्यात आली आहे. ठाणे जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर दरम्यान ठाणे जिल्ह्यातील प्रवासी नेपाळमध्ये अडकल्यामुळे जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. ज्यांचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकले आहेत, त्यांनी अशा पर्यटकांची माहिती, त्यांचं नाव, मोबाईल नंबर तसंच त्यांच्यासोबत शेवटचा संपर्क कधी झाला आणि तेव्हा ते कोणत्या लोकेशनवर होते? याची माहिती द्यावी, असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. समीर मुकुंद जोशी, अपर्णा समीर जोशी (नौपाडा ठाणे), सतीश विनायक पाटणकर, रेखा सतीश पाटणकर (समता नगर), रजनीश रघुनाथ नातू (बाळकुम), संजय राजमल पाटील, नलिनी संजय पाटील (कल्याण पश्चिम), सुनिल सुदर्शन सुभेदार (डोंबिवली), यशस भंड (वाशी) अशी नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या ठाणे जिल्ह्यातील काही प्रवाशांची नावं आहेत. प्रशासनाने दिला मोबाईल नंबर ठाणे जिल्हा प्रशासनाने नातेवाईकांनी घाबरून न जाण्याचं आव्हान केलं आहे, तसंच ठाणे जिल्हा आपत्कालीन सेंटरचे टोल फ्री क्रमांकही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 1077, 9372338827 आणि 022-25301740 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

10 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
10 hrs ago
8a2dfb9f-f5cd-4b70-aca5-f1d18bdf72f5

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रक्षाबंधनाच्या दिवशी कुडूस नाक्यावर वाहतूक कोंडी; लाडक्या बहिणींचा सवाल, “लाडका भाऊ कधी येणार?” कुडूस | प्रतिनिधी वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे शुक्रवारी, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सणानिमित्त कुडूस परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. कुडूस नाका हा वाडा तालुक्यातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच सध्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम सुरू असून एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय कुडूस नाका परिसरातील बेशिस्त वाहतूक हीदेखील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. काही वाहनचालक तसेच रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करता विरुद्ध दिशेने वाहने चालविली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कुडूस नाक्यावरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या बांधकामांमुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. कुडूस नाक्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र अद्याप या मागणीवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींची गैरसोय रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या अनेक बहिणींना कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसला. तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागल्याने काही महिलांनी संताप व्यक्त केला. “लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडविण्याची चर्चा केली जाते; मात्र कुडूस नाक्यावर आम्हाला तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत आहे. लाडक्या बहिणींना या ट्रॅफिकमधून बाहेर काढण्यासाठी लाडका भाऊ कधी येणार?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ सणासुदीपुरता मर्यादित नसून दररोज नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुरू असलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण आणणे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावणे आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून उड्डाणपुलाबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासन कुडूस नाक्यावरील या गंभीर वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    रक्षाबंधनाच्या दिवशी कुडूस नाक्यावर वाहतूक कोंडी; लाडक्या बहिणींचा सवाल, “लाडका भाऊ कधी येणार?”
कुडूस | प्रतिनिधी
वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे शुक्रवारी, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सणानिमित्त कुडूस परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.
कुडूस नाका हा वाडा तालुक्यातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच सध्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम सुरू असून एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय कुडूस नाका परिसरातील बेशिस्त वाहतूक हीदेखील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. काही वाहनचालक तसेच रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करता विरुद्ध दिशेने वाहने चालविली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, कुडूस नाक्यावरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या बांधकामांमुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
कुडूस नाक्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र अद्याप या मागणीवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींची गैरसोय
रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या अनेक बहिणींना कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसला. तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागल्याने काही महिलांनी संताप व्यक्त केला.
“लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडविण्याची चर्चा केली जाते; मात्र कुडूस नाक्यावर आम्हाला तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत आहे. लाडक्या बहिणींना या ट्रॅफिकमधून बाहेर काढण्यासाठी लाडका भाऊ कधी येणार?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.
कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ सणासुदीपुरता मर्यादित नसून दररोज नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुरू असलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण आणणे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावणे आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून उड्डाणपुलाबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासन कुडूस नाक्यावरील या गंभीर वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Sanvad Maharashtra News
    Sanvad Maharashtra News
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश
    1
    रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश
रक्षाबंधन के मौके पर वरिष्ठ नगरसेवक राजन किने का सुंदर संदेश
    user_Prime mumbai 24 News
    Prime mumbai 24 News
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी
    1
    मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी
मुंब्रा पुलिस स्टेशन में मनाया गया रक्षाबंधन, महिलाओं ने पुलिसकर्मियों को बांधी राखी
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज़: हिस्ट्रीशीटर ओंकार भोसले ठाणे क्राइम ब्रांच की एंटी-एक्सटॉर्शन सेल में लाया गया!...
    1
    ब्रेकिंग न्यूज़: हिस्ट्रीशीटर ओंकार भोसले ठाणे क्राइम ब्रांच की एंटी-एक्सटॉर्शन सेल में लाया गया!...
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठी सीखने के लिए 1 साल का समय दिया कोई कार्रवाई नहीं होगी BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मुंब्रा में बड़े उत्साह और धूमधाम से मनाया गया जशने ईद मीलादुन्नबी, पूरा शहर उतरा सड़कों पर।
    1
    मुंब्रा में बड़े उत्साह और धूमधाम से मनाया गया जशने ईद मीलादुन्नबी, पूरा शहर उतरा सड़कों पर।
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... 'ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... एक मिशन" या प्रवासाचे साक्षीदार बना. प्रत्येक मुलाचे एक स्वप्न असते, पण प्रत्येक मुलाला ते पूर्ण करण्याची संधी मिळत नाही. ज्या मुलांना याची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, शालेय शुल्कासाठी मदत करण्यासाठी आणि त्यांना पुस्तके पुरवण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. शिक्षणाला पाठिंबा द्या, उज्ज्वल भविष्याला साथ द्या!
    1
    ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... 
'ब्राइट लाइन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट'च्या "१९० स्वप्ने... एक मिशन" या प्रवासाचे साक्षीदार बना. प्रत्येक मुलाचे एक स्वप्न असते, पण प्रत्येक मुलाला ते पूर्ण करण्याची संधी मिळत नाही. ज्या मुलांना याची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, शालेय शुल्कासाठी मदत करण्यासाठी आणि त्यांना पुस्तके पुरवण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. शिक्षणाला पाठिंबा द्या, उज्ज्वल भविष्याला साथ द्या!
    user_Bright Line Educational & Welfare Trust
    Bright Line Educational & Welfare Trust
    Education Centre ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा Mumbai Bulletin News जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा Mumbai Bulletin News
    1
    जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा
Mumbai Bulletin News 
जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा
Mumbai Bulletin News
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.