अण्णाभाऊ चे विचार आजही प्रेरणादायी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांचे विचार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी शोषित आणि उपेक्षितांचे दुःख आपल्या साहित्यातून समाजासमोर आणले - चंद्रकांत टेंगेटोल उदगीर (प्रतिनिधी) साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःच्या जीवनात भोगलेले कष्ट, आणि त्यावेळेसच्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या जोखडात अडकलेल्या उपेक्षित आणि शोषित समाजावर झालेला अन्याय आणि अत्याचार जगजाहीर करण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून मोठी क्रांती घडवून आणली. अण्णाभाऊ साठे यांची जशी लेखणी गाजली तशीच त्यांची डफावरची थाप देखील गाजली. त्यांच्या लावण्या पोवाडे ते आजही प्रेरणादायी आहेत. समाजाने आण्णाभाऊ चे विचार स्वीकारावेत असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या वतीने आयोजित अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने ते बोलत होते. साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,अनिल पंचाक्षरी विधानसभा प्रमुख,मनोज पाटील तालुकाप्रमुख,आमेर शेख शहरप्रमुख,लखन कांबळे शहरप्रमुख, व्यंकट कसबे सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष,विलास राठोड ओबीसी जिल्हा अध्यक्ष,अतुल काकडे,देवा घंटे,सतीश कांबळे,मारोती साळुंखे, अविनाश बेदरे,बाळू शिंदे शहर संघटक,महेश मंदाडे,अनिल जाधव,सुशील मुळे, हणमंत गुलफुले, शशिकला पाटील, रमाबाई वाघमोरे सामाजिक न्याय महिला अध्यक्ष,आरती सूर्यवंशी बांधकाम कामगार सेना जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाती कांबळे,जिजाबाई वाघमारे आदी शिवसैनिकासह महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णाभाऊ चे विचार आजही प्रेरणादायी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांचे विचार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी शोषित आणि उपेक्षितांचे दुःख आपल्या साहित्यातून समाजासमोर आणले - चंद्रकांत टेंगेटोल उदगीर (प्रतिनिधी) साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःच्या जीवनात भोगलेले कष्ट, आणि त्यावेळेसच्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या जोखडात अडकलेल्या उपेक्षित आणि शोषित समाजावर
झालेला अन्याय आणि अत्याचार जगजाहीर करण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून मोठी क्रांती घडवून आणली. अण्णाभाऊ साठे यांची जशी लेखणी गाजली तशीच त्यांची डफावरची थाप देखील गाजली. त्यांच्या लावण्या पोवाडे ते आजही प्रेरणादायी आहेत. समाजाने आण्णाभाऊ चे विचार स्वीकारावेत असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या
वतीने आयोजित अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने ते बोलत होते. साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,अनिल पंचाक्षरी विधानसभा प्रमुख,मनोज पाटील तालुकाप्रमुख,आमेर शेख शहरप्रमुख,लखन कांबळे शहरप्रमुख, व्यंकट कसबे सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष,विलास राठोड ओबीसी जिल्हा अध्यक्ष,अतुल
काकडे,देवा घंटे,सतीश कांबळे,मारोती साळुंखे, अविनाश बेदरे,बाळू शिंदे शहर संघटक,महेश मंदाडे,अनिल जाधव,सुशील मुळे, हणमंत गुलफुले, शशिकला पाटील, रमाबाई वाघमोरे सामाजिक न्याय महिला अध्यक्ष,आरती सूर्यवंशी बांधकाम कामगार सेना जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाती कांबळे,जिजाबाई वाघमारे आदी शिवसैनिकासह महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.1
- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा2