logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन जवळा : प्रतिनिधी जवळा येथील बोधिसत्व बुद्धविहार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सौ. मायाताई मुजमुले व परमजीतताई मुजमुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमादरम्यान भीमराव मुजमुले यांनी मार्गदर्शन करताना प्लेगच्या काळातील प्रसंग सांगितला. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी प्लेगग्रस्त रुग्णांची निःस्वार्थपणे सेवा केली आणि सेवा करत असतानाच त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. त्यांच्या कार्यामुळे समाजसेवेचा आदर्श पुढील पिढ्यांसमोर उभा राहतो, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी उपस्थित सर्वांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

5 hrs ago
user_Ganesh Ekandwar jawala
Ganesh Ekandwar jawala
ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
5 hrs ago
bae3ac9b-421e-4abb-b8c0-0ab2d94d50b2

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन जवळा : प्रतिनिधी जवळा येथील बोधिसत्व बुद्धविहार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सौ. मायाताई मुजमुले व परमजीतताई मुजमुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमादरम्यान भीमराव मुजमुले यांनी मार्गदर्शन करताना प्लेगच्या काळातील प्रसंग सांगितला. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी प्लेगग्रस्त रुग्णांची निःस्वार्थपणे सेवा केली आणि सेवा करत असतानाच त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. त्यांच्या कार्यामुळे समाजसेवेचा आदर्श पुढील पिढ्यांसमोर उभा राहतो, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी उपस्थित सर्वांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा जवळा (ता. आर्णी) : प्रतिनिधी बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रताताई विनोद पंचभाई, सौ. रुचिका गणेश एकंडवार, सौ. हर्षला अनिल चौधरी आणि सौ. परमजीत अमोल मुजमुले उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सौ. मायाताई भीमराव मुजमुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. नम्रताताई पंचभाई यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच सौ. परमजीतताई मुजमुले यांनी भारतीय संविधानात महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सौ. आशाताई जाधव यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच भीमराव मुजमुले यांनीही आपले विचार मांडत उपस्थित पाहुण्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मीनाबाई मुजमुले यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
    1
    बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
जवळा (ता. आर्णी) : प्रतिनिधी
बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रताताई विनोद पंचभाई, सौ. रुचिका गणेश एकंडवार, सौ. हर्षला अनिल चौधरी आणि सौ. परमजीत अमोल मुजमुले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सौ. मायाताई भीमराव मुजमुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. नम्रताताई पंचभाई यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच सौ. परमजीतताई मुजमुले यांनी भारतीय संविधानात महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात सौ. आशाताई जाधव यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच भीमराव मुजमुले यांनीही आपले विचार मांडत उपस्थित पाहुण्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मीनाबाई मुजमुले यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
    user_Ganesh Ekandwar jawala
    Ganesh Ekandwar jawala
    ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.
    1
    दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला.
ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला  पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
    1
    जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    16 hrs ago
  • # पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप#news#nandednews#kinwatnews#nandedpolice#spabinashkumar#cmdevendrfadanwis#cmomaharashtra
    1
    # पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप#news#nandednews#kinwatnews#nandedpolice#spabinashkumar#cmdevendrfadanwis#cmomaharashtra
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer Karanja, Washim•
    16 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अमरण उपोषणाचा दुसरा दिवस भानेगाव येथील विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. भानेगाव येथील जल जीवन मिशन (JJM) व पाणीपुरवठा कामातील अनियमितता, बनावट कागदपत्रे व सह्या, सन 2021–23 मधील ग्रामपंचायत विकास कामांची चौकशी, जि.प. प्राथमिक शाळेतील कामांची चौकशी, तसेच माजी मुख्याध्यापक चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न झाल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूरामुळे बंद होणारा गावाचा जीवनावश्यक रस्ता पुनर्वसन जागेतून तात्काळ खुला करावा व बेलगव्हाण–भानेगाव पांदन रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
    1
    अमरण उपोषणाचा दुसरा दिवस
भानेगाव येथील विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
भानेगाव येथील जल जीवन मिशन (JJM) व पाणीपुरवठा कामातील अनियमितता, बनावट कागदपत्रे व सह्या, सन 2021–23 मधील ग्रामपंचायत विकास कामांची चौकशी, जि.प. प्राथमिक शाळेतील कामांची चौकशी, तसेच माजी मुख्याध्यापक चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न झाल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पूरामुळे बंद होणारा गावाचा जीवनावश्यक रस्ता पुनर्वसन जागेतून तात्काळ खुला करावा व बेलगव्हाण–भानेगाव पांदन रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
    user_Prashant singanwad
    Prashant singanwad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.