लाखखिंड परिसरात विहिरीत पडला बिबट्या; वन विभागाकडून रेस्क्यू दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.
लाखखिंड परिसरात विहिरीत पडला बिबट्या; वन विभागाकडून रेस्क्यू दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.
- दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.1
- बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा जवळा (ता. आर्णी) : प्रतिनिधी बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रताताई विनोद पंचभाई, सौ. रुचिका गणेश एकंडवार, सौ. हर्षला अनिल चौधरी आणि सौ. परमजीत अमोल मुजमुले उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सौ. मायाताई भीमराव मुजमुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. नम्रताताई पंचभाई यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच सौ. परमजीतताई मुजमुले यांनी भारतीय संविधानात महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सौ. आशाताई जाधव यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच भीमराव मुजमुले यांनीही आपले विचार मांडत उपस्थित पाहुण्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मीनाबाई मुजमुले यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.1
- Post by Sharad Dayedar1
- जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.1
- नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे अक्का यांची वार्डात फिरून स्वच्छतेची पाहणी; कर्मचाऱ्यांना दिल्या कडक सूचना प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे : धामणगांव शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावे या उद्देशाने नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे (अक्का) यांनी सकाळी विविध वार्डांमध्ये प्रत्यक्ष फिरून स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील नाल्या, कचरा शौचालय व्यवस्थापन तसेच स्वच्छतेसंदर्भातील विविध बाबींची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सकाळच्या वेळेत नगराध्यक्षांनी वार्डांमध्ये फेरफटका मारत नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नाल्यांची स्वच्छता, रस्त्यावरील कचरा तसेच स्वच्छता कामांच्या अंमलबजावणीची त्यांनी बारकाईने पाहणी केली. काही ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या इतर बाबी लक्षात घेऊन त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वार्ड परिसरात नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शहरात स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आणि जबाबदारीने काम करावे, तसेच नाल्या व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे यांनी यावेळी नागरिकांनाही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. घरातील कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये टाकू नये, तो डस्टबिनमध्ये जमा करून नगरपरिषदेच्या घंटागाडीतच द्यावा. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वच्छ आणि निरोगी शहर घडवण्यासाठी सर्वांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष स्वतः सकाळी वार्डांमध्ये फिरून स्वच्छतेची पाहणी करत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून धामणगांव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वासही नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.1
- Post by Amravati News Update1
- एकता नगर वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे नगरपंचायत बाशिटाकळीमधील कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे1
- वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली शेत शिवार परिसरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन वेगवेगळ्या गावचे तरुण मिळालेल्या माहितीनुसार, मृत आढळलेले दोन्ही तरुण आजूबाजूच्या परिसरातीलच आहेत. पहिल्या मृताची ओळख दिनेश दिवाकर मारकाम (वय ३४, रा. जळगाव मंगरूळ) अशी पटली आहे, तर दुसरा मृतदेह धीरज मातरे (रा. ढाकुलगाव) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही मृतदेह वाघोली शिवारातील कॅनलमध्ये काही अंतरावर आढळून आले. पोलीस पथक घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरीश तातोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये हवालदार सागर कदम, अतुल पाटील, नवनाथ खेडकर, हरिहर वैद्य आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर धावक यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहेत. या दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की अपघात? याचा अधिक तपास दत्तापूर पोलीस करत आहेत. एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे व चर्चेचे वातावरण पसरले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह* *💥दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली* *💥सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे*1