logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

टीईटी सक्तीविरोधात जंतरमंतरवर आमदार दराडेचे आंदोलन दिल्लीत शिक्षक आमदारांना अटक,केंद्र शासनाने शिक्षकांना न्याय देण्याची मागणी टीईटी सक्तीविरोधात जंतरमंतरवर आमदार दराडेचे आंदोलन दिल्लीत शिक्षक आमदारांना अटक,केंद्र शासनाने शिक्षकांना न्याय देण्याची मागणी सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षकांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटीच्या सक्तीपासून संरक्षण देऊन त्यांच्या सेवा सुरक्षित ठेवाव्यात, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर लाक्षणिक उपोषणासाठी जात असताना आमदार किशोर दराडे,माजी आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत,बाळाराम पाटील यांना दिल्ली पोलिसांनी ऐनवेळी आंदोलनाची परवानगी नाकारून ताब्यात घेतले. मात्र यापुढेही आंदोलन वेगळेवेगळे टप्प्यावर सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिक्षकांच्या नियुक्तीच्या वेळी लागू असलेल्या शासन नियमांचा विचार न करता सेवेत कार्यरत शिक्षकांवर कालांतराने टीईटीची अट लादणे अन्यायकारक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. अनेक शिक्षकांनी दीर्घकाळ सेवा बजावली असून, त्यांच्या अनुभवाचा, सेवाकाळाचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा विचार करून त्यांना सेवासंरक्षण देण्यात यावे,शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सेवेत असलेल्या शिक्षकांच्या परिस्थितीचा मानवीय, व्यावहारिक आणि न्याय्य दृष्टिकोनातून विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. विशेषतः ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली त्या वेळी टीईटी ही अनिवार्य पात्रता नव्हती, अशा शिक्षकांवर नंतरच्या नियमांची सक्ती करू नये, अशी भूमिका मांडण्यात आली. या संदर्भात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने तसेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने राज्य सरकारांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात, जेणेकरून विविध राज्यांमध्ये नियमांच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम किंवा प्रशासकीय असमानता निर्माण होणार नाही, अशी मागणीही करण्यात आली.दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या प्रश्नाकडे विशेष गांभीर्याने पाहण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.२० ते ३० वर्षाहून अधिक काळ सेवा बजावलेल्या शिक्षकांची दीर्घसेवा,अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या घडणीत असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सेवेला संरक्षण द्यावे, अशी भूमिका घेण्यात आली. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या प्रश्नावर केंद्र सरकार, शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात आवश्यक समन्वय साधून व्यवहार्य तोडगा काढावा,अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्रात टीईटी लागू करण्याची वास्तविक वेळरेषा आणि त्या आधी नियुक्त झालेल्या शिक्षकांची मोठी संख्या लक्षात घेऊन विशेष सवलत व सेवासंरक्षणाची व्यवस्था करावी, असेही निवेदनात केली आहे.या मागण्यांचे निवेदन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. “सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांवर टीईटीची सक्ती करणे हा त्यांच्या सेवासुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या योगदानाचा विचार करून शासनाने तातडीने न्याय्य निर्णय घ्यावा. शिक्षकांच्या सेवासंरक्षणासाठी केंद्र सरकारने सकारात्मक हस्तक्षेप करावा,” -आमदार किशोर दराडे,नाशिक

59 min ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
59 min ago
6a007cd6-fd2a-4877-a372-a1dcbc412af1

टीईटी सक्तीविरोधात जंतरमंतरवर आमदार दराडेचे आंदोलन दिल्लीत शिक्षक आमदारांना अटक,केंद्र शासनाने शिक्षकांना न्याय देण्याची मागणी टीईटी सक्तीविरोधात जंतरमंतरवर आमदार दराडेचे आंदोलन दिल्लीत शिक्षक आमदारांना अटक,केंद्र शासनाने शिक्षकांना न्याय देण्याची मागणी सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षकांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटीच्या सक्तीपासून संरक्षण देऊन त्यांच्या सेवा सुरक्षित ठेवाव्यात, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर लाक्षणिक उपोषणासाठी जात असताना आमदार किशोर दराडे,माजी आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत,बाळाराम पाटील यांना दिल्ली पोलिसांनी ऐनवेळी आंदोलनाची परवानगी नाकारून ताब्यात घेतले. मात्र यापुढेही आंदोलन वेगळेवेगळे टप्प्यावर सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिक्षकांच्या नियुक्तीच्या वेळी लागू

667f82e2-6fda-4f46-b71d-2ebcabf5416b

असलेल्या शासन नियमांचा विचार न करता सेवेत कार्यरत शिक्षकांवर कालांतराने टीईटीची अट लादणे अन्यायकारक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. अनेक शिक्षकांनी दीर्घकाळ सेवा बजावली असून, त्यांच्या अनुभवाचा, सेवाकाळाचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा विचार करून त्यांना सेवासंरक्षण देण्यात यावे,शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सेवेत असलेल्या शिक्षकांच्या परिस्थितीचा मानवीय, व्यावहारिक आणि न्याय्य दृष्टिकोनातून विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. विशेषतः ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली त्या वेळी टीईटी ही अनिवार्य पात्रता नव्हती, अशा शिक्षकांवर नंतरच्या नियमांची सक्ती करू नये, अशी भूमिका मांडण्यात आली. या संदर्भात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने तसेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने राज्य सरकारांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात, जेणेकरून विविध राज्यांमध्ये नियमांच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम किंवा प्रशासकीय असमानता निर्माण होणार नाही, अशी मागणीही करण्यात आली.दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या प्रश्नाकडे विशेष

6ea571ba-1f2f-49ab-ac79-a3cd0c24e615

गांभीर्याने पाहण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.२० ते ३० वर्षाहून अधिक काळ सेवा बजावलेल्या शिक्षकांची दीर्घसेवा,अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या घडणीत असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सेवेला संरक्षण द्यावे, अशी भूमिका घेण्यात आली. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या प्रश्नावर केंद्र सरकार, शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात आवश्यक समन्वय साधून व्यवहार्य तोडगा काढावा,अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्रात टीईटी लागू करण्याची वास्तविक वेळरेषा आणि त्या आधी नियुक्त झालेल्या शिक्षकांची मोठी संख्या लक्षात घेऊन विशेष सवलत व सेवासंरक्षणाची व्यवस्था करावी, असेही निवेदनात केली आहे.या मागण्यांचे निवेदन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. “सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांवर टीईटीची सक्ती करणे हा त्यांच्या सेवासुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या योगदानाचा विचार करून शासनाने तातडीने न्याय्य निर्णय घ्यावा. शिक्षकांच्या सेवासंरक्षणासाठी केंद्र सरकारने सकारात्मक हस्तक्षेप करावा,” -आमदार किशोर दराडे,नाशिक

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात ​येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. ​या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. ​अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात
स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात
​येवला (प्रतिनिधी):
स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली.
​या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते.
​अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप लासलगाव (विशेष प्रतिनिधी) : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3] गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन: आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
    1
    नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप
लासलगाव (विशेष प्रतिनिधी) :
नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3]
गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन:
आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
    user_Janardhan nitin jadhav
    Janardhan nitin jadhav
    Farmer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" ​काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! ​रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? ​अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. ​गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा
    2
    माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!"
​काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो!
​रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार?
​अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे.
​गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात!
तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.
    1
    जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त 
जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
    1
    मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
    user_SACH TAK TV NEWS MALEGAON
    SACH TAK TV NEWS MALEGAON
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र
    1
    शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र
लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ
    1
    पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام
    1
    مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام
مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام
    user_SACH TAK TV NEWS MALEGAON
    SACH TAK TV NEWS MALEGAON
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.