logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मंठा शहरातील जवाहर कॉलनी परिसरात एका धक्कादायक घटनेत देशी दारूच्या दुकानातून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंठा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनीतील देशी दारूच्या दुकानात काही कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी “अजून किती निरपराध जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. नागरिकांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशी दारूचे दुकान बंद करणे, आरोपींवर कठोर कारवाई करणे, परिसरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे या प्रमुख मागण्या केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंठा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या मृत्यूबद्दल शोककळा पसरली आहे.

1 hr ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
1 hr ago

मंठा शहरातील जवाहर कॉलनी परिसरात एका धक्कादायक घटनेत देशी दारूच्या दुकानातून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंठा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनीतील देशी दारूच्या दुकानात काही कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी “अजून किती निरपराध जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. नागरिकांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशी दारूचे दुकान बंद करणे, आरोपींवर कठोर कारवाई करणे, परिसरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे या प्रमुख मागण्या केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंठा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या मृत्यूबद्दल शोककळा पसरली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंठा शहरातील जवाहर कॉलनी परिसरात एका धक्कादायक घटनेत देशी दारूच्या दुकानातून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंठा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनीतील देशी दारूच्या दुकानात काही कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी “अजून किती निरपराध जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. नागरिकांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशी दारूचे दुकान बंद करणे, आरोपींवर कठोर कारवाई करणे, परिसरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे या प्रमुख मागण्या केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंठा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या मृत्यूबद्दल शोककळा पसरली आहे.
    1
    मंठा शहरातील जवाहर कॉलनी परिसरात एका धक्कादायक घटनेत देशी दारूच्या दुकानातून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंठा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनीतील देशी दारूच्या दुकानात काही कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी “अजून किती निरपराध जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. नागरिकांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशी दारूचे दुकान बंद करणे, आरोपींवर कठोर कारवाई करणे, परिसरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे या प्रमुख मागण्या केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंठा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या मृत्यूबद्दल शोककळा पसरली आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील सुगत पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये नंबरवरून वाद झाला. यामुळे डिझेल वाटप करण्यास पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण झाला.
    1
    जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील सुगत पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये नंबरवरून वाद झाला. यामुळे डिझेल वाटप करण्यास पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण झाला.
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • महाराष्ट्रामध्ये डिझेल टंचाईने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतीच्या कामांसाठी डिझेल मिळत नसल्याने परभणीच्या मानवत आणि नंदुरबारच्या शहादा येथे पेट्रोल पंपांवर तुंबळ हाणामारीच्या घटना घडल्या.
    1
    महाराष्ट्रामध्ये डिझेल टंचाईने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतीच्या कामांसाठी डिझेल मिळत नसल्याने परभणीच्या मानवत आणि नंदुरबारच्या शहादा येथे पेट्रोल पंपांवर तुंबळ हाणामारीच्या घटना घडल्या.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जेव्हा कुटुंबाचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान आव्हान देतात, तेव्हा त्यांच्या मताशी सहमत असलेली जनता ते आव्हान स्वीकारते.
    1
    जेव्हा कुटुंबाचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान आव्हान देतात, तेव्हा त्यांच्या मताशी सहमत असलेली जनता ते आव्हान स्वीकारते.
    user_नंदकिशोर  साखरकर
    नंदकिशोर साखरकर
    Chauffeur service मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • परभणी जिल्ह्यात आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या 'धोंडे जेवण' कार्यक्रमाची राजकीय नेत्यांसह नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
    1
    परभणी जिल्ह्यात आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या 'धोंडे जेवण' कार्यक्रमाची राजकीय नेत्यांसह नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • वंचित बहुजन आघाडीने गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही मागणी वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांना निवेदन देऊन केली.
    1
    वंचित बहुजन आघाडीने गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही मागणी वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांना निवेदन देऊन केली.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • न्यूज मराठी 24x7 लाईव्ह टीव्ही चॅनलवर परभणी जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
    1
    न्यूज मराठी 24x7 लाईव्ह टीव्ही चॅनलवर परभणी जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील ५१ वर्षीय शेतकरी गोपीनाथ जनार्धन सरकटे यांचा डिझेल आणण्यासाठी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असताना, ग्रामीण भागात डिझेलची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना इंधनासाठी दूरवर प्रवास करावा लागत आहे. वझर सरकटे गाव परिसरात पेट्रोल पंपाची सुविधा नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. माहितीनुसार, गोपीनाथ सरकटे हे प्रथम ढोकसाळ येथील अहिरे पंपावर डिझेलसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माऊली (नायरा) पंपावरही प्रयत्न केला, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना डिझेल उपलब्ध झाले नाही. यानंतर ते मंठा शहराकडे येत असताना जालना-जितूर महामार्गावरील एस. आय. बँकेजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी वर्गातून "डिझेल मिळाले नाही, पण शेतकऱ्याचा जीव गेला," अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत आहेत.
    1
    मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील ५१ वर्षीय शेतकरी गोपीनाथ जनार्धन सरकटे यांचा डिझेल आणण्यासाठी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असताना, ग्रामीण भागात डिझेलची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना इंधनासाठी दूरवर प्रवास करावा लागत आहे. वझर सरकटे गाव परिसरात पेट्रोल पंपाची सुविधा नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे.

माहितीनुसार, गोपीनाथ सरकटे हे प्रथम ढोकसाळ येथील अहिरे पंपावर डिझेलसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माऊली (नायरा) पंपावरही प्रयत्न केला, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना डिझेल उपलब्ध झाले नाही. यानंतर ते मंठा शहराकडे येत असताना जालना-जितूर महामार्गावरील एस. आय. बँकेजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी वर्गातून "डिझेल मिळाले नाही, पण शेतकऱ्याचा जीव गेला," अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत आहेत.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.