logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मकोडी येथे तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण संपन्न ​ भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली व संत नामदेव सेवाभावी संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मकोडी ता. सेनगाव येथे नुकतेच शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. ​या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषि विद्या विषयाचे विषय विशेषज्ञ  राजेश भालेराव यांनी सोयाबीन पिकातील सद्यस्थितीतील आवश्यक व्यवस्थापन, करपा रोगाची लक्षणे व त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच तूर पिकामध्ये शेंडा खुडणे व कामगंध सापळ्यांचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. यासोबतच कापूस पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. ​उद्यानविद्या विषय विशेषज्ञ अनिल ओळंबे यांनी हळद पिकातील सद्यस्थितीतील आंतरमशागतीची कामे व एकात्मिक खत व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. हळदीमध्ये ट्रायकोडर्मा, पीएसबी व टर्मरिक बूस्टरचा वापर, कंदकुज व कंदसड यांचे व्यवस्थापन तसेच करपा रोगाची लक्षणे व उपायांबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय खोडकिडा व हुमणी किडीची लक्षणे ओळखून त्यांच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या. ​मृदा शास्त्र विषय विशेषज्ञ  साईनाथ खरात यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत जीवामृत, बीजामृत व अग्निअस्त्र तयार करण्याची प्रात्यक्षिक पद्धत आणि त्यांचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .​तसेच कृषि विस्तार विषय विशेषज्ञ डॉ. अतुल मुराई यांनी कृषी विज्ञान केंद्राची कार्यपद्धती आणि केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध कृषी निविष्ठांची माहिती दिली.​या कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर यांच्यातर्फे गावातील शेतकऱ्यांसाठी ट्रायकोडर्मा, मेटारायझियम व टर्मरिक बूस्टर या निविष्ठा उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारुती कदम,  भारत सांगळे यांच्यासह ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

1 day ago
user_Shankar mulgir
Shankar mulgir
Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
1 day ago
2d97d1d4-f62b-4ffb-8477-bc230f9c79e4

मकोडी येथे तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण संपन्न ​ भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली व संत नामदेव सेवाभावी संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मकोडी ता. सेनगाव येथे नुकतेच शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. ​या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषि विद्या विषयाचे विषय विशेषज्ञ  राजेश भालेराव यांनी सोयाबीन पिकातील सद्यस्थितीतील आवश्यक व्यवस्थापन, करपा रोगाची लक्षणे व त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच तूर पिकामध्ये शेंडा खुडणे व कामगंध सापळ्यांचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. यासोबतच कापूस पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. ​उद्यानविद्या विषय विशेषज्ञ अनिल ओळंबे यांनी हळद पिकातील सद्यस्थितीतील आंतरमशागतीची कामे व एकात्मिक खत व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. हळदीमध्ये ट्रायकोडर्मा, पीएसबी व टर्मरिक बूस्टरचा वापर, कंदकुज व कंदसड यांचे व्यवस्थापन तसेच करपा रोगाची लक्षणे व उपायांबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय खोडकिडा व हुमणी किडीची लक्षणे ओळखून त्यांच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या. ​मृदा शास्त्र विषय विशेषज्ञ  साईनाथ खरात यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत जीवामृत, बीजामृत व अग्निअस्त्र तयार करण्याची प्रात्यक्षिक पद्धत आणि त्यांचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .​तसेच कृषि विस्तार विषय विशेषज्ञ डॉ. अतुल मुराई यांनी कृषी विज्ञान केंद्राची कार्यपद्धती आणि केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध कृषी निविष्ठांची माहिती दिली.​या कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर यांच्यातर्फे गावातील शेतकऱ्यांसाठी ट्रायकोडर्मा, मेटारायझियम व टर्मरिक बूस्टर या निविष्ठा उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारुती कदम,  भारत सांगळे यांच्यासह ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे.  सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    1
    कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल
कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. 
सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    1
    मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे ,
धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    1
    सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न 
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    6 hrs ago
  • 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    1
    🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
 शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू,
📍 वसमत, जि. हिंगोली
शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली—
🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
असा स्पष्ट इशारा!
✊ जमीन आमची — निर्णय आमचा!
🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द!
#शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    1
    मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले.

तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे.

सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    1
    🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात!

📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
  • परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन
    1
    परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन
परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 hrs ago
  • नांदेड : वाघाळा भागातील ड्रेनेज चे पाणी नागरीकांच्या बाथरुम मध्ये नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वाघाळा भागातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या शाहु नगर,मिरा नगर,साठे नगर भागातील ड्रेनेज च्या पाण्यने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे या भागातील ड्रेनेज लाईनीतील घाण साफ करण्यासाठी मनपातील कर्मचारी वर्षानुवर्ष येतच नाहीत आले तर थातुरमातुर ड्रेनेज लाईन साफ करुन निघून जातात या ड्रेनजचे पाणी अक्षरक्षा नागरीकांच्या बाथरुम मध्ये, रस्त्यावर येत असून या मुळे रोगराई पसरत आहे.या भागातील नागरिकांच्या समस्या कडे या भागातील नगरसेवक तर दुर्लक्ष करीतच आहेत मात्र मनपा कडून ही दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
    1
    नांदेड :  वाघाळा भागातील ड्रेनेज चे पाणी नागरीकांच्या बाथरुम मध्ये नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात 

 : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वाघाळा भागातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या शाहु नगर,मिरा नगर,साठे नगर भागातील ड्रेनेज च्या पाण्यने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे या भागातील ड्रेनेज लाईनीतील घाण साफ करण्यासाठी मनपातील कर्मचारी वर्षानुवर्ष येतच नाहीत आले तर थातुरमातुर ड्रेनेज लाईन साफ करुन निघून जातात या ड्रेनजचे पाणी अक्षरक्षा नागरीकांच्या बाथरुम मध्ये, रस्त्यावर येत असून या मुळे रोगराई पसरत आहे.या भागातील नागरिकांच्या समस्या कडे या भागातील नगरसेवक तर दुर्लक्ष करीतच आहेत मात्र मनपा कडून ही दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.