मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना गती द्यावी कामे गुणवत्ता व कालमर्यादेत करावीत - ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना बोर्डीकर राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच इतर सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देत ती निश्चित कालमर्यादेत आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण करावीत, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. एमएसईबी होल्डिंग कंपनी, फोर्ट (मुंबई) येथे झालेल्या बैठकीत विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस राज्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, सौर प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या हस्तांतरणात काही ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्यास अशा प्रकरणांमध्ये संबंधित यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या जागांवर अतिक्रमणे असल्यास ती काढण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, कोणत्याही कारणास्तव कामे रखडू नयेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला स्वस्त व स्थिर वीजपुरवठा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, यामुळे शेतकऱ्यांचा वीज खर्च कमी होण्यास आणि पारंपरिक ऊर्जेवरील ताण कमी करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना गती द्यावी कामे गुणवत्ता व कालमर्यादेत करावीत - ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना बोर्डीकर राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच इतर सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देत ती निश्चित कालमर्यादेत आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण करावीत, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना
साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. एमएसईबी होल्डिंग कंपनी, फोर्ट (मुंबई) येथे झालेल्या बैठकीत विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस राज्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, सौर प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या हस्तांतरणात काही ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्यास अशा प्रकरणांमध्ये संबंधित यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या जागांवर अतिक्रमणे
असल्यास ती काढण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, कोणत्याही कारणास्तव कामे रखडू नयेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला स्वस्त व स्थिर वीजपुरवठा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, यामुळे शेतकऱ्यांचा वीज खर्च कमी होण्यास आणि पारंपरिक ऊर्जेवरील ताण कमी करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
- टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत प्रियंका मुंडे सरपंचपदी विजयी; 132 मतांनी दणदणीत विजय, गावात जल्लोष1
- • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.1
- Post by Today One Live1
- नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. यावर प्रशासन लक्ष देईल का. सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे4
- प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.1
- कछरा का दिकत1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई4
- लातूर शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई करताना गंभीर अनियमितता समोर आली आहे. वाहनांना लॉक करणाऱ्या काही व्यक्तींकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र (ID कार्ड) नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही कारवाई अधिकृत आहे का, आणि महापालिकेने दिलेले टेंडर नेमके कोणाकडे आहे, यावर नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. नियमबाह्य पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकृत कंत्राटदार कोण, त्यांची ओळख काय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, याबाबत पारदर्शकता नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेने या प्रक्तात्ती तत्काल चौकशी करून1