दर्शनाला निघाले, पण रस्त्यात काळाने गाठलं; दोन भाविकांचा मृत्यू! बाकी सोळा जण जखमी......... चिखली (बुलडाणा ) : मेहकर-चिखली मार्गावरील मांद्रा धाडे फाट्याजवळ सैलानी बाबाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाल्याची घटना २९ मार्च रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील भाविक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी हिवरा आश्रमकडे पिकअप वाहन (क्र. MH-12 GU 7670) ने जात होते. दरम्यान, मांद्रा धाडे फाट्याजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले व भीषण अपघात झाला. या अपघातात अरमान शरीफ बागवान (वय १६) व रिहान सैदुल्ला बागवान (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शहाना बागवान (३५), शबाना बागवान (२५), इफ्तार बागवान (१९), आफिका बागवान (१२), बुशरा बागवान (६), आलिया बागवान (२५), हाफिज बागवान (१५), पाशा मोहम्मद बागवान (७५), मावीश बागवान (९), हिना बागवान (३०), अमोर बागवान (१३), अनस बागवान (१२), अजर बागवान (१०), साहेरा बागवान (६५), शशरीफ बागवान (३५) यांसह एकूण १६ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले व अॅम्बुलन्सच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. काही काळ या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. मेहकर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

- बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा1
- खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी1
- बुलढाणा शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; 'जिओ और जीने दो'च्या संदेशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन1
- खामगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलांचे अपहरण व जीवे मारायची धमकी...1
- खामगाव: अयोध्येतील श्रीराम नवमीचा उत्सव यंदा अकोला आणि खामगाव येथील भाविकांच्या योगदानाने अधिकच गोड झाला. अकोल्यातील प्रसिद्ध उद्योजक व खामगावचे नामांकित वकील ॲड. उदयसिंह आपटे यांचे बहीण-जावई सुधीरराव अभ्यंकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने अयोध्येत तब्बल साडेतीन लाख राजगिरा लाडूंचे भव्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात २२ मार्च रोजी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात आरती करून झाली. लाडूंनी भरलेले दोन मोठे ट्रक अयोध्येकडे रवाना करण्यात आले. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या ट्रकला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. अयोध्या येथे पोहोचल्यानंतर अभ्यंकर परिवार आणि त्रिशक्ती ग्रुपचे सचिव सत्येंद्रसिंह ठाकूर यांनी या महाप्रसादाच्या वाटपाची धुरा सांभाळली. रामनवमीच्या पर्वावर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत अखंडपणे लाखो भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विवेक बिडवई हेदेखील आपल्या पत्नीसह उपस्थित होते.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- भोंदु बाबा व नागरिक , भोंदु बाबांना आरती म्हणता येत नाही.. भोंदु महाराज खेड तालुक्यातील घटना ...1