logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

(प्रतिनिधी):- राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्या मुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या पुतळा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (संभाजीनगर परिक्षेत्र) यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटाकर, मुबीन शेख, शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष, विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड), सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, भिमराव कुटे सह आदी उपस्थित होते. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः वादग्रस्त ठिकाणी उभारण्यात आलेल्या अशा अनाधिकृत स्मारकांमुळे समाजात तणाव निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता वाढते. त्या मुळे अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने २ मे २०१७ रोजी पुतळा धोरणासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, त्या नुसार पुतळा उभारण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तसेच पुतळ्याचे ठिकाण वादग्रस्त नसावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, उंची व साहित्याला तांत्रिक मान्यता असावी, तसेच कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन शपथपत्र व ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच पुतळे उभारावेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी या वेळी व्यक्त केली.

18 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
18 hrs ago

(प्रतिनिधी):- राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्या मुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या पुतळा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (संभाजीनगर परिक्षेत्र) यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटाकर, मुबीन शेख, शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष, विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड), सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, भिमराव कुटे सह आदी उपस्थित होते. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः वादग्रस्त ठिकाणी उभारण्यात आलेल्या अशा अनाधिकृत स्मारकांमुळे समाजात तणाव निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता वाढते. त्या मुळे अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने २ मे २०१७ रोजी पुतळा धोरणासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, त्या नुसार पुतळा उभारण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तसेच पुतळ्याचे ठिकाण वादग्रस्त नसावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, उंची व साहित्याला तांत्रिक मान्यता असावी, तसेच कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन शपथपत्र व ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच पुतळे उभारावेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी या वेळी व्यक्त केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात ‘लाव्हा सदृश’ पदार्थाचा उलगडा; विद्युत गळतीमुळे वितळले खडक पहा सविस्तर व्हिडिओ... जालन्यात विद्युत गळतीमुळे वितळले खडक ! राजपूत वाडीत खळबळीनंतर महावितरणचे स्पष्टीकरण; बिघाड दुरुस्त, परिस्थिती नियंत्रणात जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या ‘लाव्हा सदृश’ पदार्थ बाहेर येण्याच्या रहस्यमय घटनेचा अखेर उलगडा झाला असून ही घटना विद्युत गळतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विद्युत खांबाजवळील जमिनीतून गरम व चिकट पदार्थ बाहेर येताना दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहून त्याचे व्हिडिओही चित्रीत केले. तत्काळ महावितरण विभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या महावितरणच्या पथकाने तपास सुरू केला असता, ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर खराब पिन इन्सुलेटरमुळे V-क्रॉस आर्म आणि RSJ पोलच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे विद्युतप्रवाह थेट जमिनीत गेल्याने (इलेक्ट्रोक्यूशन) तीव्र उष्णता निर्माण झाली. परिसरातील खडकाळ जमिनीमुळे या उष्णतेचा परिणाम म्हणून जमिनीतील खडक वितळून ‘लाव्हा सदृश’ स्वरूपात बाहेर येताना दिसले. त्यामुळे हा प्रकार नैसर्गिक नसून तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
    1
    जालन्यात ‘लाव्हा सदृश’ पदार्थाचा उलगडा; विद्युत गळतीमुळे वितळले खडक पहा सविस्तर व्हिडिओ...
जालन्यात विद्युत गळतीमुळे वितळले खडक ! 
राजपूत वाडीत खळबळीनंतर महावितरणचे स्पष्टीकरण; बिघाड दुरुस्त, परिस्थिती नियंत्रणात
जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या ‘लाव्हा सदृश’ पदार्थ बाहेर येण्याच्या रहस्यमय घटनेचा अखेर उलगडा झाला असून ही घटना विद्युत गळतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विद्युत खांबाजवळील जमिनीतून गरम व चिकट पदार्थ बाहेर येताना दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहून त्याचे व्हिडिओही चित्रीत केले. तत्काळ महावितरण विभागाला माहिती देण्यात आली.
घटनास्थळी दाखल झालेल्या महावितरणच्या पथकाने तपास सुरू केला असता, ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर खराब पिन इन्सुलेटरमुळे V-क्रॉस आर्म आणि RSJ पोलच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे विद्युतप्रवाह थेट जमिनीत गेल्याने (इलेक्ट्रोक्यूशन) तीव्र उष्णता निर्माण झाली.
परिसरातील खडकाळ जमिनीमुळे या उष्णतेचा परिणाम म्हणून जमिनीतील खडक वितळून ‘लाव्हा सदृश’ स्वरूपात बाहेर येताना दिसले. त्यामुळे हा प्रकार नैसर्गिक नसून तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जालना महापालिकेखडुन अतिक्रमण च्या नावाखाली दहा लाख रुपयांचा टेंडर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक दावा,
    1
    जालना महापालिकेखडुन अतिक्रमण च्या नावाखाली दहा लाख रुपयांचा टेंडर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक दावा,
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य डिजिटल बैनरचे जल्लोषात उद्धघाट्न, यावेळी नगरसेवक रामदास पाथरे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोगदंडे, विशाल मिसाळ, मंगेश पगारे, रोहण पगारे, प्रवीण आढावे आदी उपस्थित.
    1
    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य डिजिटल बैनरचे जल्लोषात उद्धघाट्न, यावेळी नगरसेवक रामदास पाथरे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोगदंडे, विशाल मिसाळ, मंगेश पगारे, रोहण पगारे, प्रवीण आढावे आदी उपस्थित.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • जालना जिल्ह्यासह बदनापुर तालुक्यात गॅस टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “नरेंद्र, कब मिलेगा गॅस सिलेंडर?” अशा घोषणा देत आंदोलकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. या आंदोलनात जालना जिल्ह्यातील व बदनापुर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी बनवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आणि गॅस टंचाई तात्काळ दूर करण्याची मागणी केली.
    2
    जालना जिल्ह्यासह बदनापुर तालुक्यात  गॅस टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले 
असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
“नरेंद्र, कब मिलेगा गॅस सिलेंडर?” अशा घोषणा देत आंदोलकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
या आंदोलनात जालना जिल्ह्यातील व   बदनापुर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी बनवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आणि गॅस टंचाई तात्काळ दूर करण्याची मागणी केली.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ध्वनी प्रदूषणाविरुद्ध लातूर पोलिसांच्या वाहतूक शाखेची कारवाई; ₹9.18 लाखाचे मॉडीफाय सायलेन्सर, हॉर्न, टेप जप्त करून सार्वजनिकरित्या नाश.* नागरिकांच्या आरोग्य, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांचे नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील महिन्यात या विशेष राबविण्यात आली होती. मोहिमेमध्ये वाहनांवर बसविण्यात आलेल्या बेकायदेशीर व कर्णकर्कश ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत सदर उपकरणे जप्त करण्यात आलेले त्यामध्ये हॉर्न, फटाका सायलेन्सर, टेप, लेझर लाईट असे 09 लाख 18 हजार रुपयाचे उपकरणाच्या समावेश होता. वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर यांनी शहरातील विविध प्रमुख मार्ग, चौक व संवेदनशील भागांमध्ये वाहनांची तपासणी करून नियमबाह्य उपकरणे शोधून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली विशेषतः युवकांकडून वापरले जाणारे “इंदुरी (फटाका) सायलेन्सर”, मॉडिफाईड मफलर, उच्च क्षमतेचे साऊंड बॉक्स, कर्णकर्कश हार्न, एलईडी लाईट्स व टेप रेकॉर्डर यांचा समावेश या कारवाईत करण्यात आला. या मोहिमेत एकूण — 149 बेकायदेशीर सायलेन्सर (अंदाजे किंमत ₹7,45,000/-),19 साऊंड बॉक्स (अंदाजे किंमत ₹1,52,000/-),06 हार्न (अंदाजे किंमत ₹3,000/-), 25 एलईडी लाईट्स (अंदाजे किंमत ₹5,000/-), 13 टेप रेकॉर्डर (अंदाजे किंमत ₹13,000/-), असा एकूण ₹9,18,000/- (नऊ लाख अठरा हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे नोंदवून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले साहित्य भविष्यात पुन्हा वापरात येऊ नये, तसेच नागरिकांना होणारा त्रास कायमस्वरूपी थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला. ते आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी सर्व जप्त साहित्य नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन रोड येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोरील सिमेंट रोडवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, पंच तसेच छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत रोड रोलरच्या सहाय्याने सर्व साहित्य पूर्णतः निकामी करण्यात आले. ही प्रक्रिया संपूर्णपणे “इन-कॅमेरा” नोंदविण्यात आली. यानंतर निकामी करण्यात आले. सदर स्क्रॅप विक्रीतून ₹16,560/- इतकी रक्कम प्राप्त झाली असून ती शासनाकडे अधिकृत चलनाद्वारे जमा करण्यात येत आहे. लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाहनांवर बेकायदेशीर सायलेन्सर, कर्णकर्कश हार्न, साऊंड सिस्टीम किंवा इतर ध्वनी प्रदूषण करणारी उपकरणे बसवू नयेत. अशा प्रकारचे कृत्य हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून समाजाच्या आरोग्यास व शांततेस बाधा पोहोचवणारे आहे.भविष्यातही अशा प्रकारच्या ध्वनी प्रदूषणाविरोधात लातूर पोलीस दलाकडून सातत्याने व अधिक तीव्रतेने कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    ध्वनी प्रदूषणाविरुद्ध लातूर पोलिसांच्या वाहतूक शाखेची कारवाई; ₹9.18 लाखाचे मॉडीफाय सायलेन्सर, हॉर्न, टेप जप्त करून सार्वजनिकरित्या नाश.*
नागरिकांच्या आरोग्य, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांचे नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील महिन्यात या विशेष राबविण्यात आली होती. मोहिमेमध्ये वाहनांवर बसविण्यात आलेल्या बेकायदेशीर व कर्णकर्कश ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत सदर उपकरणे जप्त करण्यात आलेले त्यामध्ये  हॉर्न, फटाका सायलेन्सर, टेप, लेझर लाईट असे 09 लाख 18 हजार रुपयाचे उपकरणाच्या समावेश होता. 
वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर यांनी शहरातील विविध प्रमुख मार्ग, चौक व संवेदनशील भागांमध्ये वाहनांची तपासणी करून नियमबाह्य उपकरणे शोधून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली विशेषतः युवकांकडून वापरले जाणारे “इंदुरी (फटाका) सायलेन्सर”, मॉडिफाईड मफलर, उच्च क्षमतेचे साऊंड बॉक्स, कर्णकर्कश हार्न, एलईडी लाईट्स व टेप रेकॉर्डर यांचा समावेश या कारवाईत करण्यात आला.
या मोहिमेत एकूण —
149 बेकायदेशीर सायलेन्सर (अंदाजे किंमत ₹7,45,000/-),19 साऊंड बॉक्स (अंदाजे किंमत ₹1,52,000/-),06 हार्न (अंदाजे किंमत ₹3,000/-), 25 एलईडी लाईट्स (अंदाजे किंमत ₹5,000/-),
13 टेप रेकॉर्डर (अंदाजे किंमत ₹13,000/-), असा एकूण ₹9,18,000/- (नऊ लाख अठरा हजार रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे नोंदवून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
जप्त केलेले साहित्य भविष्यात पुन्हा वापरात येऊ नये, तसेच नागरिकांना होणारा त्रास कायमस्वरूपी थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला. ते आज दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी सर्व जप्त साहित्य नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन रोड येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोरील सिमेंट रोडवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, पंच तसेच छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत रोड रोलरच्या सहाय्याने सर्व साहित्य पूर्णतः निकामी करण्यात आले. ही प्रक्रिया संपूर्णपणे “इन-कॅमेरा” नोंदविण्यात आली.
यानंतर निकामी करण्यात आले. सदर स्क्रॅप विक्रीतून ₹16,560/- इतकी रक्कम प्राप्त झाली असून ती शासनाकडे अधिकृत चलनाद्वारे जमा करण्यात येत आहे.
लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वाहनांवर बेकायदेशीर सायलेन्सर, कर्णकर्कश हार्न, साऊंड सिस्टीम किंवा इतर ध्वनी प्रदूषण करणारी उपकरणे बसवू नयेत. अशा प्रकारचे कृत्य हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून समाजाच्या आरोग्यास व शांततेस बाधा पोहोचवणारे आहे.भविष्यातही अशा प्रकारच्या ध्वनी प्रदूषणाविरोधात लातूर पोलीस दलाकडून सातत्याने व अधिक तीव्रतेने कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • काय म्हणतय लातूर... दूषित पाणी पितंय लातूर ! लातूरकरांना दूषित पाणी देणाऱ्या आणि सिटी बस सेवा ठप्प करणाऱ्या भ्रष्टाचारी काँग्रेसचा जाहीर निषेध !
    1
    काय म्हणतय लातूर...
दूषित पाणी पितंय लातूर !
लातूरकरांना दूषित पाणी देणाऱ्या आणि सिटी बस सेवा ठप्प करणाऱ्या भ्रष्टाचारी काँग्रेसचा जाहीर निषेध !
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जालना शहरात आज मिळालेले माहिती अनुसार गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. गॅस पंप मालकांकडून दरवाढीबाबत मनमानी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत जीआर (शासन निर्णय) मागितल्यानंतरही तो देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शहर अध्यक्ष संतोष शेळके यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जालना शहरातील गॅस पंपांवर सध्या वाढीव दराने गॅस विक्री होत असल्याची माहिती समोर आली
    1
    जालना शहरात आज मिळालेले माहिती अनुसार गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. गॅस पंप मालकांकडून दरवाढीबाबत मनमानी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत जीआर (शासन निर्णय) मागितल्यानंतरही तो देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शहर अध्यक्ष संतोष शेळके यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जालना शहरातील गॅस पंपांवर सध्या वाढीव दराने गॅस विक्री होत असल्याची माहिती समोर आली
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सिंदखेडराजा रोडवर नवा घाटात दिपक भाई केदार यांच्या गाडीचा अपघात झालाय..अज्ञात वाहाने टक्कर मारून फरार झाला आहे. दीपक भाई केदार सुखरूप आहेत. माझं आताच सोबत बोलणं झालं आहे..! #AllindiaPantherSena
    1
    सिंदखेडराजा रोडवर नवा घाटात दिपक भाई केदार यांच्या गाडीचा अपघात झालाय..अज्ञात वाहाने टक्कर मारून फरार झाला आहे. 
दीपक भाई केदार सुखरूप आहेत. माझं आताच सोबत बोलणं झालं आहे..!
#AllindiaPantherSena
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.