Shuru
Apke Nagar Ki App…
#buldhana Ka Hai Ye Waqiya Ek Buzurg Ko Takkar Marke Bhag Gaye Ka #hitandrun Jiski Wajhe Se Buzurg Ki Jaan Chali Gai #malkapur Insan Ke Jaan Ki khimat Itni Hi hai? Waqiya CCTV Me Khaid.
Atul markande
#buldhana Ka Hai Ye Waqiya Ek Buzurg Ko Takkar Marke Bhag Gaye Ka #hitandrun Jiski Wajhe Se Buzurg Ki Jaan Chali Gai #malkapur Insan Ke Jaan Ki khimat Itni Hi hai? Waqiya CCTV Me Khaid.
More news from Malkapur and nearby areas
- Chicken Fry Piece Biryani!!Sangam_Hotels_Malkapur . . visit sangamhotelsmalkapur MALKAPUR, CHOUTUPPAL MANDAL, YADADRI DISTRICT Follow Our Facebook Page: https://www.facebook.com/profile.php?id=61552511637113 Follow Our Instagram: https://www.instagram.com/sangam.hotelsmalkapur/ Visit Our Webisite:www.sangamhotelsmalkapur.com Follow Our Twitter: Sangamhotelsma . .1
- मलकापूर: भरधाव कारच्या धडकेत वृद्ध जागीच ठार; पोलिसांकडून चौकशी सुरू1
- मा आमदार राजेश एकडे साहेब मलकापूर विधानसभा यांनी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या विध्यार्थी साठी मौलाना आजाद रिसर्च अँड ट्रेनिंग इस्टिट्यूट (मार्टी)नावाने सारथी बार्टी च्या धरतीवर स्थापन करावी या साठी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे अधिवेशनात मांगणी1
- अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले आणि विवीध प्रश्न उपस्थित केले...!! १)नांदुरा व मलकापूर नगरपालिका क्षेत्रांना वाढीव विकास निधी द्या...!! विदर्भाचे प्रवेशद्वार असणाऱ्या मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा या दोन नगरपालिकांना अतिरिक्त विकास निधी द्यावा तसेच हद्दवाढ झाल्यानंतर नवीन भागामध्ये विकास कामांना शासन निधी देते मात्र नांदुरा व मलकापूर या दोन्ही नगरपालिकांना हद्दवाढी नंतर विकासनिधी शासनाने अद्यापही दिला नाही तो तात्काळ द्यावा अशी मागणी विधानसभेत दिनांक ०४ जुलै रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होतांना केली.मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा ही दोन मोठी शहरे असून नांदुरा शहराची हद्दवाढ झाली आहे हद्दवाढी नंतर नवीन समाविष्ट झालेल्या भागांच्या विकासाकरता शासनाने निधी देणे क्रमप्राप्त आहे मात्र अद्यापही नांदुरा शहराला हद्दवाढ झालेल्या नवीन वस्त्यांमध्ये वाढीव विकासनिधी मिळाला नाही त्याचप्रमाणे मलकापूर नगरपालिकेला सुद्धा विकास कामांकरिता वाढीव निधीची आवश्यकता असल्याचे विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना अधोरेखित केले.तसेच शासनाने तात्काळ नांदुरा व मलकापूर नगरपालिकेतील हद्दवाढी नंतर समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन भागाला वाढीव विकासनिधी देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.सदर निधी प्राप्त झाल्यानंतर मलकापूर व नांदुरा शहरातील हद्दवाढी नंतर समाविष्ट झालेल्या भागातील विकास कामे जलद गतीने पूर्ण होणार आहेत. २)मलकापूर व नांदुरा शहराला मिळणार नवीन पाणीपुरवठा योजना....!! मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरांसाठी सुमारे ४५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असून वाढत्या लोकसंख्येनुसार मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी विधानसभेत केली आहे.विदर्भाचे प्रवेशद्वार असणाऱ्या मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा ही दोन मोठी शहरे असून या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना ही ४५ वर्षांपूर्वीची आहे.त्यामुळे वाढती लोकसंख्या व निकामी झालेल्या जलवाहिन्या यामुळे वारंवार वरील दोन्ही शहरांसाठी पाणीपुरवठा खंडित होतो.मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी आले आहेत.त्यांना तात्काळ मंजुरी देऊन मलकापूर व नांदुरा शहरात करता नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी त्यांच्या मागणीनुसार मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरांना लवकरच नवीन पाणीपुरवठा योजना मिळणार आहे. ४)अल्पसंख्यांक समाजाकरीता मार्टीची स्थापना करा..!! स्वातंत्र्यानंतरअल्पसंख्यांक समाजाकरीता मार्टीची स्थापना करून अल्पसंख्यांक प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे.शासनाने तात्काळ अल्पसंख्यांक समाजाकरीता मार्टीची स्थापना करण्याची मागणी विधानभवनात अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना केली आहे अल्पसंख्यांक समाजाचा आर्थिक स्तर सुधरविण्यासाठी तसेच अल्पसंख्याकांमधील व्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रातून प्रगती करणाऱ्यांकरीता स्वतंत्र मार्टीची स्थापना करून त्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना मदत करावी अशी मागणी अधिवेशनात अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना केली आहे.राज्यात सारथी,बार्टी,महाज्योती आदींची स्थापना करून शासनाने संबंधितांना न्याय दिला आहे.त्याचप्रमाणे राज्यातील अल्पसंख्यांक करिता मार्टीची स्थापना करण्याची मागणी केली आहे...!! ४)मराठा व ओ.बी.सी तरुणांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करा...!! राज्यात होणाऱ्या पोलीस भरती करिता ओ.बी.सी संवर्गातील सुमारे सहा लक्ष व मराठा समाजातील चार लक्ष तरुणांनी अर्ज भरले असून त्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची कोणतीही व्यवस्था शासनाने केली नाही.मराठा व ओ.बी.सी तरुणांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शासनाने द्यावे अशी मागणी विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना केली आहे.राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी एस.सी व एस.टी संवर्गाकरिता शासनाने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची सोय केली आहे.मात्र या भरती करता तयारी करणाऱ्या ओ.बी.सी व मराठा तरुणांकरीता शासनाने भरतीपूर्व प्रशिक्षणाबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही किंवा शासन ओ.बी.सी व मराठा तरुणांना भरतीपूर्व प्रशिक्षण देत नाही हा मराठा व ओ.बी.सी तरुणांवर अन्याय आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मराठा व ओ.बी.सी तरुणांना देण्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याची मागणी शासन दरबारी केली आहे...!! ५)नांदुरा तालुक्यातील शेती खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या...!! नांदुरा तालुक्यात जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडून प्रचंड नुकसान झाले आहे.खरडून गेलेल्या शेतीचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे मात्र अद्यापही नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने मदत वितरित केली नाही इतर भागात शासनाने मदत दिली मग मलकापूर मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा या मधील शेतकऱ्यांशी दुजाभाव का..??अर्थसंकल्पीय चर्चेत राज्य शासनाची भेदभाव पूर्ण वागणुक विधानभवनाच्या माध्यमातून सर्व राज्यासमोर उघड केली,तसेच जमीन खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली,मलकापूर मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा तालुक्यात जुलै २०२३मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे,अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही मलकापूर मतदारसंघातील नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीच मदत शासनाने केली नाही.शासकीय मदतीचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत.महसूल विभागाने पंचनामे करून झालेल्या नुकसानीबाबत शासनाला माहिती दिली आहे मात्र अद्यापही राज्य शासनाने कोणतीही मदत शेतकऱ्यांना केली नाही.राज्य शासनाने दुजाभाव करत इतर भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत केली मग नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा गुन्हा काय..?? या शेतकऱ्यांसोबत राज्य शासन दुजाभाव का करीत आहे..??असा परखळ प्रश्न अर्थसंकल्पीय चर्चेतून विचारून शेती खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित करण्याबाबतची मागणी केली आहे...!!1
- *आमदार राजेश एकडे यांनी विधान भवनात मांडला कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावाचा व व्यापाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीचा तारांकित प्रश्न* *(कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची सभागृहात केली घोषणा).* कापूस उत्पादनाचा खर्च वाढला असून शासनाने हमीभावाने खरेदी न केल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला असून शासनाने हमीभावाने खरेदी न केल्याने मलकापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकला व त्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून पळ काढला त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला असून मलकापूर व नांदुरा तालुक्यातील त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी असा शेतकरी हिताचा तारांकित प्रश्न विधानभवनात दि. ३ जुलै रोजी मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी शासनाला विचारून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी उत्तरात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची झालेली लूट व त्यांच्या आर्थिक नुकसान मान्य करून त्यांना मदत करण्याचे आमदार राजेश एकडे यांच्या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना जाहीर केले. मलकापूर मतदार संघात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून उत्पादन खर्च वाढल्याने तसेच कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकले आहेत. मागील वर्षी शासनाने हमीदराने कापसाची खरेदी न केल्याने शेतकऱ्यांनी अखेर अत्यल्पभावात खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकला त्यांनी कापूस विकत घेऊन शेतकऱ्यांना मालाचे पैसे दिले नाही. त्यामुळे आधीच लागलेला उत्पादन खर्च व व्यापाऱ्याने केलेली फसवणूक या गंभीर प्रश्नाकडे मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानभवनात शासनाचे लक्ष वेधले. या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची झालेली फसवणूक मान्य करून त्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचे जाहीर केले. आमदार राजेश एकडे यांच्या तारांकित प्रश्नांमुळे मलकापूर मतदारसंघातील कापूस उत्पादक त्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.1
- Highlight 1:13:03 – 1:18:03 from Adarsh Jr College मलकापूर कराड. HSC गुणवंत विद्यार्थी, पालक सत्कार.1
- मलकापूर चे आमदार राजेश एकडे यांनी मांडले विधानसभेत तारांकित प्रश्न1
- मलकापूर कोपार्डे येथे विजेच्या धक्क्याने सख्ख्या भावांचा मृ**1