logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*साकोली येथे आदिवासी जागतिक दिन* *मोठ्या उत्साहात साजरा* साकोली :- साकोली तालुक्याच्या ठिकाणी नॅशनल आदिवासी पिपल्स, महिला फेडरेशन, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, ऑफ्रोट संघटना,आदिवासी हलबा/हलबी समाज कर्मचारी महासंघ व आदिवासी समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलमूर्ती सभागृह साकोली येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी जंगल कामगार सोसायटी येथून आदिवासी समाज बांधवांची भव्य दिव्य रॅली प्रगती काॅलोनी चौक ते एकडी रोड चौक ते मंगलमूर्ती सभागृह पर्यंत आदिवासीच्या पारंपारिक वेशभुषेत आदिवासी वाद्य व गोंडी गाण्यावर नाचत गाजत काढण्यात आली. रॅलीत सल्ला गागरा,पहांदी पारी कुपार लिंगो,पाटलियार हिरीसुखा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतीमा तसेच आदिवासी वारली चित्रकला विशेष आकर्षक दिसत होती. रॅलीनंतर मंगलमूर्ती सभागृहात समाजप्रबोधन मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे तालुका अध्यक्ष भानुदास खांडवाये तर उद्घाटक म्हणून तहसिल कार्यालय साकोली चे नायब तहसीलदार भुमेश्वर पेंदाम,सह उद्घाटक माजी क्रिडा अधिकारी अनिराम मरस्कोल्हे, दिपप्रज्वलन भंडारा जिल्हा जंगल कामगार सहकारी संस्थाचा संघाचे अध्यक्ष तथा बी डी सी सी बॅंकचे संचालक धर्मराज भलावी हे होते. विशेष अतिथी म्हणून पोलीस स्टेशन साकोली चे पी एस आय देवकन्याताई ईवनाते,नगर परिषद साकोली चे माजी उपाध्यक्ष जगन उईके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती साकोली चे से.नि. विस्तार अधिकारी नागोराव मेळे,माजी सरपंच हेमलताताई परसगडे, सामाजिक कार्यकर्त्या लिलाताई वलके, आदिवासी हलबा/हलबी समाज कर्मचारी महासंघचे तालुका अध्यक्ष प्रा.नवाजी घरत,नॅशनल आदिवासी महिला फेडरेशनच्या तालुका अध्यक्षा कुंदाताई कुंभरे,चांदोरी चे सरपंच विठ्ठलजी मसराम,जे एम पटेल काॅलेज भंडारा चे प्राध्यापक देविदास काटेंगे,शिवनीबांधच्या सरपंचा पुस्तकलाबाई उईके प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवर मंडळीनी आदिवासी समाज बांधवांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयावर मार्गदर्शन केले तसेच मार्च २०२६ मध्ये वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले अश्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवोदय विद्यालय, एकलव्य विद्यालयात निवड झालेले व शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश उईके व दिलीप सयाम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमेश मरस्कोल्हे व आभार प्रदर्शन केशव भलावी यांनी केले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ येळणे, ओमप्रकाश कुंभरे, पवनकुमार टेकाम, नरेश कुंभरे,होमनाथ पुरामकर,तुळशिदास कुंभरे,राजु जुगनाहके, भिमराव वाडीवा अरविंद टेकाम, केशव उईके,राजु वलके,कमलसिंग कोडापे, चंद्रकुमार मरस्कोल्हे, सुरेश ताराम,गिरीधारी सराटे,तेजराम मलये,मेथिलाल नाईक, देवानंद कुरसुंगे,आनंदराव वलके, विनोद सयाम, गणेश तुमळे, संदेश सयाम तसेच संघटनेचे पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. कार्यक्रमासाठी साकोली तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

17 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
17 hrs ago

*साकोली येथे आदिवासी जागतिक दिन* *मोठ्या उत्साहात साजरा* साकोली :- साकोली तालुक्याच्या ठिकाणी नॅशनल आदिवासी पिपल्स, महिला फेडरेशन, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, ऑफ्रोट संघटना,आदिवासी हलबा/हलबी समाज कर्मचारी महासंघ व आदिवासी समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलमूर्ती सभागृह साकोली येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी जंगल कामगार सोसायटी येथून आदिवासी समाज बांधवांची भव्य दिव्य रॅली प्रगती काॅलोनी चौक ते एकडी रोड चौक ते मंगलमूर्ती सभागृह पर्यंत आदिवासीच्या पारंपारिक वेशभुषेत आदिवासी वाद्य व गोंडी गाण्यावर नाचत गाजत काढण्यात आली. रॅलीत सल्ला गागरा,पहांदी पारी कुपार लिंगो,पाटलियार हिरीसुखा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतीमा तसेच आदिवासी वारली चित्रकला विशेष आकर्षक दिसत होती. रॅलीनंतर मंगलमूर्ती सभागृहात समाजप्रबोधन मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे तालुका अध्यक्ष भानुदास खांडवाये तर उद्घाटक म्हणून तहसिल कार्यालय साकोली चे नायब तहसीलदार भुमेश्वर पेंदाम,सह उद्घाटक माजी क्रिडा अधिकारी अनिराम मरस्कोल्हे, दिपप्रज्वलन भंडारा जिल्हा जंगल कामगार सहकारी संस्थाचा संघाचे अध्यक्ष तथा बी डी सी सी बॅंकचे संचालक धर्मराज भलावी हे होते. विशेष अतिथी म्हणून पोलीस स्टेशन साकोली चे पी एस आय देवकन्याताई ईवनाते,नगर परिषद साकोली चे माजी उपाध्यक्ष जगन उईके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती साकोली चे से.नि.

विस्तार अधिकारी नागोराव मेळे,माजी सरपंच हेमलताताई परसगडे, सामाजिक कार्यकर्त्या लिलाताई वलके, आदिवासी हलबा/हलबी समाज कर्मचारी महासंघचे तालुका अध्यक्ष प्रा.नवाजी घरत,नॅशनल आदिवासी महिला फेडरेशनच्या तालुका अध्यक्षा कुंदाताई कुंभरे,चांदोरी चे सरपंच विठ्ठलजी मसराम,जे एम पटेल काॅलेज भंडारा चे प्राध्यापक देविदास काटेंगे,शिवनीबांधच्या सरपंचा पुस्तकलाबाई उईके प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवर मंडळीनी आदिवासी समाज बांधवांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयावर मार्गदर्शन केले तसेच मार्च २०२६ मध्ये वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले अश्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवोदय विद्यालय, एकलव्य विद्यालयात निवड झालेले व शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश उईके व दिलीप सयाम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमेश मरस्कोल्हे व आभार प्रदर्शन केशव भलावी यांनी केले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ येळणे, ओमप्रकाश कुंभरे, पवनकुमार टेकाम, नरेश कुंभरे,होमनाथ पुरामकर,तुळशिदास कुंभरे,राजु जुगनाहके, भिमराव वाडीवा अरविंद टेकाम, केशव उईके,राजु वलके,कमलसिंग कोडापे, चंद्रकुमार मरस्कोल्हे, सुरेश ताराम,गिरीधारी सराटे,तेजराम मलये,मेथिलाल नाईक, देवानंद कुरसुंगे,आनंदराव वलके, विनोद सयाम, गणेश तुमळे, संदेश सयाम तसेच संघटनेचे पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. कार्यक्रमासाठी साकोली तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नागपुर हैंडलूम हैंडीक्राफ्ट मेला जयताला बाजार चौक नागपुर
    1
    नागपुर हैंडलूम हैंडीक्राफ्ट मेला 
जयताला बाजार चौक नागपुर
    user_Rajesh Khurana
    Rajesh Khurana
    अनुष्का ट्रेड फेयर (मेला) नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • तिरंगा म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना, एकतेची शक्ती आणि भारताचा गौरव ! तिरंगा म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना, एकतेची शक्ती आणि भारताचा गौरव !
    1
    तिरंगा म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना, एकतेची शक्ती आणि भारताचा गौरव !
तिरंगा म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना, एकतेची शक्ती आणि भारताचा गौरव !
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ : सर्वत्र चर्चेला उधाण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ नागपूर: (दि १०) नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. कारण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ झाल्याची प्राथमिक माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे.
    1
    नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ : सर्वत्र चर्चेला उधाण
नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ 
नागपूर: (दि १०) नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. कारण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ झाल्याची प्राथमिक माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • अशासकीय सदस्य कलावंत मानधन समिती रद्द करा * कलावंत संघटनांतर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक कलावंत मानधन अशासकीय सदस्य समिती रद्द करा अशी मागणी विविध कलावंत संघटनाच्या वतीने दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा येथे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनातून करण्यात आली. ही समिती पालकमंत्री यांच्या सहीनिशी जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत दि. ३ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये शासकीय प्रकियेनुसार कला, लोककला, नाटक, साहित्यिक क्षेत्रातील १० नामवंत कलावंत यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली जाते. परंतु अशासकीय निवड झालेल्या समिती मध्ये एक दोन कलावंत सोडले तर इतर सदस्य यांचा कला कलाक्षेत्राशी काहीही संबंध नाही व योगदान नाही ते फक्त राजकिय क्षेत्रात काम करतात त्यांची निवड अशासकीय सदस्य म्हणून करण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कलावंत संतापले आहेत व त्यांचा आक्रोश आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय मागण्यासाठी सर्व कलावंत पोहचले. सर्व कलावंतांची एकच मागणी आहे की जिल्ह्यातील नामवंत कलावंत, साहित्यिक, पुरस्कार प्राप्त कलावंताना अशासकीय सदस्य कलावंत निवड समिती मध्ये समाविष्ट केले पाहिजे.अन्यथा १५ आगस्ट नंतर जिल्ह्यातील सर्व कलावंतांचे आंदोलन सुद्धा करण्यात येइल अशी पूर्वसूचना सुद्धा निवेदनात देण्यात आली. निवेदन देतांना सामाजीक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम , जनजगार संघटनेचे अध्यक्ष प्रबोधनकार भावेश कोटांगले, भंडारा कलाकार बहू.संस्था उपाध्यक्ष गणेश आथिलकर, अध्यक्ष नत्थु बांते, कार्तिक मेश्राम, सोमप्रभू तांदुळकर, कवी नाशिक चवरे, शाहीर अंबादास नागदेवे, रामनाथ कळंबे, लक्ष्मीकांत मेश्राम, डॉ. पुरुषोत्तम बोन्द्रे, गणेश देशमुख, प्रकाश नाकतोडे, अमित हारगुडे व इतर कलावंत उपस्थित होते.
    1
    अशासकीय सदस्य कलावंत मानधन समिती रद्द करा * कलावंत संघटनांतर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

       राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक  कलावंत मानधन अशासकीय सदस्य समिती रद्द करा अशी मागणी विविध कलावंत संघटनाच्या वतीने  दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा येथे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनातून करण्यात आली. ही समिती पालकमंत्री यांच्या सहीनिशी जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत दि. ३ जुलै २०२६ रोजी  जाहीर करण्यात आली. त्यामध्ये शासकीय प्रकियेनुसार कला, लोककला, नाटक, साहित्यिक क्षेत्रातील १० नामवंत कलावंत यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली जाते.
       परंतु अशासकीय निवड झालेल्या समिती मध्ये एक दोन कलावंत सोडले तर इतर सदस्य यांचा कला कलाक्षेत्राशी काहीही संबंध नाही व योगदान नाही ते फक्त राजकिय क्षेत्रात काम करतात  त्यांची निवड अशासकीय सदस्य म्हणून करण्यात आली  आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कलावंत संतापले  आहेत व त्यांचा आक्रोश आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय मागण्यासाठी सर्व कलावंत पोहचले. सर्व कलावंतांची एकच मागणी आहे की  जिल्ह्यातील नामवंत कलावंत, साहित्यिक, पुरस्कार प्राप्त कलावंताना अशासकीय सदस्य कलावंत निवड समिती मध्ये समाविष्ट केले पाहिजे.अन्यथा १५ आगस्ट नंतर जिल्ह्यातील  सर्व कलावंतांचे  आंदोलन सुद्धा करण्यात येइल अशी पूर्वसूचना सुद्धा निवेदनात देण्यात आली.
         निवेदन देतांना सामाजीक   चळवळीचे नेते परमानंद मेश्राम , जनजगार  संघटनेचे  अध्यक्ष प्रबोधनकार भावेश कोटांगले, भंडारा कलाकार बहू.संस्था उपाध्यक्ष गणेश आथिलकर, अध्यक्ष नत्थु बांते, कार्तिक मेश्राम, सोमप्रभू तांदुळकर, कवी नाशिक चवरे,  शाहीर अंबादास नागदेवे, रामनाथ 
कळंबे, लक्ष्मीकांत मेश्राम, डॉ. पुरुषोत्तम बोन्द्रे, गणेश देशमुख, प्रकाश नाकतोडे, अमित हारगुडे व इतर कलावंत उपस्थित होते.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ ; चर्चेला उधाण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ ; चर्चेला उधाण नागपूर: (दि १०) नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. कारण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ झाल्याची प्राथमिक माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे.
    1
    नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ ; चर्चेला उधाण
नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ ; चर्चेला उधाण
नागपूर: (दि १०) नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. कारण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ झाल्याची प्राथमिक माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • 'हर घर तिरंगा अभियान'च्या तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि देशप्रेमाचा जयघोष.....! 'हर घर तिरंगा अभियान'च्या तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि देशप्रेमाचा जयघोष.....!
    1
    'हर घर तिरंगा अभियान'च्या तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि देशप्रेमाचा जयघोष.....!
'हर घर तिरंगा अभियान'च्या तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि देशप्रेमाचा जयघोष.....!
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आंदोलन: गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात निषेध आंदोलन.
    1
    आंदोलन: गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात निषेध आंदोलन.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.