Shuru
Apke Nagar Ki App…
कांदा उत्पादक शेतकऱ्याला दमदाटी; आंदोलन होताच तासाभरात दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द! गंगापुर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून दमदाटी व अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अवघ्या एका तासात संबंधित दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.
Marathi News Point
कांदा उत्पादक शेतकऱ्याला दमदाटी; आंदोलन होताच तासाभरात दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द! गंगापुर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून दमदाटी व अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अवघ्या एका तासात संबंधित दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अभिजीत दिपकेंविरोधात पोलीस बॉईज संघटनेचे मूक आंदोलन,पोलीस संरक्षण काढण्याची मागणी. अभिजीत दिपके यांच्या घरासमोर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला अपशब्द वापरून घराबाहेर काढल्या प्रकरणी पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे 15 ऑगस्ट पर्यंत इतक्या यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत मूक आंदोलन करण्यात येत आहे.1
- सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई,अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड प्रतिनिधी : ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील M/s S.T. Canteen Upahar Gruh येथे धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींची कमतरता अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. फरशीपासून स्वयंपाकघरापर्यंत अस्वच्छता कॅन्टीनच्या तळमजल्यावरील फरशीवर धूळ, माती, वेष्टने आणि पॅकेजिंगचा कचरा आढळला. भिंतींचे पापुद्रे निघालेले असून रंग उडालेला व भिंती काळवंडलेल्या होत्या. खिडक्यांना कीटक व उंदीर रोखण्यासाठी आवश्यक वायर मेशही बसवलेली नव्हती. भांडी घासण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले. FSSAI परवाना फलक आणि पाणी तपासणी अहवालही नाही कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. तसेच पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. बेसन, तेल व काही किराणा मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध असल्या तरी चिप्स, नमकीन आदी खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड सादर करता आले नाही. ‘मयूर ब्रँड’ चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी रेकॉर्डही तपासणीवेळी उपलब्ध नव्हते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही; कॅन्टीनचा परवाना निलंबित अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन व हातमोजेही नव्हते. हात धुण्याची तसेच कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा आढळली नाही. साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. उघड्या कचराकुंड्या, अयोग्य सांडपाणी वाहिन्या आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सदर कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Suspend Forthwith) केला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे.1
- Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉 Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉1
- Murde Per kiya 12 Ghante Ilaj Hospital Aur Dr Ka Kand1
- 💝 रक्षाबंधनाची गोड आठवण, भावापर्यंत पोहोचवा!या रक्षाबंधनाला प्रेमाची राखी दूर असलेल्या भावापर्यंत पोहोचवा! ❤️🎁 🔥भाऊ दूर आहे? चिंता नको… Rakhi Kiran Courier ने पाठवा! 📦❤️ रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची आठवण आणि प्रेमाची राखी तुमच्या भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवा. Kiran Courier मार्फत Rakhi, Gift आणि पार्सल पाठवा — वेळेत आणि विश्वासाने! 💝📦 राखी म्हणजे फक्त धागा नाही… ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे! ❤️ यंदा भाऊ तुमच्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम दूर राहू देऊ नका. 🎁 Rakhi & Gifts पाठवा 📦 सुरक्षित Courier Service 🚚 Doorstep Pickup ची सुविधा ❤️ तुमचं प्रेम, आमची जबाबदारी! Kiran Courier सोबत यंदाचं रक्षाबंधन खास बनवा! 📞 आजच Kiran Courier शी संपर्क करा आणि तुमची Rakhi पाठवा! 📲 Book Your Rakhi Parcel Today! #KiranCourier #Rakhi #RakshaBandhan #RakhiCourier #RakhiDelivery #RakhiParcel #BrotherSisterLove #RakshaBandhan2026 #CourierService #Sambhajinagar #Aurangabad #RakhiSpecial1
- संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...1
- कन्नड चे जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात कन्नड तालुक्यातील नगर परिषद ला लागून असलेली व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान तसेच तहसील कन्नड, शहरी पोलीस स्टेशनं ला जवळ असलेल्या कन्नड तालुक्यातील मुख्य जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात आहे. सदर अतिक्रमण हटवून जुने बस स्टॅन्ड चि जागा खुली करण्याची शासनाने तजवीज करावी.1
- नशेच्या धुंदीत तरुणाचा महामार्गावर धिंगाणा; ‘मला मारा, नाहीतर मी कोणाला तरी मारेन’ म्हणत घातला गोंधळ! वैजापूरच्या नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर नशेच्या अवस्थेतील एका तरुणाने भररस्त्यात वाहन थांबवून धिंगाणा घातला. ‘मला मारा, नाहीतर मी कोणाला तरी मारेन’, असे म्हणत तरुणाने रस्त्यावर गोंधळ घातल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी प्रल्हाद जटाले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी तरुणाला रस्त्यावरून हटवत वाहतूक सुरळीत केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नशेखोरीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावरील अशा घटना टाळण्यासाठी नशेखोरीला आळा घालण्यासोबतच प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.1