भव्य मेकअप सेमिनारमध्ये शेगावची ‘ब्युटी क्वीन’ ठरली पुजा वायचोळ! प्रथम क्रमांक पटकावून मानाचा तुरा... भव्य मेकअप सेमिनारमध्ये शेगावची ‘ब्युटी क्वीन’ ठरली पुजा वायचोळ! प्रथम क्रमांक पटकावून मानाचा तुरा शेगाव : शेगाव येथील देशमुख मंगल कार्यालयात आयोजित भव्य मेकअप व ब्युटी सेमिनारमध्ये रंगलेल्या ब्रायडल मेकअप स्पर्धेत शेगावच्या सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पुजा मनोज वायचोळ यांनी शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि उपस्थितांची वाहवा मिळवली. नागपूरच्या अपेक्षा सोनटक्के मॅडम यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या सेमिनारमध्ये राज्यभरातून जवळपास ५० ब्रायडल मेकअप आर्टिस्ट सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या आणि कौशल्यपूर्ण स्पर्धेत पुजा वायचोळ यांनी आपल्या उत्कृष्ट मेकअप आर्ट व क्रिएटिव्हिटीच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेत द्वितीय क्रमांक वैशाली याते (खामगाव) तर तृतीय क्रमांक सृष्टि प्रशांत शर्मा (मलकापूर) यांनी मिळवला. मुंबईतील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट अतुरेन सर यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पुजा वायचोळ या पुण्यातील सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट माधुरी खेसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून, मेहनत, सातत्य आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शेगावच्या नावाला नवी चमक मिळाली असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सौंदर्यकलेत शेगावचा झेंडा रोवणाऱ्या पुजा वायचोळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- किरकोळ वादाचे हिंसक रूप! लोखंडी रॉडने तरुणावर जीवघेणा हल्ला — तिघांविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने एका तरुणावर लोखंडी रॉडने निर्घृण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारी शेतातून घरी परतत असताना आरोपी प्रकाश मेटकर याने विनाकारण शिवीगाळ करत वाद उकरून काढला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हिंसक बनला. संतापलेल्या आरोपीने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून म्हस्के यांच्या हातावर व डोक्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले. इतक्यावरच न थांबता आरोपीची आई व बहीण सोनाली यांनीही घटनास्थळी धाव घेत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. “त्याला मारून टाका” अशी आरोळी देत हल्ल्यास उत्तेजन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत मध्यस्थी केली व जखमीला आरोपींच्या तावडीतून सोडवून तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेप्रकरणी २७ मार्च रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. किरकोळ वादातून वाढती हिंसा पुन्हा समोर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- खामगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलांचे अपहरण व जीवे मारायची धमकी...1
- खामगाव: अयोध्येतील श्रीराम नवमीचा उत्सव यंदा अकोला आणि खामगाव येथील भाविकांच्या योगदानाने अधिकच गोड झाला. अकोल्यातील प्रसिद्ध उद्योजक व खामगावचे नामांकित वकील ॲड. उदयसिंह आपटे यांचे बहीण-जावई सुधीरराव अभ्यंकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने अयोध्येत तब्बल साडेतीन लाख राजगिरा लाडूंचे भव्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात २२ मार्च रोजी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात आरती करून झाली. लाडूंनी भरलेले दोन मोठे ट्रक अयोध्येकडे रवाना करण्यात आले. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या ट्रकला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. अयोध्या येथे पोहोचल्यानंतर अभ्यंकर परिवार आणि त्रिशक्ती ग्रुपचे सचिव सत्येंद्रसिंह ठाकूर यांनी या महाप्रसादाच्या वाटपाची धुरा सांभाळली. रामनवमीच्या पर्वावर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत अखंडपणे लाखो भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विवेक बिडवई हेदेखील आपल्या पत्नीसह उपस्थित होते.1
- अपघातांची मालिका सुरूच असून,* *अपघातांचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे…*1
- बुलढाणा शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; 'जिओ और जीने दो'च्या संदेशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन1
- Post by Labour addaa.1
- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.2