सुटाळा बुद्रुक येथे शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न; भव्य यात्रेला प्रारंभ खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.
सुटाळा बुद्रुक येथे शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न; भव्य यात्रेला प्रारंभ खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे
मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.
- खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.2
- किरकोळ वादाचे हिंसक रूप! लोखंडी रॉडने तरुणावर जीवघेणा हल्ला — तिघांविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने एका तरुणावर लोखंडी रॉडने निर्घृण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारी शेतातून घरी परतत असताना आरोपी प्रकाश मेटकर याने विनाकारण शिवीगाळ करत वाद उकरून काढला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हिंसक बनला. संतापलेल्या आरोपीने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून म्हस्के यांच्या हातावर व डोक्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले. इतक्यावरच न थांबता आरोपीची आई व बहीण सोनाली यांनीही घटनास्थळी धाव घेत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. “त्याला मारून टाका” अशी आरोळी देत हल्ल्यास उत्तेजन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत मध्यस्थी केली व जखमीला आरोपींच्या तावडीतून सोडवून तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेप्रकरणी २७ मार्च रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. किरकोळ वादातून वाढती हिंसा पुन्हा समोर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- Post by Labour addaa.1
- बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- Post by Jansagar 9 Marathi1
- खामगाव : शहरातील हॉटेल, लॉजेस आणि कॅफेमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध खामगाव पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. 'ऑपरेशन मिशन परिवर्तन' अंतर्गत शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी कॅफे' वर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहरात मागील काही काळापासून संशयास्पद कॅफे आणि हॉटेल्सवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक कॅफेमध्ये शाळा-महाविद्यालयातील मुले-मुली गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच अनुषंगाने आज शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी' कॅफेची झडती घेतली असता, तिथे काही तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत मिळून आले. या प्रकरणी कॅफे मालक गौरव गावतरे याच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा किंवा कॉलेज सुटल्यानंतर आपली मुले वेळेवर घरी पोहोचतात की नाही, याची खात्री करावी. तसेच, शहरातील सर्व हॉटेल आणि कॅफे चालकांना स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे की, त्यांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांना थारा देऊ नये.असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तर पोलिसांनी यापूर्वीच शहरातील सर्व कॅफे आणि हॉटेल्सना कलम 168 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नुसार नोटिसा बजावल्या होत्या. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असा इशारा कॅफे व हॉटेल चालकांना दिला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणिव डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे.1