कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात मानोरा : कृषी केंद्राची तपासणी करून आढळलेल्या त्रुटींची पूर्तता अहवाल वरिष्ठांकडे सादर न करणे तसेच कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल न पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण वर्ग-२ उमेश राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (२७ ऑगस्ट) दुपारी सापळा रचून पकडले. राठोड हे तालुका कृषी कार्यालय, मानोरा येथे कार्यरत आहेत. संबंधित कृषी केंद्राची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता झाल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर न करण्यासाठी तसेच कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल पुढे न पाठविण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता सापळा रचण्यात आला. या कारवाईत उमेश राठोड यांना लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पीआय अलका गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एचसी योगेश खोटे, पीसी महेश परमेश्वर, सतीश गुळदे तसेच चालक नागेश चेक यांनी केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे मानोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात मानोरा : कृषी केंद्राची तपासणी करून आढळलेल्या त्रुटींची पूर्तता अहवाल वरिष्ठांकडे सादर न करणे तसेच कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल न पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण वर्ग-२ उमेश राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (२७ ऑगस्ट) दुपारी सापळा रचून पकडले. राठोड हे तालुका कृषी कार्यालय, मानोरा येथे कार्यरत आहेत. संबंधित कृषी केंद्राची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता झाल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर न करण्यासाठी तसेच कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल पुढे न पाठविण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता सापळा रचण्यात आला. या कारवाईत उमेश राठोड यांना लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पीआय अलका गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एचसी योगेश खोटे, पीसी महेश परमेश्वर, सतीश गुळदे तसेच चालक नागेश चेक यांनी केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे मानोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
- इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे. आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.1
- हिदायत पटेल हत्याकांड में बड़ा अपडेट! फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत खारिज | High Court फैसला हिदायत पटेल हत्याकांड मामले में बड़ा अपडेट सामने आया है। बॉम्बे हाईकोर्ट की नागपुर बेंच ने आरोपी फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत याचिका खारिज कर दी है। 24 अगस्त 2026 को दिए गए फैसले में कोर्ट ने उपलब्ध सामग्री के आधार पर प्रथमदृष्टया संलिप्तता का उल्लेख करते हुए गिरफ्तारी से पहले जमानत देने से इनकार किया। मामले में आरोपियों के बीच टेलीफोन पर बातचीत और अन्य कॉल रिकॉर्ड से जुड़े सबूत जांच के दौरान सामने आने की बात कोर्ट के समक्ष रखी गई। जांच एजेंसी की ओर से आरोपियों की कस्टोडियल पूछताछ को भी जरूरी बताया गया है। अब इस मामले की आगे की जांच और कोर्ट की कार्यवाही पर सभी की नजर है। 📍 हिदायत पटेल हत्याकांड की हर बड़ी और महत्वपूर्ण अपडेट के लिए जुड़े रहिए India News R7 के साथ। वीडियो पसंद आए तो Like 👍 करें, Share करें और India News R7 को Subscribe जरूर करें।1
- मधापुरीत प्रेमप्रकरणाचा थरार; तरुणाचा विहिरीत मृत्यू अन्... अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मधापुरी येथे प्रेमसंबंधाच्या कथित प्रकरणातून गुरुवारी खळबळ उडाली. अनिश चव्हाण या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला गावकऱ्यांनी वेळीच बाहेर काढले. घरी परतल्यानंतर तरुणीने विषप्राशन केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने माना पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. एसआरपीचे पथकही दाखल झाले असून, दोघांचे नेमके नाते व घटनेमागील कारणाचा तपास सुरू आहे.1
- अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड4
- दर्यापूरच्या विविध मागण्यांसाठी ओम राणेंची मंत्रालयाकडे सायकलवारी निवेदनांना दाद न मिळाल्याने थेट मंत्रालय गाठण्याचा निर्णय; शिक्षण, शैक्षणिक इमारत आणि ट्रॉमा सेंटरसह विविध मागण्यांसाठी पाठपुरावा1
- मा.खा.नवनीत राणा यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी व स्वर्गीय चरणदासजी इखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन1
- दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... अमरावती : - जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली1
- चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी धामणगांव रेल्वे तालुक्यातील चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी प्रवासी ऑटोने जात असताना पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावर शोभा माता मंदिराजवळ चारचाकी वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ऑटोमधील पाचही मुली गंभीर जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी ऑटोने निघाल्या होत्या. दरम्यान, पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावरील शोभा माता मंदिराजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या कडेला उतरला, तर चारचाकी वाहनाचीही दिशा बदलली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाचही मुलींना तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इरविन) येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शोभा माता मंदिराजवळ चक्काजाम आंदोलन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघाताचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1