अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड
अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी
येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना
फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय
जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड
- 🚨 Nanded Crime | अवैध विदेशी दारू वाहतुकीवर नायगाव पोलिसांचा छापा; ₹६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त 📍नायगाव | २७ ऑगस्ट २०२६ नायगाव परिसरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत ४७७ बाटल्या विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ₹६,०१,७९० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वडजे हॉस्पिटलजवळ पोलिसांनी सापळा रचून MH-12-NJ-2346 क्रमांकाची कार तपासली असता विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी विशाल बहादुरमल भंडारी, संजय शंकर बानेवाड आणि गणेश उर्फ गणपती गोविंदराव जाधव यांच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ) व ६५(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 💰 दारू : ₹१,०१,७९० 🚗 कार : ₹५ लाख 📦 एकूण मुद्देमाल : ₹६,०१,७९० या कारवाईबद्दल तुमचं मत काय? कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NandedCrime #Naigaon #NandedPolice #PoliceAction #MaharashtraNews #NandedUpdates #NandigramTimes #nandedfirstnews #shaikhjahurdudhadkar #NandedUpdates #nanded1
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.1
- शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड1
- कुरूममध्ये १५०१ वा जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीचा नुरानी जल्लोष! हजारो भाविकांची भव्य मिरवणूक मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथे १५०१ वा जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या धार्मिक उत्साहात आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला. जामा मशिदीतून सकाळी साडेआठ वाजता भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. नात-ए-पाकच्या स्वरांनी आणि ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. कुरूमसह बाहेरगावाहून आलेल्या नातख्वानांनी नात-ए-पाक सादर केली. विविध परिसरांमध्ये आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई आणि सुंदर सजावट करण्यात आली होती. यावेळी मौलाना अन्सारुल हक साहेब यांनी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनातील समानता, न्याय, शांतता, बंधुता आणि उत्तम आचरणाचा संदेश दिला. देशात शांतता, सलोखा आणि बंधुभाव कायम राहावा, शेतकरी सुखी व्हावा आणि सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी विशेष दुआ करण्यात आली. मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी माना पोलीस स्टेशन आणि कुरूम पोलीस चौकीच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांनीही कार्यक्रमाला भेट दिली. 📍 ठिकाण: कुरूम, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला 🎥 बातमी: सफदर शहा, कुरूम 📺 India News R7 Marathi अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी India News R7 Marathi ला Subscribe करा.1
- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1
- Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...4
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1