उदगीर शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उप महानिरीक्षकाकडून मटक्यावर धाडी उदगीर शहर व ग्रामीण भागात मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; 73 हजारांहून अधिक रोकडसह मुद्देमाल जप्त उदगीर (प्रतिनिधी) नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने उदगीर शहर व ग्रामीण भागात मटका अड्ड्यांवर धाडी टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत रोकडसह मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण 1 लाख 28 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उदगीर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हवागीस्वामी मठाजवळील एका अर्धवट बांधकाम असलेल्या घरात सुरू असलेल्या मटका बुकिंगवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत 51 हजार 790 रुपयांची रोकड व 20 हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तसेच या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून उदगीर शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एस.टी. कॉलनी परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावरही छापा टाकण्यात आला. या कारवाईत 21 हजार 330 रुपयांची रोकड, 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन आणि 15 हजार रुपयांचे ‘जी-विन’ लॉटरीचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 73 हजार 120 रुपयांची रोकड, पाच मोबाईल फोन व जुगार साहित्य असा एकूण 1 लाख 28 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलिस कर्मचारी प्रदीप खानसाळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कमाजी गवळी यांनी सहभाग घेतला. दरम्यान, आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा नांदेड परिक्षेत्राच्या अधिकृत संकेतस्थळावर कळवावी, असे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी केले आहे.

- HpvboUdgir, Latur👏13 hrs ago
- प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात. प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.2
- भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.2
- *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 95610623693
- *महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर.. कोणीच सुरक्षित नाही -आमदार अमित देशमुख by photocrimenews* https://youtube.com/live/kF4kuxSpXI4?feature=share1
- Post by अखंड भारत1
- भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तात्काळ भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी, पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. #CMOMaharashtra #abhimanyupawar #sambhajinagarkar #bavnkule #pankajmunde1
- जेरबंद नांदेड: गंगाबेट (ता. जि. नांदेड) येथील शेतातील आखाड्यावर वृद्ध दाम्पत्याला रॉडने मारहाण करून १.१० लाखांचे चांदीचे दागिने पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई रवी भास्कर शिंदे (२०) आणि भास्कर सायबा शिंदे (५५), दोघे रा. विरेगाव, जि. जालना. १ लाख १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत. सायबर सेलच्या मदतीने आरोपींना जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. स.पो.नि. विजयकुमार कांबळे अधिक तपास करत आहेत.2
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4