डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणाऱ्या कोपर रेल्वे पुलावरील रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. या खड्ड्यांच्या समस्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही दिवसेंदिवस तीव्र होत चालला होता. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी लोकहिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्गचे डोंबिवली प्रतिनिधी वैभव पाटणकर यांनी सातत्याने पाठपुरावा आणि वृत्तांकन केले. या प्रयत्नांनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहनचालक आणि नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत, तसेच लोकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविल्याबद्दल लोकहिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्गच्या भूमिकेचेही नागरिकांनी कौतुक केले आहे.
डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणाऱ्या कोपर रेल्वे पुलावरील रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. या खड्ड्यांच्या समस्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही दिवसेंदिवस तीव्र होत चालला होता. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी लोकहिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्गचे डोंबिवली प्रतिनिधी वैभव पाटणकर यांनी सातत्याने पाठपुरावा आणि वृत्तांकन केले. या प्रयत्नांनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहनचालक आणि नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत, तसेच लोकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविल्याबद्दल लोकहिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्गच्या भूमिकेचेही नागरिकांनी कौतुक केले आहे.
- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. भिवंडी-वाडा महामार्गालगत मेट ग्रामपंचायत हद्दीतील 'रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या अडथळ्यामुळे अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतांमध्ये शिरल्याने परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी बालकृष्ण धोंडू घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही नैसर्गिक नाला अडविल्याबाबत वाडा तहसील कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता घोडविंदेपाडा येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बालकृष्ण घोडविंदे यांनी शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक जलवाहिन्या मोकळ्या कराव्यात, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.4
- वापीमध्ये एक १ BHK रूम विक्रीसाठी उपलब्ध आहे. या रूमचे ठिकाण वापी रेल्वे स्टेशन आणि बुलेट ट्रेन स्टेशनपासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर आहे. उत्तम हवा-उजेड असणाऱ्या या रूममध्ये बाल्कनीची सुविधा देखील उपलब्ध आहे.1
- ठाण्यातील हाय स्ट्रीट मॉलमध्ये नदीम मेमन यांच्या वतीने 'हाय स्ट्रीट क्रिएटर स्टुडिओ' या नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही नदीम मेमन यांची एक नवी पेशकश आहे.1
- मुंब्रा फायर ब्रिगेडमध्ये कर्मचारी जुगार खेळताना पकडले गेले आहेत.1
- भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी वीटभट्टी मजूर सविता रावते यांना आरोग्य यंत्रणेच्या कथित निष्काळजीपणामुळे आपले बाळ गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्र विधान परिषदेत गाजली. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी हा गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारला जाब विचारला. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आमदार चित्रा किशोर वाघ यांनी आरोप केला की, २२ एप्रिल रोजी ही घटना घडल्यानंतर आरोग्य विभागाने पूर्णपणे संवेदनाहीन भूमिका घेतली होती. केवळ लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर प्रशासन जागे झाले. तसेच, गर्भधारणेदरम्यान आवश्यक सोनोग्राफी न करणे, आधार कार्डाचे कारण देऊन संदर्भ चिठ्ठी नाकारणे, माता-बालक सुरक्षा कार्डावरील नोंदींबाबत त्रुटी आणि फेटल डॉप्लर उपलब्ध असूनही त्याचा वापर न करणे, अशा गंभीर बाबींवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मृत बालकाच्या कुटुंबीयांवर विविध मार्गांनी दबाव आणून त्यांच्याकडून सकारात्मक जबाब घेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित आशा सेविकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. या संपूर्ण प्रकरणात पीडित कुटुंबाला भेट देऊन पाठपुरावा करणाऱ्या 'भूमिपुत्र एल्गार संघटने'चे अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेखही चित्रा किशोर वाघ यांनी केला. प्रमोद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना केवळ कारवाई हाच उद्देश नसून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. या प्रकरणामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील माता-बाल आरोग्य सेवांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता चौकशीनंतर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- कल्याण तालुक्यातील खडवली येथून शनिवार संध्याकाळी पडघाकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. बस खडवली बसस्थानकापासून अवघ्या एक-दोन मिनिटांच्या अंतरावर पोहोचली असताना, बसमधून धूर आणि आग निघत असल्याचे बाहेरील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याबाबात बस चालक आणि प्रवाशांना सावध केले. माहिती मिळताच चालकाने प्रसंगावधान राखत बस लगेच थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांना त्वरित सुरक्षितपणे बाहेर काढले. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते, मात्र सर्वांना वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.1