logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बाळदी येथील तलाठी कार्यालय बनले शोभेची वास्तू गावकऱ्यांचा संताप बाळदी येथील तलाठी कार्यालय बनले शोभेची वास्तु विश्वास काळे उमरखेड तालुका प्रतिनिधी – उमरखेड : बाळदी येथील तलाठी कार्यालयाचा प्रश्न आता केवळ दुर्लक्षाचा राहिलेला नाही; तो थेट जनतेच्या हक्कांवर लादलेला कुलूपबंद अन्याय ठरत आहे. ५ एप्रिल २०२३ रोजी प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने तत्परतेचा आव आणत कार्यालय परिसराची साफसफाई केली, वीज व्यवस्था सुरू केली—पण हे सर्व आज उघडपणे दिखावा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.दोन वर्षांचा कालावधी उलटूनही तलाठी कार्यालय नियमित सुरू झालेले नाही. संबंधित अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने ग्रामस्थांना शासकीय कामांसाठी अक्षरशः दरदर भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे.निवेदनं झाली, आंदोलनं झाली, बातम्या झळकल्या—तरीही प्रशासन झोपेतच का? जनतेच्या आवाजाला किंमत नाही का? निवेदनं म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आणि बातम्या म्हणजे केवळ शाई? असा जळजळीत सवाल आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पेट घेत आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी नाव घेऊ नका, मी काही बोलणार नाही,अशी भूमिका घेतली. एक जबाबदार शासकीय अधिकारी म्हणून ही टाळाटाळ योग्य ठरते का? उत्तरदायित्व टाळणे म्हणजे कर्तव्यच्युती नाही का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.ग्रामस्थ स्पष्ट शब्दांत म्हणतात महिला अधिकारी म्हणून आम्हाला आदर आहे; पण अधिकारासोबत जबाबदारीही येते. निष्क्रियता आणि उद्धटपणा यांना आता थारा दिला जाणार नाही. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ठाम इशारा दिला आहे की, तलाठी कार्यालय तात्काळ नियमित सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात उच्चस्तरीय तक्रारी दाखल करून कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला जाईल.प्रहारचे सर्कल प्रमुख प्रवीण बाबूराव इंगळे यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे.प्रशासन जर जनतेसाठी मदत करणारे नसेल, तर मग ते कोणासाठी आहे? जनतेच्या पैशावरच अधिकाऱ्यांचे पगार होतात. आमच्या निवेदनाला न्याय मिळायला हवा होता; परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आता तरी येथील तहसीलदार व बीडीओ या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देतील का?असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. साफसफाई आणि वीजपुरवठ्याची फोडणी देऊन प्रशासनाने कर्तव्यपूर्तीचा आव आणला; मात्र प्रत्यक्षात कारभार शून्यच आहे. हा दिखावा किती दिवस चालणार? आता प्रशासन जागे होणार की जनतेचा संताप रस्त्यावर उसळणार?

11 hrs ago
user_Vishwas Kale
Vishwas Kale
Umarkhed, Yavatmal•
11 hrs ago
f87303ad-7158-4ca3-a955-182a8c8ca4db

बाळदी येथील तलाठी कार्यालय बनले शोभेची वास्तू गावकऱ्यांचा संताप बाळदी येथील तलाठी कार्यालय बनले शोभेची वास्तु विश्वास काळे उमरखेड तालुका प्रतिनिधी – उमरखेड : बाळदी येथील तलाठी कार्यालयाचा प्रश्न आता केवळ दुर्लक्षाचा राहिलेला नाही; तो थेट जनतेच्या हक्कांवर लादलेला कुलूपबंद अन्याय ठरत आहे. ५ एप्रिल २०२३ रोजी प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने तत्परतेचा आव आणत कार्यालय परिसराची साफसफाई केली, वीज व्यवस्था सुरू केली—पण हे सर्व आज उघडपणे दिखावा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.दोन वर्षांचा कालावधी उलटूनही तलाठी कार्यालय नियमित सुरू झालेले नाही. संबंधित अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने ग्रामस्थांना शासकीय कामांसाठी अक्षरशः दरदर भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे.निवेदनं झाली, आंदोलनं झाली, बातम्या झळकल्या—तरीही प्रशासन झोपेतच का? जनतेच्या आवाजाला किंमत नाही का? निवेदनं म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आणि बातम्या म्हणजे केवळ शाई? असा जळजळीत सवाल आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पेट घेत आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी नाव घेऊ नका, मी काही बोलणार नाही,अशी भूमिका घेतली. एक जबाबदार शासकीय अधिकारी म्हणून ही टाळाटाळ योग्य ठरते का? उत्तरदायित्व टाळणे म्हणजे कर्तव्यच्युती नाही का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.ग्रामस्थ स्पष्ट शब्दांत म्हणतात महिला अधिकारी म्हणून आम्हाला आदर आहे; पण अधिकारासोबत जबाबदारीही येते. निष्क्रियता आणि उद्धटपणा यांना आता थारा दिला जाणार नाही. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ठाम इशारा दिला आहे की, तलाठी कार्यालय तात्काळ नियमित सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात उच्चस्तरीय तक्रारी दाखल करून कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला जाईल.प्रहारचे सर्कल प्रमुख प्रवीण बाबूराव इंगळे यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे.प्रशासन जर जनतेसाठी मदत करणारे नसेल, तर मग ते कोणासाठी आहे? जनतेच्या पैशावरच अधिकाऱ्यांचे पगार होतात. आमच्या निवेदनाला न्याय मिळायला हवा होता; परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आता तरी येथील तहसीलदार व बीडीओ या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देतील का?असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. साफसफाई आणि वीजपुरवठ्याची फोडणी देऊन प्रशासनाने कर्तव्यपूर्तीचा आव आणला; मात्र प्रत्यक्षात कारभार शून्यच आहे. हा दिखावा किती दिवस चालणार? आता प्रशासन जागे होणार की जनतेचा संताप रस्त्यावर उसळणार?

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. यावर प्रशासन लक्ष देईल का. सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे
    4
    नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? 
स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. 
यावर प्रशासन लक्ष देईल का. 
सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. 
अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • कछरा का दिकत
    1
    कछरा का दिकत
    user_Ajay Pawar
    Ajay Pawar
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मंगरूळपीर पंचायत समिती मध्ये आरो बंद पिण्याच्या पाण्याची कोमट सोय मंगरूळपीर प्रतिनिधी अनंता घुगे दिनांक 29 एप्रिल 2026 सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून मंगरूळपीर येथील शासकीय कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याची कोमट सोय असल्यामुळे शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात तर वॉटर फिल्टर उपलब्ध आहे, मात्र आरो बंद असल्याने तसेच पडून आहे. यावर्षी उन्हाचा तडाख्यात झपाट्याने वाढ झालेली असून आताच तापमान ४० अंशापुढे गेले आहे. सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा वाढून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठे उन दिसून येते. मंगरूळपीर येथे विविध कार्यालये असून तालुक्याचे मुख्यालय असलेले प्रशासकीय इमारतीत पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, सामाजिक असे तालुक्यातील कामकाज प्रामुख्याने पाहणारी कार्यालये आहेत. त्यामुळे तालुकाभरातून ग्रामस्थ या ठिकाणी विविध कामाकाजासाठी येतात. तसेच अभ्यागतांसाठी स्वच्छतागृह सुध्दा घाणच असते आता तर चक्क पिण्याच्या पाण्याची सोयही येथे दिसून येत नाही. पूर्वीच्या काळी काही सामाजिक संस्था, दानशूर लोक पाणपोई लावत होते. मात्र, हळूहळू ही प्रथा बंद पडून आता पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्याउपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागतो किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते. प्रशासकीय इमारतीबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध योजनांचे स्त्रोत्र असलेल्या पंचायत समिती कार्यालयातही पिण्याच्या पाण्याची सोय दिसून येत नाही. विशेष म्हणजे येथे कुलर, त्याला लावलेला पाईप, नळ उपलब्ध आहेत त्यांची फिटिंग पण केलेली दिसते मात्र ते कुलर धूळ खात पडून आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासकीय इमारतीत तर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांनी पिण्याच्या पाण्याचा सोय करावी, अशी मागणी होत आहे.
    2
    मंगरूळपीर पंचायत समिती मध्ये आरो बंद पिण्याच्या पाण्याची कोमट सोय  
मंगरूळपीर प्रतिनिधी अनंता घुगे दिनांक 29 एप्रिल 2026
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून मंगरूळपीर येथील शासकीय कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याची कोमट सोय असल्यामुळे शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात तर वॉटर फिल्टर उपलब्ध आहे, मात्र आरो बंद असल्याने तसेच  पडून आहे.
यावर्षी उन्हाचा तडाख्यात झपाट्याने वाढ झालेली असून आताच तापमान ४० अंशापुढे गेले आहे. सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा वाढून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठे उन दिसून येते. मंगरूळपीर येथे विविध कार्यालये असून तालुक्याचे मुख्यालय असलेले प्रशासकीय इमारतीत पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, सामाजिक असे तालुक्यातील कामकाज प्रामुख्याने पाहणारी कार्यालये आहेत. त्यामुळे तालुकाभरातून ग्रामस्थ या ठिकाणी विविध कामाकाजासाठी येतात. तसेच अभ्यागतांसाठी स्वच्छतागृह सुध्दा घाणच असते आता तर चक्क पिण्याच्या पाण्याची सोयही येथे दिसून येत नाही. पूर्वीच्या काळी काही सामाजिक संस्था, दानशूर लोक पाणपोई लावत होते.
मात्र, हळूहळू ही प्रथा बंद पडून आता पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्याउपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागतो किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते. प्रशासकीय इमारतीबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध योजनांचे स्त्रोत्र असलेल्या पंचायत समिती कार्यालयातही पिण्याच्या पाण्याची सोय दिसून येत नाही.
विशेष म्हणजे येथे कुलर, त्याला लावलेला पाईप, नळ उपलब्ध आहेत त्यांची फिटिंग पण केलेली दिसते मात्र ते कुलर धूळ खात पडून आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासकीय इमारतीत  तर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांनी पिण्याच्या पाण्याचा सोय करावी, अशी मागणी होत आहे.
    user_अनंता  लक्ष्मण घुगे
    अनंता लक्ष्मण घुगे
    Photographer वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीसिंह गावात एका २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. आशिष कांबळे असं मृतकांच नाव आहे.घटनेतील आरोपी पांडुरंग कांबळे याला वडगांव जंगल पोलीसांनी अटक केली आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीसिंह गावात एका २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. आशिष कांबळे असं मृतकांच नाव आहे.घटनेतील आरोपी पांडुरंग कांबळे याला वडगांव जंगल पोलीसांनी अटक केली आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    9 hrs ago
  • वाशिम शहर दनाणून गेले वाशिम जिल्हा द्वारा दि 28 एप्रिल रोजी वाशिम येथिल मोठा प्रेस कॉन्फरन्स हॉल सर्किट हाऊस वाशिम येथे भव्य कार्यकर्त्या मेळावा पार पडला ,यावेळी आझाद समाज पार्टीने वाशिम शहरातून भव्य मोटर सायकल रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले,यावेळी वाशिम शहरात प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे आगमन होताच पुसद नाक्यावर आझाद समाज पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिश बाजीने प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे स्वागत केले, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष मनीष साठे,प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे,विदर्भ अध्यक्ष भीम टायगर उमेश हिवराळे,प्रदेश महासचिव दत्तराव धांडे,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा, सुभाष अंभोरे, जावेद पठाण,यांना खुल्या जिप्सी वर चढवून मागे शेकडो मोटर सायकल रॅली काढून जय भीम नारे आणि निळ्या झेंड्यांनी वाशिम शहर दणाणून गेले होते,वाशिम शहरात आंबेडकरी आंदोलनातील एखाद्या राजकीय पार्टीने आपले शक्ती प्रदर्शन अशा भल्या मोठ्या रॅलिने करणे हे वाशिम शहरात पहिल्यांदाच घडले आहे,सद्ध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात केवळ आझाद समाज पार्टीचीच चर्चा असून जिल्ह्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आझाद समाज पार्टीकडे वळल्याचे दिसून आले,त्यामुळे येत्या काळात भारिप वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आझाद समाज पार्टीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे
    5
    वाशिम शहर दनाणून गेले 
वाशिम जिल्हा द्वारा दि 28  एप्रिल रोजी वाशिम येथिल  मोठा प्रेस कॉन्फरन्स हॉल सर्किट हाऊस वाशिम येथे भव्य कार्यकर्त्या मेळावा पार पडला ,यावेळी आझाद समाज पार्टीने वाशिम शहरातून भव्य मोटर सायकल रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले,यावेळी वाशिम शहरात प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे आगमन होताच पुसद नाक्यावर आझाद समाज पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिश बाजीने प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे स्वागत केले, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष मनीष साठे,प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे,विदर्भ अध्यक्ष भीम टायगर उमेश हिवराळे,प्रदेश महासचिव दत्तराव धांडे,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा, सुभाष अंभोरे, जावेद पठाण,यांना खुल्या जिप्सी वर चढवून मागे शेकडो मोटर सायकल रॅली काढून जय भीम नारे आणि निळ्या झेंड्यांनी वाशिम शहर दणाणून गेले होते,वाशिम शहरात आंबेडकरी आंदोलनातील एखाद्या राजकीय पार्टीने आपले शक्ती प्रदर्शन अशा भल्या मोठ्या रॅलिने करणे हे वाशिम शहरात पहिल्यांदाच घडले आहे,सद्ध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात केवळ आझाद समाज पार्टीचीच चर्चा असून जिल्ह्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आझाद समाज पार्टीकडे वळल्याचे दिसून आले,त्यामुळे येत्या काळात भारिप वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आझाद समाज पार्टीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    4
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल नांदेड: इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गटारगंगेच्या विळख्यात किल्ला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे. अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार? नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    3
    शिवकुमार काळे 
सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल 
नांदेड:
इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
गटारगंगेच्या विळख्यात किल्ला
पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे.
अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव
किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत.
संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार?
नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.