नांदेडच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची दुरवस्था; प्रशासकीय दुर्लक्षामुळे अस्तित्वाची लढाई! शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल नांदेड: इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गटारगंगेच्या विळख्यात किल्ला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे. अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार? नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नांदेडच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची दुरवस्था; प्रशासकीय दुर्लक्षामुळे अस्तित्वाची लढाई! शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल नांदेड: इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गटारगंगेच्या विळख्यात किल्ला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका
निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे. अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे
फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार? नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- Post by Today One Live1
- मी भाजपाचा साधा सदस्य सुद्धा नाही, संघ परीवारच कुठल दायीत्व माझ्याकडे नाही असे सांगत स्वत: किशोर शिवणीकर यांनी भाजपा संबंधाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.1
- Post by नागनाथ ससाने1
- माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.4
- • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.1
- मंगरूळपीर पंचायत समिती मध्ये आरो बंद पिण्याच्या पाण्याची कोमट सोय मंगरूळपीर प्रतिनिधी अनंता घुगे दिनांक 29 एप्रिल 2026 सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून मंगरूळपीर येथील शासकीय कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याची कोमट सोय असल्यामुळे शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात तर वॉटर फिल्टर उपलब्ध आहे, मात्र आरो बंद असल्याने तसेच पडून आहे. यावर्षी उन्हाचा तडाख्यात झपाट्याने वाढ झालेली असून आताच तापमान ४० अंशापुढे गेले आहे. सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा वाढून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठे उन दिसून येते. मंगरूळपीर येथे विविध कार्यालये असून तालुक्याचे मुख्यालय असलेले प्रशासकीय इमारतीत पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, सामाजिक असे तालुक्यातील कामकाज प्रामुख्याने पाहणारी कार्यालये आहेत. त्यामुळे तालुकाभरातून ग्रामस्थ या ठिकाणी विविध कामाकाजासाठी येतात. तसेच अभ्यागतांसाठी स्वच्छतागृह सुध्दा घाणच असते आता तर चक्क पिण्याच्या पाण्याची सोयही येथे दिसून येत नाही. पूर्वीच्या काळी काही सामाजिक संस्था, दानशूर लोक पाणपोई लावत होते. मात्र, हळूहळू ही प्रथा बंद पडून आता पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्याउपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागतो किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते. प्रशासकीय इमारतीबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध योजनांचे स्त्रोत्र असलेल्या पंचायत समिती कार्यालयातही पिण्याच्या पाण्याची सोय दिसून येत नाही. विशेष म्हणजे येथे कुलर, त्याला लावलेला पाईप, नळ उपलब्ध आहेत त्यांची फिटिंग पण केलेली दिसते मात्र ते कुलर धूळ खात पडून आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासकीय इमारतीत तर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांनी पिण्याच्या पाण्याचा सोय करावी, अशी मागणी होत आहे.2
- जाहीर अवाहन... जाहीर अवाहन... उदगीर शहरातील सर्व नागरिकांना, आपल्या शहराच्या आणि देशाच्या नियोजित विकासासाठी 'जनगणना २०२७' हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या जनगणनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 'स्व-गणना' (Self-Enumeration) दिनांक १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविला जात आहे. माझे आपणास नम्र आवाहन आहे की, आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टल/ॲपद्वारे स्वतःहून नोंदवावी. या राष्ट्रीय कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे. अचूक माहिती देऊन शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान द्यावे. चला, डिजिटल जनगणनेचा भाग बनूया आणि उदगीरच्या विकासाला गती देऊया! आपले नम्र सौ. स्वातीताई सचिन हुडे नगराध्यक्षा, उदगीर नगरपरिषद हेडलाइन1
- लातूर शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई करताना गंभीर अनियमितता समोर आली आहे. वाहनांना लॉक करणाऱ्या काही व्यक्तींकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र (ID कार्ड) नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही कारवाई अधिकृत आहे का, आणि महापालिकेने दिलेले टेंडर नेमके कोणाकडे आहे, यावर नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. नियमबाह्य पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकृत कंत्राटदार कोण, त्यांची ओळख काय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, याबाबत पारदर्शकता नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेने या प्रक्तात्ती तत्काल चौकशी करून1
- आरटीओ आणि वाहनचालकात शाब्दिक चकमक. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी बाबळगाव चे वाहन चालक यांना केली मदत. रेनापुर पोलीस ठाण्यात आरटीओ ने दिलेली तक्रार मध्यस्थीने माघार. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026. लातूर तालुक्यातील बाबळगाव चे रहिवासी असलेले निळकंठ शिंदे यांची बोलेरो पिकप वाहन ही कोथिंबीर भरण्यासाठी लातूर तालुक्यातील बामणी शिवारात लावली असता या ठिकाणी आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी गाडीचे कागदपत्रे विचारात दोघांमध्ये तक्रार होऊन निळकंठ शिंदे विरोधात रेनापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. लातुर जिल्ह्याच्या आरटीओ. कार्यालयातील आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी कारण नसतांना बाभळगाव येथील बुलेरो पीकअपचे मालक निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे बेलोरो पिकप वाहन मालक निळकंठ शिंदे यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांना माहिती कळवताच तात्काळ प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी रेणापूर पोलीसांना संपर्क साधुन निळकंठ शिंदे यांना मदत करीत प्रकरणाविषयी चौकशी कामे निळकंठ शिंदे हे बाभळगाव येथील रहीवाशी आहेत, त्यांनी कर्ज काढून एक बुलेरो पिक अप मालवाहतूक गाडी खरेदी केली आहे,ते दररोज शेतकऱ्यांची कोथिंबीर घेऊन नागपूर ला जातात, रोजच्या प्रमाणे ते लातुर तालुक्यातील बामणी शिवारात रसत्याच्या कडेला (रस्ता सोडून) आपली बुलेरो पिक अप व्हॅन लावली होती आणी ते कोथिंबीर घेण्यासाठी शेतकर्यांच्या फडात गेले होते, तेंव्हा अचानक अष्टा मोड हुन एक RTO ची गाडी आली आणी निळकंठ यास बुलेरो पिक अप व्हॅन चे कागदपत्र मागितले, निळकंठ यांनी सर्व कागदपत्र दाखविले, लायसन्स दाखविले यात गाडी मालकाची कोणतीही चूक नसताना संबंधित इन्स्पेक्टर नी पैसे मागीतले ते पैसेही गाडी मालक निळकंठ यांनी दिले, तरीही 1500 रुपयाचा खोटा फाईन गाडी वर लावला आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ यांना शिवीगाळ केली, नंतर इन्स्पेक्टर आणी निळकंठ मध्ये शाब्दिक चकमक झाली, आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, ही बातमी समजताच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी रेणापूर पोलीस निरीक्षक आणी संबंधित बीट आमलदार यांना संपर्क साधुन, निळकंठ यांना समज देत हे प्रकरण या ठिकाणीच मिटवण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे खंडापूरकर बाबा यांनी बोलताना आजही RTO लातुर मधील इन्स्पेक्टर यांची मुजोरी समाप्त झाली नाही, यापुढे जो कोणी भ्रष्टाचार इन्स्पेक्टर करत आसेल तर त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावर बसवुन धिंड काढण्यात यावे. आरटीओ कार्यालयातून कोणी त्रास देत असेल तर स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, फोन नंबर - 8888184444, 8055088888 वर संपर्क साधावा. वाहान चालकास मी विनंती करणार आहे, RTO ऑफिस मधील कोणाही इन्स्पेक्टर अन्य कर्मचाऱ्यांना एकरी भाषेचा वापर करु नका, त्यांना व्यक्तिगत भांडण करु नका आपण कायदेशीर तक्रार देवू असे सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले.1