भुमिगत गटाराच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर खड्डे वडवणी प्रतिनिधी- वडवणी शहरातील वार्ड क्रं 14 मधील नहार यांच्या गल्लीत तील राजकमल कन्स्ट्रक्शन बीड यांनी भूमिगत गटारींच्या केलेल्या अर्धवट कामांमुळे शहरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. भूमिगत गटारींच्या कामांमुळे रस्त्यांवर झालेले खड्डे, चिखल याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरुन मार्गक्रमण करतांना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, गेल्या एक महिन्यापासून भुमिगत गटाराचे काम अर्धवट सोडून दिले आहे.हे काम करताना कोणत्याही गटारीचे नेवळीग केली नाही. .तसेच सिमेंटचे पाईप नाल्यांमध्ये खाली अंथरूण बुजवण्यात आल्या आहेत...पाईप टाकताना त्याखाली सिमेंट काॉक्रिट करणे आवश्यक आहे.पण ते केले नाही.त्यांचा उतार योग्य आहे का नाही हे तपासले जात नाही.या भुमिगत गटाराचे काम चांगल्या दर्जाचे करुन लवकर पुर्ण करावे अशी मागणी वार्डातील नागरिक करीत आहेत.

- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.1
- पाथरी येथील शाहुनगर आणि शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. #maxparbhani #पाथरी #परभणी #म्हाराष्ट्रा #facebook1
- नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..1
- देविदास गुरधाळे मामांच्या समरणार्थ 92 फुटी अस्थी विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे रस्ते विकास महामंडळाचे MD डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देविदास गुरधाळे मामा यांच्या समरणार्थ डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थी विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधिसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थी विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही. यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर नाशिक येथे जावे लागते. धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या. गावाकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवाकुंड ट्रस्टकडे ही मागणी केली. सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली. या मध्ये अस्थी विसर्जन घाट, गार्डन, शिव मंदिर, सांभामंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला. सेवाकुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.1
- जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर1
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.1
- घनसावंगी - हनुमान जयंतीनिमित्त भव्य कुस्ती दंगल ! हनुमान जयंतीनिमित्त घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती आखाड्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.1