logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

72 रक्तदात्यांनी रक्तदान करुन ‘कास्ट्राईब’ ने केले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. रक्तदान करुन ‘कास्ट्राईब’ ने केले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026. सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना लातूर जिल्हा शाखेच्या वतीने येथील डॉ.आंबेडकर पार्क येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा लातूरच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. याचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याची जाणीव ठेवून लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सहाय्यक शिक्षण संचालक संजयजी पंचगले व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सहदेव मस्के, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुभाष मस्के यांच्यासह एकूण 72 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या शिबिरास रक्तदात्यांनी व भीम सैनिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी लातूर महानगरपालिकेचे उपमहापौर स्नेहल उटगे साहेब, गटनेते विजयकुमार साबदे, नगरसेवक सचिन गायकवाड, सुनील बसपुरे, निखिल गायकवाड तसेच भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजितभैय्या पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सहदेव मस्के यांनी भेट देऊन कास्ट्राईबच्या या सामाजिक स्तुत्य कार्याबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राहुल गायकवाड, अतिरिक्त सरचिटणीस महेश कांबळे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुभाष मस्के, लातूर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बनसोडे, जिल्हा सरचिटणीस अशोक माळगे, नागरत्न कांबळे, निलराज बनसोडे, जिल्हा परिषद विंगचे अध्यक्ष ओंकार वंजारे यांच्यासह G-24 या सामाजिक संघटनेचे नरसिंग घोडके, बसवंतप्पा उबाळे, यु.डी.गायकवाड, शिक्षक संघाचे अप्पाराव शिंदे, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे किशोर गायकवाड, कास्ट्राईब दिव्यांग विभागाचे गिरीश तुबाजी, राष्ट्रीय मुलनिवासी संघटनेचे जे.जे.गायकवाड, शिक्षण परिषदेचे शिरुरे, राष्ट्रीय ओ.बी.सी. संघटनेचे विजयकुमार पिनाटे, शिक्षक बहुजन महासंघाचे दिनेश कांबळे, तर जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना चव्हाण, रंजना हुसुरे, योगीता ठाकूर, अनिता मुदगले यांच्या सह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले आहे. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी कास्ट्राईबचे सुभाष मस्के, राहुल गायकवाड, महेश कांबळे, छगन घोडके, सतिश मानकुसकर, दिलीप गायकवाड, बाबासाहेब इंगळे, तुळशीराम घोडके, राजकुमार गुंजरगे, तुकाराम बलांडे, बळीराम भोगे, राजेंद्र बेले, संजयकुमार सुर्यवंशी, विद्यासागर काळे ,संग्राम गवाले तर महिला आघाडीच्या शिला उघाडे, वनमाला उघाडे, सुरेखा गायकवाड, सुनिता कांबळे, रंजिता शिंदे, वैशाली कांबळे, पंचशिला मस्के, जयश्री बनसोडे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

3 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
20e5efee-7228-4e1b-a72f-402482b333fd

72 रक्तदात्यांनी रक्तदान करुन ‘कास्ट्राईब’ ने केले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. रक्तदान करुन ‘कास्ट्राईब’ ने केले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026. सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना लातूर जिल्हा शाखेच्या वतीने येथील डॉ.आंबेडकर पार्क येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा लातूरच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. याचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम

924b3e34-288c-4f5c-968c-cd1ef52b5043

काळे यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याची जाणीव ठेवून लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सहाय्यक शिक्षण संचालक संजयजी पंचगले व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सहदेव मस्के, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुभाष मस्के यांच्यासह एकूण 72 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या शिबिरास रक्तदात्यांनी व भीम सैनिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी लातूर महानगरपालिकेचे उपमहापौर स्नेहल उटगे साहेब, गटनेते विजयकुमार साबदे, नगरसेवक सचिन गायकवाड, सुनील बसपुरे, निखिल गायकवाड तसेच भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजितभैय्या पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सहदेव मस्के यांनी

074a7d73-f8ab-4bb2-8c43-7cfd6f0bb178

भेट देऊन कास्ट्राईबच्या या सामाजिक स्तुत्य कार्याबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राहुल गायकवाड, अतिरिक्त सरचिटणीस महेश कांबळे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुभाष मस्के, लातूर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बनसोडे, जिल्हा सरचिटणीस अशोक माळगे, नागरत्न कांबळे, निलराज बनसोडे, जिल्हा परिषद विंगचे अध्यक्ष ओंकार वंजारे यांच्यासह G-24 या सामाजिक संघटनेचे नरसिंग घोडके, बसवंतप्पा उबाळे, यु.डी.गायकवाड, शिक्षक संघाचे अप्पाराव शिंदे, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे किशोर गायकवाड, कास्ट्राईब दिव्यांग विभागाचे गिरीश तुबाजी, राष्ट्रीय मुलनिवासी संघटनेचे जे.जे.गायकवाड, शिक्षण परिषदेचे शिरुरे, राष्ट्रीय ओ.बी.सी. संघटनेचे विजयकुमार पिनाटे,

5bc0810a-3461-444f-a4b7-f379d1949f2e

शिक्षक बहुजन महासंघाचे दिनेश कांबळे, तर जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना चव्हाण, रंजना हुसुरे, योगीता ठाकूर, अनिता मुदगले यांच्या सह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले आहे. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी कास्ट्राईबचे सुभाष मस्के, राहुल गायकवाड, महेश कांबळे, छगन घोडके, सतिश मानकुसकर, दिलीप गायकवाड, बाबासाहेब इंगळे, तुळशीराम घोडके, राजकुमार गुंजरगे, तुकाराम बलांडे, बळीराम भोगे, राजेंद्र बेले, संजयकुमार सुर्यवंशी, विद्यासागर काळे ,संग्राम गवाले तर महिला आघाडीच्या शिला उघाडे, वनमाला उघाडे, सुरेखा गायकवाड, सुनिता कांबळे, रंजिता शिंदे, वैशाली कांबळे, पंचशिला मस्के, जयश्री बनसोडे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

More news from Maharashtra and nearby areas
  • 📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम! #नारीशक्तीवंदनअधिनियम #महिलासशक्तीकरण #सशक्तमहिलासशक्तराष्ट्र #NariShaktiVandan #ModiForWomenEmpowerment
    1
    📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम!
#नारीशक्तीवंदनअधिनियम
#महिलासशक्तीकरण
#सशक्तमहिलासशक्तराष्ट्र
#NariShaktiVandan
#ModiForWomenEmpowerment
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by अशोक दगडू वाघमारे
    1
    Post by अशोक दगडू वाघमारे
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद
    1
    महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था। इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।
    1
    मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया
छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था।
इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।
    user_Bimlesh thakur
    Bimlesh thakur
    Majalgaon, Beed•
    8 hrs ago
  • परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    1
    परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...
    1
    Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, 
पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, 
तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर
    1
    विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती 
वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    20 hrs ago
  • ------- पाटोदा(प्रतिनिधी):- मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या दि.१७ एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या “एल्गार मोर्चा”ला लिंबागणेशकरांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले की, हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून तो संपूर्ण मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. समाजातील शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण, नोकरी तसेच विविध शासकीय योजनांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, ही दीर्घकाळापासूनची व न्याय्य मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा लढा आवश्यक असून, या ऐतिहासिक आंदोलनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी डॉ.गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, रविंद्र निर्मळ, विक्रांत वाणी, औदुंबर नाईकवाडे, अर्जुन घोलप, शेख शफी, नूर सय्यद, बाळासाहेब मुळे, समीर शेख, सय्यद अख्तर, सय्यद बशीर, रामदास मुळे, सुरेश निर्मळ, गणपत तागड, शेख शफीक, सय्यद सलीम, शेख वसीम, शेख उस्मान, सय्यद फिरोज, सय्यद रियाज, सय्यद ताहेर, सय्यद रऊफ, सय्यद सालम, उमर शेख, सय्यद नाझीम, शेख बबलू, सय्यद आरेफ, शेख नाझीम, शेख शौकत, सय्यद आयुब, भास्कर आबदार, बबन गोंडे सह आदी इतर नागरिक उपस्थित होते.
    1
    -------
पाटोदा(प्रतिनिधी):- मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या दि.१७ एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या “एल्गार मोर्चा”ला लिंबागणेशकरांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले की, हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून तो संपूर्ण मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. समाजातील शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण, नोकरी तसेच विविध शासकीय योजनांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, ही दीर्घकाळापासूनची व न्याय्य मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा लढा आवश्यक असून, या ऐतिहासिक आंदोलनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी डॉ.गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, रविंद्र निर्मळ, विक्रांत वाणी, औदुंबर नाईकवाडे, अर्जुन घोलप, शेख शफी, नूर सय्यद, बाळासाहेब मुळे, समीर शेख, सय्यद अख्तर, सय्यद बशीर, रामदास मुळे, सुरेश निर्मळ, गणपत तागड, शेख शफीक, सय्यद सलीम, शेख वसीम, शेख उस्मान, सय्यद फिरोज, सय्यद रियाज, सय्यद ताहेर, सय्यद रऊफ, सय्यद सालम, उमर शेख, सय्यद नाझीम, शेख बबलू, सय्यद आरेफ, शेख नाझीम, शेख शौकत, सय्यद आयुब, भास्कर आबदार, बबन गोंडे सह आदी इतर नागरिक उपस्थित होते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.