मुखेड येथे उद्या १७ सप्टेंबर रोजी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम होणार. भारतीय बौद्ध महासभा तालुका मुखेड शाखेच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांच्या ४९ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वांनी मुखेड (जि.नांदेड) शहरातील सम्राट अशोका बद्ध विहार, समतानगर, येथे उद्या गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक २ वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून जास्तित जास्त संख्येने उपस्थित रहावे असे नम्र आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुखेडचे तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे, तालुका सरचिटणीस कुलदीप बनसोडे, तालुका कोषाध्यक्ष ॲड. मिलिंद कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा मुखेड तालुका शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुखेड येथे उद्या १७ सप्टेंबर रोजी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम होणार. भारतीय बौद्ध महासभा तालुका मुखेड शाखेच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांच्या ४९ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वांनी मुखेड (जि.नांदेड) शहरातील सम्राट अशोका बद्ध विहार, समतानगर, येथे उद्या गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक २ वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून जास्तित जास्त संख्येने उपस्थित रहावे असे नम्र आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुखेडचे तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे, तालुका सरचिटणीस कुलदीप बनसोडे, तालुका कोषाध्यक्ष ॲड. मिलिंद कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा मुखेड तालुका शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी. सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी. सोनपेठ (दर्शन) :- प्रति, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई -32. विषय :- सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी. महोदय उपरोक्त विषयी मी संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले, सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी.सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पंचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण ७ वाजून ४० मिनिटांनी होता परंतु सभापती ७ वाजून ४५ मिनिटांनी उपस्थित झाल्या, त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले, सभापती निकिता विकास मुजमुले यांच्यावर योग्य ती सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन करत आहे. सोबत त्यांचा कारचा व्हिडिओ त्या ७:४५ ला आल्या स्विफ्ट डिझायर एम.एच. ४५ ए डी ३०७९ या क्रमाकांच्या स्विफ्ट डिझायर कार मध्ये सभापती शाळेमध्ये आल्या व निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे. धन्यवाद आपला विश्वासू संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन मो.९८२३५४७७५५२3
- बोथी येथे चोरट्यांनी चार शेळ्या केल्या लंपास,पोलिसात अज्ञात चोरावर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील बोथी येथून शेतकऱ्यांच्या चार शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी दि.15सप्टेंबर रोजी मंगळवारी दुपारी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात शेळ्या चोरी बरोबर पशुधन चोरी घटना वरचेवर घडत आहेत. बोथी येथील शेतकरी केशव कृष्णा काळे यांनी आपल्या घरा शेजारी नेहमी प्रमाणे बांधलेल्या चार लहान मोठ्या शेळ्या किंमत २२ हजार रुपये, दि . ११ सप्टेबर रोजी सायंकाळी ते १२ सप्टेंबर पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास रामेश्वर तांडा पोलीस चौकी प्रमुख सिताराम मस्के करत आहेत.1
- इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.1
- पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.1
- रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी १ लाखांची मदत द्या! रिसोड, ता. 17 : पावसाने दडी मारल्याने रिसोड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी सुकून करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातून यंदाचा हंगाम अक्षरशः निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसला. शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकू लागली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बियाणे, खत, मशागत, मजुरी आणि औषधांवर मोठा खर्च करूनही हातात काहीच उरणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर आणि आता पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे.2
- सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न, याप्रसंगी नगराध्यक्ष परमेश्वर कदम, गटनेते हाजी सद्दाम भाई हुसेन, सर्व राजकीय पक्षप्रमुख, पत्रकार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल सेवक सर्व कार्यालयीन कर्मचारी व सर्व कार्यालयीन प्रमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.2
- पावसाने फिरवली पाठ;सेनगावच्या शेतकऱ्याचे सुकळी खुर्द शिवारातील ४ एकर सोयाबीन जळून खाक,महसुल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार? सेनगाव/विश्वनाथ देशमुख निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके डोळ्यादेखत करपून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.सेनगाव येथील एका शेतकऱ्याचे उभे पीक पाऊस न पडल्याने जळून खाक झाले आहे.पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्यामुळे सेनगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांच्या सुकळी खुर्द शिवारातील तब्बल चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाळून नष्ट झाले आहे.शेती सुकळी शिवारात असली तरी देशमुख हे सेनगाव शहरात राहून तिथूनच शेतीचा संपूर्ण कारभार पाहत होते.या कोरड्या दुष्काळामुळे देशमुख यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून,त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.मात्र,या गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने 'महसूल विभाग पंचनाम्यासाठी कधी पाऊल उचलणार?'असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी लक्ष्मण देशमुख यांनी मोठ्या आशेने सुकळी खुर्द शिवारातील आपल्या गट क्रमांक १०९ मधील चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती.बियाणे,खते,कोळपणी आणि खुरपणीसाठी हजारो रुपयांचे कर्ज काढून त्यांनी पिकाला पोटच्या पोरासारखे सांभाळले.पीक जोमात असतानाच अचानक पावसाने दीर्घकाळ दडी मारली.कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे अखेर हे उभे पीक करपून गेले.या दुर्दैवी घटनेमुळे सेनगाव आणि सुकळी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.आधीच संकटात असलेल्या बळीराजाला आता शासनाच्या आधाराची अत्यंत गरज आहे.पिकाचे नुकसान होऊन दिवस उलटत चालले तरी महसूल विभाग किंवा कृषीऐ विभागाचा एकही अधिकारी सुकळी शिवाराकडे फिरकलेला नाही.त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने या गंभीर नुकसानीची दखल घेऊन तातडीने संयुक्त पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी लक्ष्मण रामराव देशमुख यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष सरकारी मदत व पीक विमा मंजूर करावा,अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. "कर्ज काढून पोटाच्या पोरासारखं सोयाबीन सांभाळलं,पण पावसाने दगा दिला अन डोळ्यादेखत सोन्यासारखं रान जळून कोळसा झालं! चार एकरात आता फक्त काळ्या काड्या उरल्यात.हे उध्वस्त रान पाहताना काळजाचा तुकडा तुटल्यागत वेदना होत आहेत.कर्ज कसं फेडू आणि लेकरांना काय खायला घालू? पीक जळून राख झाली तरी अधिकारी अजून बांधावर आले नाहीत.सरकारने तातडीने मदत दिली नाही,तर आमच्यावर फाशी घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही!" — लक्ष्मण रामराव देशमुख (पीडित शेतकरी,सेनगाव)1
- पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केली सेनगाव परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या मागण्याची अखेर शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी नेते मारोती गिते यांच्या सेनगाव परिसरात असलेल्या शेतातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली. यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना 100% पीक विमा व सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते मारोती गीते यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री नरहरी झिरवळ हे आजेगाव कडून सेनगावच्या दिशेने जात असताना मारोती गीते यांनी सेनगाव परिसरातील आपल्या शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी नेते मारोती गीते यांच्या कार्याचे कौतुक देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिके धोक्यात सापडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पावसाअभावी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारोती गीते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.1
- लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.1