लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
- सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी. सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी. सोनपेठ (दर्शन) :- प्रति, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई -32. विषय :- सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले,सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी. महोदय उपरोक्त विषयी मी संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण उशिरा झाले, सखोल चौकशी करुन कारवाईची मिगणी.सोनपेठ पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निमित्त पंचायत समिती सोनपेठ सभापती निकिता विकास मुजमुले यांच्या हस्ते ध्वजारोहण ७ वाजून ४० मिनिटांनी होता परंतु सभापती ७ वाजून ४५ मिनिटांनी उपस्थित झाल्या, त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले, सभापती निकिता विकास मुजमुले यांच्यावर योग्य ती सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन करत आहे. सोबत त्यांचा कारचा व्हिडिओ त्या ७:४५ ला आल्या स्विफ्ट डिझायर एम.एच. ४५ ए डी ३०७९ या क्रमाकांच्या स्विफ्ट डिझायर कार मध्ये सभापती शाळेमध्ये आल्या व निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे. धन्यवाद आपला विश्वासू संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन मो.९८२३५४७७५५२3
- फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे1
- तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.1
- मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.1
- “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली. जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले. पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे. “पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच.. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.3
- उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना1
- सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तहसील कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तहसीलदार सुनील कावरखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न, याप्रसंगी नगराध्यक्ष परमेश्वर कदम, गटनेते हाजी सद्दाम भाई हुसेन, सर्व राजकीय पक्षप्रमुख, पत्रकार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल सेवक सर्व कार्यालयीन कर्मचारी व सर्व कार्यालयीन प्रमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.2
- दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, बाजरी यांसह खरीप पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये अर्थात हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली. या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे पीक आणि करपलेल्या बाजरीची कणसे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हलगी वाजवत शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधण्यात आले. ‘पीकविमा तात्काळ मिळालाच पाहिजे’, ‘दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने मागील १५ ते २० दिवसांपासून बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सुशीलाताई मोराळे, बाळासाहेब मोरे, अशोकराव येडे, ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमले, कुलदीप करपे, हनुमान घोडके, राजू गायके, खाजाभाई पठाण, दीपक जाधव, प्रदीप घुमरे, बळीराम मेहेत्रे, सतीश विसाफे, मच्छिंद्र साठे, शाम पांढरे, खंडू गाडेकर, धनंजय सागर, अण्णा वाणी, रोहिदास मस्के, मुसा बेग, चांद बॅग, राजाभाऊ साळुंखे, विक्रम साळुंखे, विष्णू साळुंखे, सुलेमान पठाण, मुसा पठाण, विक्रम शिंदे, दिलीप शिंदे, मशरूम साळुंखे, सुरेश साळुंखे आदींसह बीड तालुक्यातील ३० ते ३५ गावांमधील शेतकरी उपस्थित होते. चौकट : सोयाबीन, कापूस, बाजरी घेऊन शेतकरी आंदोलनात ‘हलगी बजाव’ आंदोलनात शेतकरी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे दाणे आणि दाणे न भरलेल्या बाजरीच्या कणसे घेऊन सहभागी झाले. पिकांची झालेली दयनीय अवस्था शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करपलेली पिके आंदोलनस्थळी आणली होती. आंदोलनात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. चौकट : हलगीच्या नादाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हलगीच्या कडकडाटासह शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा दिल्याने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.1
- ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांनी उजनी धरणातून कॅनल द्वारे तुळशी गावाला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे1