तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
- “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “ही शेवटची भेट असू शकते… पण हार मानायची नाही!”; जरांगे पाटील मुंबईकडे निघताना कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू “या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”; पत्नी सौमित्रा यांची भावनिक साद अंतरवाली सराटी | ओमप्रकाश उढाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुंबईकडे निघण्यापूर्वी कुटुंबीयांची घेतलेली भेट अत्यंत भावनिक ठरली. जरांगे पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आले होते. या भेटीच्या वेळी कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि स्वतः जरांगे पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. कालच्या पत्रकार परिषदेतही जरांगे पाटील भावूक झाले होते. “ही माझी शेवटची भेट असू शकते; पण हार मानायची नाही. जातवान लढा, समाजाची हार होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी समाजाला केले होते. त्यांच्या या शब्दांची छाया आज कुटुंबीयांच्या निरोपाच्या क्षणीही स्पष्टपणे जाणवली. जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, “मेला पण शरण नाही गेला, असा संदेश समाजात गेला पाहिजे. छातीवर गोळ्या घेतल्या, पळून नाही गेला, असे वाटले पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच, “जोपर्यंत मी जगेन, तोपर्यंत झुंज देतो. माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावागावात शांतता फेऱ्या काढा,” असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या संघर्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “दगा-फटका कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही. संकट कितीही आले आणि शत्रू कितीही मोठा असला तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे,” असे ठामपणे सांगितले. पत्नी सौमित्रा यांची अमृता फडणवीस यांना भावनिक साद दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि अमृता फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बहीण-भाऊ या नात्याचा उल्लेख होत असताना आता जरांगे पाटील यांच्या पत्नी सौमित्रा यांनीही भावनिक साद घातली आहे. “पाटलाच्या कुटुंबीयांची अवस्था पाहूनही सरकारला पाझर फुटत नसेल, तर महाराष्ट्रातील माय-बहिणींना ‘लाडकी बहीण’ म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही. सरकारला या बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत का?” असा भावनिक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. मुंबईकडे रवाना होताना पतीला निरोप देताना पत्नीच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले. संघर्षाच्या वाटेवर निघालेल्या एका पतीला, वडिलांना आणि कुटुंबप्रमुखाला निरोप देतानाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका बाजूला आरक्षणासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू… जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे रवाना होण्याचा हा क्षण आंदोलनाच्या इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण ठरला आहे. “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका…”; कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधत जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच.. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने कुच केली. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी भावनिक संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “वापस आलो नाही, तर समाजाला दोष देऊ नका. लेकरांना कुणाच्या दारात जाऊ देऊ नका. गरज पडली तर रान विकून मुलीचं लग्न करा…” त्यांच्या या भावनिक शब्दांमुळे उपस्थित वातावरण गंभीर झाले.3
- एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; जिल्हास्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील एल. आर. के. इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात सोनपेठचे नगरसेवक मा.अब्दुल रहेमान सौदागर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण अत्यंत सन्मानपूर्वक संपन्न झाले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुकास्तरीय बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू जान्हवी अशोक रोडे, निनाद गोविंद वाकणकर, दिप उद्धव भोसले, अलफिया अतिक सय्यद, अर्शिया फारूक सय्यद, श्रेयस सतीश काटे, सार्थक संजय फपाळ, अनन्या रामेश्वर गव्हाणे.या सर्व विजेत्यांचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष मा.परमेश्वर भैय्या कदम, कोषाध्यक्ष मा. रामेश्वर कदम, उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम, संपादक किरण रमेश स्वामी व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत व कौतुक करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.पल्लवी यादव, प्राचार्य श्री. प्रशांत कांबळे, किड्स विभागाच्या प्राचार्या सौ.अनिता कंदे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.3
- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.1
- रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.1
- महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!” कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे." "महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला. दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.1
- कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश1
- तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1